Monday, 2 June 2014

SSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन ?

खाली बारावीचं मुल्यांकन मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या साईटचा पत्ता आणि SMS कुठे आणि कसा करावा ते सांगितलाय.

Result या शब्दाचा मराठी अनुवाद निकाल. पण निकाल या शब्दाला मराठीत किती छटा आहेत ? निकाल लागणे या वाक्य प्रयोगातून कोणताच चांगला अर्थ प्रतित होत नाही. त्यातून नैराश्य आणि नकारात्म्कताच प्रतीत होते. काय लागला का निकाल ? असं एखादयाला विचारलं तरी निकाल चांगला असेल तर ठिक. नाहीतर खजील व्हायलाच होतं. न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भात किंवा प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात तो शब्दप्रयोग ठिक आहे.  त्यामुळेच शालेय शिक्षणाच्या Result च्या संदर्भात तरी ' आज दहावी बारावीचा निकाल ' असा वाक्यप्रयोग न करता ' आज दहावी बारावीचं मुल्यांकन' असा करावा.


मग प्रश्न पडतो बोली भाषेत मुल्यांकन हा शब्द कसा वापरता येईल ?

' अरे,  कधी आहे रे दहावीचं मुल्यांकन ? '

' तुझं मुल्यांकन कळलंय ? '

' किती टक्के आहे तुझं मुल्यांकन ? ' वगैरे वगैरे.

असो. आज बारावीचं मुल्यांकन. त्यासाठी सर्व विदयार्थ्यांना ' रिमझिम पाऊस ' कडून शुभेच्छा.

या पोस्ट मधील  बारावीचं मुल्यांकन या शब्दावर क्लिक ( Click ) केलंत तरी तुम्ही त्या साईटवर पोहचू शकाल जिथं उपलब्ध होणार आहे तुमच्या अभ्यासाचं मुल्यांकन.  त्या साईटचा मूळ पत्ता http://www.mahresult.nic.in/ असा आहे. पण तुम्ही बारावीचं मुल्यांकन या शब्दावर क्लिक ( Click ) केलंत तरी त्या साईटवर पोहचू शकाल. त्या पानावर पोहचल्यानंतर तुमच्या समोर खालील चित्रातल्या प्रमाणे पान दिसेल. त्यात विचारलेली माहिती भरा आणि Submit Now या चौकोनावर क्लिक ( Click ) करा. 
पण Internet काही सगळ्यांकडेच नसेल. तेव्हा मित्रहो. तुमच्या नेटवर तुमच्या मित्रांचं मुल्यांकन पहा आणि त्यांना कळवा. तेवढंही शक्य नसेल तर मोबाईल तर आज घरोघरी आहेतच. तेव्हा तुमच्या मोबाईलवरून तुम्ही  57766 या नंबरवर MHHSC<Seat No> असा SMS करूनही तुमचं मुल्यांकन जाणुन घेऊ शकाल.

सर्व विदयार्थ्यांना ' रिमझिम पाऊस ' कडून पुन्हा एकदा शुभेच्छा.


7 comments:

 1. nice post cover all vital info..thank for sharing.
  willing candidates check Date Sheet and Govt. Jobs

  ReplyDelete
  Replies
  1. Rajeshji, There are lot Spam site on internet. They just making candidate fullish. Hope your site will be helpful to them in getting job.

   Delete
 2. Compared to the previous generations, students who are in college are equally giving importance to the govt jobs keeping in mind the benefits they get during the job.

  ReplyDelete
  Replies
  1. तुम्ही माझ्या लेखावर प्रतिक्रिया नोंदवली आहे कि तुमची जाहिरात करताय ? तरीही मी तुमची कॉमेंट प्रकाशित केली कारण होणार असेल कोणाला फायदा तर होऊ दे.

   Delete
 3. Information is good in the article, Thanks for the post.

  Govt Jobs In India

  ReplyDelete
 4. thanks very nice post,

  http://www.asfk.in/

  ReplyDelete