Friday 6 June 2014

Poem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते


वर्षभर अभ्यास केला. परिक्षा आली. परिक्षा दिली. पेपर खुप सोपे गेले. परिक्षा संपली. सुटी लागली. मामाच्या गावाला गेलो. सूर पारंब्या खेळलो. विटी दांडू खेळलो. आट्यापाट्या खेळलो. खूप मजा केली. पण आता सुटीचाही कंटाळा आलाय. पुन्हा शाळा हवीशी वाटू लागलीय.

हो खरंच असं होतं. मुलांना सुटीचाही कंटाळा येतो. त्यांना शाळा सुरु व्हावीशी वाटते. शाळेतल्या मित्रांना भेटावसं वाटतं. नवी पुस्तकं घ्यायची असतात..... नवं दप्तर घ्यायचं असतं...... नवे बुट.... नवे मोजे. सारं सारं……नवं कोरं.


सारं काही नवं नवं
कवेत भरून घ्यावं
वर्गात करावा अभ्यास
बाहेर खट्याळ वारं व्हावं

सुगंधालयात गेलं कि गुलाब, मोगरा, केवडा, चाफा,  जास्मिन, सारे सुगंध विकत मिळतात. तिथं दोनच सुगंध विकत मिळत नाहीत. एक नव्या कोऱ्या पुस्तकांचा आणि ओल्या चिंब मातीचा. मातीचा सुगंध हवा असेल तर पाऊस यावा लागतो. आणि नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध हवा असेल अभ्यास करावा लागतो. मातीच्या सुगंधासाठी मातीला पावसात ओलं व्हावं लागतं आणि फुलपाखराचा सहवास हवा असेल तर कळीचं फुलं व्हावं लागतं.

मातीचा आणि नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध कुठे तयार करता येत नाही पण ते जेव्हा येतात तेव्हा श्वासात भरून घ्यावेसे वाटतात.  

काही काही गोष्टी अती झाल्या कि त्यांचा कंटाळा येतो. सुट्टीचही तसंच असतं. मुलांना सुटीचाही कंटाळा येतो. या पुढच्या कवितेतल्या छोट्यालाही सुट्टीचा कंटाळा आलाय म्हणूनच तो म्हणतोय -  

पुरे झाली सुट्टी आता
शाळा मला खरी वाटते
टि. व्ही. नको गेम नको
पाटी तेवढी खरी वाटते

तो छोटू आणखी काय काय म्हणतोय ते ही पहा -



No comments:

Post a Comment