Friday 13 June 2014

Story for Kid's : राक्षसपूरचा राक्षस

माझी  ' राक्षसपूरचा राक्षस ' हि कविता परवाच्या दैनिक लोकमत च्या ' सुटी रे सुटी ' या सदरात प्रकाशित झाली आहे.

मधे कुणास ठाऊक कसं पण लहान मुलांसाठी माझ्याकडून बरंच लिखाण झालं. छोटया मुलांसाठी अनेक कविता मी त्या वेळी लिहिल्या.

आठएक दिवसापूर्वी दैनिक लोकमत मधूनच प्रकाशित झालेली -
राक्षस गेला शाळेमध्ये  यापूर्वी मी माझ्या ब्लॉगवर पोस्ट केलेली अक्कलपुरचे अक्कालराव या कविता त्यापैकीच आहेत. अक्कलपुरचे अक्कलराव आणि राक्षसपूरच राक्षस हि पात्रंही याच काळात माझ्या कवितांमध्ये आली. पण या पात्रांचा मीच जन्मदाता आहे असा माझा मुळीच दावा नाही. अशी पात्रं याच्याशी नामसाधर्म्य असणारी मी लहानपणी वाचलेल्या गोष्टींमधून आलेली आहेत. पण त्या गोष्टींमधला राक्षसपूरचा राक्षस हा दुष्टच होता. मी मात्र माझ्या कवितांमधून जाणीवपूर्वक प्रेमळ राक्षस रेखाटण्याचा प्रयत्न केला.
       
राक्षस म्हणालं कि मुलांना भीती वाटते. मुलांच्या मनामधली ती भीती तो बागुलबोवा काढून टाकण्यासाठी मी मुद्दामच हि पात्रं मुलांशी मैत्री करतील अशी रेखाटली आहेत.

' राक्षस गेला शाळेमधे ' या कवितेतला राक्षसही असाच मजेशीर. मुलांप्रमाणे शाळेत जावसं वाटणारा, अभ्यासाची आवड असणारा, आणि गुरुजींनी वाईट राक्षसाची गोष्ट सांगताच त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याचं तंगडं मोडण्यासाठी वर्गाबाहेर जाणारा. राक्षस असूनही वाईटाची, दुष्टांची चीड असणारा.      

राक्षसपूरचा हा राक्षस काही गोष्टीतल्या नेहमीच्या राक्षससारखा आडदांड नाही. दुष्ट नाही. राक्षसपूरमधला हा राक्षस खूप प्रेमळ आहे. त्याच्या अंगावर केस नाहीत. डोक्यावर शिंग नाहीत. त्याचे डोळे आगीचे लाल गोळे नाहीत आणि त्याच्या तोंडात लांबलचक सुळेही नाहीत. त्याला गाडीभर खायला तर लागत नाहीच पण पाणी किती लागतं प्यायला तर फक्त चमचाभर. आहे कि नाही मजेशीर राक्षस. हा राक्षस मुलांना त्याच्याजवळ असलेल्या चोकलेट मधलं अर्ध चोकलेट तर देतोच पण मुलांची गोड पापीही घेतो.



No comments:

Post a Comment