या फोटोवरूनच लक्षात येईल कि या अंध मुलींना मिळालेला प्लटफोर्म किती मोठा होता ते. दृष्टी नसलेल्या या मुलींना नावंही नव्हती. म्हणजे इतर कलाकारांची नावं जशी रसिकांपर्यंत पोहचली तशी त्या मुलींची पोहचली नाहीत.
हा व्हीडीओही मी नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलने शूट केलाय. त्यामुळे क्लोजप घेता आले नाहीत. शिवाय लाईटसचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता. आपले साधे कॅमेरे या लाईटस समोर दिपून जातात. पण तरीही त्या मुलींच्या नृत्यातली सुसूत्रता या व्हीडीओतून नक्कीच समजेल. ' आईचा जोगवा ' या गाण्यावर केलेलं हे नृत्य. खुप एनेर्जेटिक. हवी असलेली एनर्जीही त्या मुलींच्या नृत्यात ठासून भरलेली होती.
महिन्याभरापूर्वी असाच एक कार्यक्रम पाहण्याचा योग आला. नृत्यांगना शर्वरी जेमेनिससह छोट्या आणि मोठया पडद्यावरील अनेक दिग्गज कलावंत या कार्यक्रमात सहभागी होणार होते. महिलादिनाच औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.दैनिक सकाळ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक. पुण्यातले प्रसिद्ध ज्वेलर्स पुना गाडगीळ हे त्या कार्यक्रमाचे प्रायोजक. हे सगळं सांगायचं नाही मला. कार्यक्रम सुंदरच होता पण त्यातही सर्वोत्तम होतं अंध मुलींचं नृत्य.
शर्वरी जेमेनिससह अनेकांनी नृत्य केलं. त्यात सोलो डान्स जसे होते तसेच ग्रुप डान्सही होते. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात अनेक डान्स झाले. पण रसिकांच्या पसंतीस उतरले केवळ दोनच डान्स. एक शर्वरी जेमेनिसनं केलेला आणि दुसरा त्या अंध मुलींनी केलेला.
शर्वरी जेमेनिसचं नृत्य रसिकांना भावलं कारण त्याची थीम अत्यंत सुंदर होती. नृत्य तिचा श्वास आहे. त्यामुळेच त्यात कोणतीच उणीव नव्हती. पण तिनं निवडलेली थीमही अत्यंत सुरेख होती. स्त्री भ्रूण हत्या या विषयावरील एका हिंदी कवयत्रीची कविता. त्या कवितेला अत्यंत तरल संगीताची पार्श्वभूमी. आणि त्यावर शर्वरीच कथ्थक. दुग्ध शर्करा योगच.
पण अंध मुलींचं नृत्य शर्वरीच्या नृत्यापेक्षा रसिकांना अधिक भावलं. रुचलं. आवडलं. आणि तीन तासांच्या या कार्यक्रमात ग्रुप डान्सही अनेक झाले पण रसिकांची पसंती मिळाली ती अंध मुलींच्या नृत्याला. कारण ' आईचा जोगवा ' या गाण्यावर केलेलं हे नृत्य. सात मुलींचा सहभाग. पण त्यांच्यातलं कोओर्डीनेषण इतकं सुरेख होतं कि डोळस माणसांनीही डोळे चोळावेत. टिव्हीच्या रियालिटी शोमध्ये अनेकांना स्टयान्डींग ओबेशन मिळतं. पण स्टयान्डींग ओबेशन म्हणजे काय हे मी खऱ्या अर्थानं अनुभवलं ते इथं. नृत्य संपताच सगळे प्रेक्षक उभे राहिले. टाळ्यांचा अखंड कडकडाट चालू होता. आणि विशेष म्हणजे रसिकांना हे असं करायला निवेदकानं सांगितलेलं नव्हतं. अन्यथा बऱ्याच कार्यक्रमात निवेदक म्हणतो ' यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दया. आणि मग रसिकांमधून नाईलाजास्तव फुटकळ टाळ्या वाजायला लागतात.

No comments:
Post a Comment