Saturday, 31 May 2014

How to get blog post in your email : आवडलेला ब्लॉग तुमच्या इमेलशी कसा जोडाल ?

मित्रहो,

खरंतर कोणत्याही ब्लॉगचा अड्रेस आपल्याकडे नसतो. काहीतरी सर्च करताना Google search च्या माध्यमातून अथवा मराठी विश्व, मराठी ब्लॉग जगत , मराठी ब्लॉग्स , मराठी ब्लॉग लिस्ट अशा मराठी ब्लॉगच्या डिक्श्नरीच्या माध्यमातून आपण अनावधनाने एखाद्या मराठी ब्लॉगवर पोहचतो. तो ब्लॉग आपल्याला खूप आवडतो. चार आठ दिवसांनी पुन्हा त्या ब्लॉगवर आपल्याला काही नविन मिळतंय ते पहायचं असतं. पण त्या ब्लॉगचा अड्रेस आपल्याला आठवत नाही. मग Google search अथवा वर दिलेल्या मराठी ब्लॉगच्या डिक्श्नरीच्या माध्यमातून तो ब्लॉग आपण शोधू पहातो.

यातून आपल्याला हवा असलेला ब्लॉग पुन्हा सापडेलच याची शाश्वती नसते.
आणि त्या ब्लॉगचा शोध घेताना खुप वेळही जाऊ शकतो. त्यामुळेच आपल्याला आवडलेले दोनचार ब्लॉग आपण डायरेक्ट आपल्या इमेलला जोडले तर त्या त्या ब्लॉगचे लेखक जेव्हा जेव्हा नवीन लेखन पोस्ट करतात तेव्हा तेव्हा त्या पोस्टची लिंक (  Post link ) आपल्याला इमेल केली जाते. त्यासाठी आपल्याला एकदाच पुढील गोष्टी कराव्या लागतात.

तुम्हाला आवडलेल्या ब्लॉगच्या पोस्टच्या लिंक तुम्हाला तुमच्या इमेल मध्ये मिळायला हव्या असतील तर खालील बाबींची पूर्तता करा. यासाठी अवघे पाच मिनिटं लागतात.                


1 ) एखादा ब्लॉग ओपन केल्यानंतर त्या ब्लॉगच्या डाव्या अथवा उजव्या बाजूला तुम्हाला खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे लिंक दिसेल.  काही वेळेस त्या त्या मातृभाषेतलं भाषांतर  नसेल तर follow by email, subscribe by email, subscribe  असं लिहिलेलं असेल. खालील चित्रात माझ्या ब्लॉग पेजवरील दोन्ही भाषा दिसताहेत.

 त्या चित्रातील रिकाम्या चौकोनात तुमचा इमेल अड्रेस टाका ( वरील चित्रात मी माझा इमेल अड्रेस टाकला आहे.) आणि Submit या बटनावर क्लिक करा

2 ) त्यानंतर तुम्हाला खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे विंडो दिसेल..या चित्रातील काळ्या रिंगमध्ये दिसणारी अक्षरे खालील निळ्या रिंगमधील चौकटीत टाईप करा  
आणि Complete subscription request या बटनावर क्लिक करा.

3 ) त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे विंडो दिसेल. त्यात तुम्हाला तुमच्या ईमेल अड्रेसवर इमेल पाठवली आहे असं लिहिलेलं असेल.
4 ) आता तुमचं इमेल खातं उघडा. तुम्हाला इमेल आलेला असेल. तो इमेल ओपन करा. त्या इमेलमधील लिंकवर क्लिक करा. ती लिंक एका नवीन विंडोत ओपन होईल. तसं झालं नाहीतर त्या इमेल मधील इतर सूचनांच पालन करा. 5 ) वरील इमेलमधील लिंक वर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला खालील चित्रातील विंडो दिसेल. त्यात लिहिलेलं असेल कि तुमचं इमेल subscription पूर्ण झालेलं असून feedburner ने ते स्वीकारलेलं आहे.   


आता तुमचं काम संपलय आणि लेखकासह feedburnसुरु झालंय. आता तुम्ही काहीही न करता तुमच्या आवडत्या लेखकाचं लेखन तुम्हाला पोहच होईल. 

No comments:

Post a Comment