Friday 9 May 2014

Love poem : प्रेम कशात आहे ???

प्रत्येकाला असं  वाटत कि मला सारं काही कळतं .पण आपण खूप अज्ञानी असतो. प्रेम कशात आहे !!!!
तर इतरांना समजावून घेण्यात. पण हे कुणालाच कळत नाही. हे आपल्याला कळत नाही म्हणूनच आपण रंग, रुप ऐश्वर्य , धन - दौलत अशा बाह्य आणि नश्वर गोष्टींवरच प्रेम करतो. जेव्हा ' इतरांना समजावून घेणं म्हणजेच प्रेम ' हि व्याख्या आपण स्विकारतो तेव्हा रंग, रुप ऐश्वर्य , धन दौलत अशा बाह्य आणि नश्वर गोष्टींच्या अस्तित्वाची जाणीवही आपल्याला उरत नाही. जेव्हा इतरांना समजावून घेणं म्हणजेच प्रेम हि व्याख्या आपण स्विकारतो तेव्हा माणूस या एकाच सजीवावर प्रेम न करता आपण प्रत्येक सजीवावर प्रेम करू शकतो. मला फेसबुकवर मिळालेली हि गोष्ट. घेण्यासारखी.
२४ वर्षाचा एक मुलगा त्याच्या वडिलांबरोबर रेल्वेने प्रवास करत असतो. अवती भोवती बरेच सहप्रवासी असतात. मुलगा खिडकीतून बाहेर पहात आनंदात न्हात असतो. खिडकीतून दिसणाऱ्या निसर्गाविषयी वडिलांना सांगत असतो.
" बाबा पहा , झाडी मागे पळताहेत." वडिल हसून मुलाकडे पहातात. .
सहप्रवाशांमध्ये एक जोडपं असतं. त्यांना या २४ वर्षाच्या मुलाचं पोरकट वागणं पाहून वाईट वाटतं. मुलगा मतीमंद आहे असं समजून ते अधिक सहानभूतीनं त्याच्याकडे पाहू लागतात.

इतक्यात मुलगा आनंदानं टाळ्या  पिटत पुन्हा ओरडतो," बाबा ढग आपल्या आपल्याबरोबर पळताहेत. " वडीलांच्या डोळ्यात पाणी उभं रहातं.

सहप्रवाशी जोडप्याला अधिक कणव येते. मुलाच्या वडिलांकडे वळून ते म्हणतात, " तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या चांगल्या डॉक्टरला का नाही दाखवत.त्याच्या अशा वागण्यावर काहीतरी विलाज करायला हवा."
त्या मुलाचे वडील प्रसन्नपणे हसतात आणि म्हणतात, " बरोबर आहे तुमचं. आम्ही इतक्यात डॉक्टरकडेच जाऊन आलो.  माझा मुलगा जन्मताच आंधळा होता. आजच त्याला दृष्टी मिळालीय."

सहप्रवाशी जोडपं खजील होतं.

Story of blind child.
तात्पर्य : वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय कधीच अनुमान काढू नये.

No comments:

Post a Comment