Friday, 20 June 2014

Birthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट

काही दिवस महत्वाचे आणि स्मरणीय असतात. जन्माचा वाढदिवस……. लग्नाचा वाढदिवस. हे असेच काही दिवस. अशा स्मरणीय दिवसांचा आणि गिफ्टचा दृढ संबंध आहे. अशा दिवशी कुणी आपल्याला गिफ्ट दिलं तर आपल्याला आनंद होतोच. पुरुषांपेक्षा मुलांना आणि स्त्रियांना या गिफ्टचं खुपच कौतुक असतं. मुलं गिफ्टसाठी हट्ट करतात. तर स्त्रियांना गिफ्ट मिळालं नाही तर त्या हिरमुसतात.

आज माझा वाढदिवस. खरंतर मी गावी शेतावर होतो. बरंच काम होतं. केवळ वाढदिवसासाठी पुण्यात येणं शक्य नव्हतं. पण मुलांचा फोन आला. एका दिवसासाठी का होईना पण पुण्यात येऊन जाण्याचा आग्रह झाला. आणि तिथल्या कामाची व्यवस्था करून मी काल रात्री पुण्यात आलो.

माझी मुलं अजून लहान आहेत. लहान म्हणजे शिकताहेत. अजून कमवती नाहीयेत. तरी बायकोनं मला एक टीशर्ट दाखवला. सांगितलं," आदेशनं घेतलाय. त्याच्या सेव्हिंगमधनं. दोन हजार रुपये साठवलेत त्यानं. "

त्या गिफ्टचं कौतुक होतंच. पण त्याहीपेक्षा अधिक कौतुक वाटलं ते माझ्या मुलानं त्याला दिलेल्या पोकेट मनीतून दोन हजार रुपये वाचवल्याचं.मुलांचा पोकेट मनी चार दिवस आधीच संपतो आणि महिना अखेरीस तो पुन्हा आपल्याला पैसे मागतो हा अनुभव प्रत्येक घरातला आहे. त्यामुळेच माझ्या मुलानं त्याला दिलेल्या पोकेट मनीमधून दोन हजार रुपये वाचवावेत हि गोष्ट मला सुखावणारी होती. त्या सुखाच्या हिंदोळ्यावर झोका घेतच मी झोपी गेलो.  

सकाळी झोपेतून उठलो तर माझ्या डोळ्यासमोर एक छानसा फोटो. माझं बर्थडे गिफ्ट. तसं पाहिलं तर या फोटोत विशेष असं काही नाही विशेष होती कुटुंबातील सगळ्यांना एकत्र बांधण्याची संकल्पना     

 

No comments:

Post a Comment