Monday, 19 May 2014

Love Poem: अन तुझ्या बाहुत येता

ती आपल्या आयुष्यात येते आणि आपण हरखून जातो. ती असते आपल्या काळजाचा ठोका………ती आपल्या हृदयाची स्पंदनं. आपल्याला हवी तशी ती आपल्या आयुष्यात आली कि आपल्या मनातला झोका आपल्याही नकळत आभाळाला जाऊन भिडतो. आपल्याला आभाळ अगदी आपल्या कवेत आल्यासारखं वाटू लागतो. कालपर्यंत जमिनीवर असणारा आपल्या स्वप्नांचा झोका असा आभाळात न्यायला कारणीभूतही तीच असते.ती आयुष्यात आली कि आपल्याला वास्तवाचं भानच रहात नाही……….आभाळातून आपण जमिनीवर उतरायला नकोच म्हणतो. वास्तवाच्या जमिनीवर कसं उतरायचं याचं भानही उरलेलं नसतं आपल्याला  आणि मग आपण तिलाच विचारतो, ” अग तुझ्या सहवासात मी नभात उंच भरारी घेतलीय खरी पण आता मला वास्तवाच्या भूवर कसं उतरायचं हे कळतच नाही.”

आणि मग ती हात उंचावते आणि म्हणते, ” अरे, त्यात काय अवघड !!! खुशाल झेप घे ना. “

आपला तिच्यावर पूर्ण विश्वास. परमेश्वरावर असावा तेवढाच. सहाजिकच आपण खुशाल तिच्या बाहुत झोकून देतो. पण आपण असे स्वतःला तिच्या बाहुत झोकून देतो तेव्हा काय होता ते सागतोय या कवितेतला तुमच्या सारखाच एक प्रियकर. वेडापिसा -

Love Poem

No comments:

Post a comment