Monday, 9 June 2014

Love Poem : मिठी पडावी पहाट वेळी

मराठी साहित्यात कुणाविषयी सर्वात अधिक लिहिलं गेलं असेल ? एक तर परमेश्वराविषयी आणि त्यानंतर तिच्याविषयी. परमेश्वरानंतर सर्वव्यापी कोण असेल तर ती. सहाजिकच कलावंत मग तो कुठलाही असो. कवी असो, लेखक असो, चित्रकार असो, शिल्पकार असो, प्रत्येकजण तिलाच साकारण्याचा प्रयत्न करतो. कुणी शब्दातून………कुणी रंगातून………प्रमाण बद्धतेतून……….कुणी कशातून………….तर कुणी कशातून. पण आस एकच………तिला साकारण्याचा. तिला साकारत असताना तिच्यात रमून जाण्याचं.


असं तिला साकारत असतानाही तो तिच्याशी एकरूप होऊन जातो मग प्रत्यक्ष ती जेव्हा त्याच्या आयुष्यात येते तेव्हा काय होत असेल ? हा प्रश्नही उरत नाही तेव्हा. ती त्याच्या आयुष्यात येते तेव्हा………. प्रत्येक श्वास म्हणजे ती…….. सावल्यांचे भास म्हणजे ती……….जगण्याची आस म्हणजे ती……….!!!!!!!!!! बस्स.

पण ती रागावते……..न सांगता त्याच्यापासून खूप खूप दूर जाते.  तेव्हा तो हतबल होतो…………त्याच्या आयुष्याचे सारे रंग उडून जातात. तिच्याशिवाय जगणं हि कल्पनाही त्याला सहन होत नाही. तेव्हा तिची विनवणी करताना तो म्हणतो -

 http://reghana.files.wordpress.com/2010/10/mithi-pdawi-phatweli.jpg


6 comments:

  1. समिधाजी प्रतिक्रियेबद्दल आभार. रसिकांच्या आणि प्रियजनांच्या प्रतिक्रिया हिच माझ्या 'माझ्या लिखाणाची प्रेरणा.

    ReplyDelete
  2. खरंच मनातली कविता वाटली.

    ReplyDelete
  3. खुप सुंदर.

    ReplyDelete
  4. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete