हा लेख पूर्ण वाचा. शक्य असेल तर बंगालीपासून कन्नडपर्यंत शक्य त्या सर्व भाषांमध्ये भाषांतरीत करा. प्रत्येकाला फोरवर्ड करा. स्थानिक पक्षांचा स्वार्थ आणि त्यांचं जनहिताच्या आड येणारं राजकारण मोडीत काढा.
काँग्रेस म्हणतं, ' आमचा पक्ष निधर्मी आहे आणि भाजपा जातीयवादी आहे. ' पण स्वतःला निधर्मी म्हणवणारी काँग्रेस शाही इमामांच्या पायाशी लोळण घेते आणि मतांची भिक मागते. आणि युपीतले मुस्लिमच काय पण दलितही सपा , बसपाला झुगारून भाजपाच्या पाठीशी उभे रहातात. कारण मतदारांनाही खरे जातीयवादी कोण हे कळून चुकलंय.
तरीही सांगावसं वाटतंय कि शिवसेना काय , मनसे काय , तृणमूल काय , सपा काय, बसपा काय , जदयु काय आणि द्म्रुक काय. हे कोणतेही पक्ष जनतेच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी जन्माला आलेले नाहीत.
तर स्थानिक प्रश्नांचं राजकारण करताकरता आपली पोळी भाजणं हाच या स्थानिक पक्षांचा हेतू. या स्थानिक प्रश्नात केवळ प्रांतवाद, भाषावाद आणि जातीयवाद येतो. महागाई , प्रगती , सुरक्षा या गोष्टी केवळ चर्चेसाठी , लोकांना गाजर दाखवण्यासाठी असतात.
या देशात आता कुणाही एका पक्षाचं राज्य येणार नाही. हे या स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना पुरतं कळून चुकलंय. म्हणूनच ५४४ खासदारांच्या लोकसभेत ३० ते ४० जागा लढवणारे स्थानिक पक्षांचे नेते आपण या देशाचे पंतप्रधान होऊ अशी स्वप्नं पाहताहेत. असं स्वप्नं पहाण्यात सर्वाधिक मश्गुल आहेत मुलायमसिंग, मायावती, ममता ब्यानर्जी आणखी असेच काही मुंगेरीलाल. नितीशकुमारांचा मोदींना विरोध होता तो केवळ या अभिलाषेपोटी. नितीशकुमारांना माहिती होतं कि इतर कुणालाही आपण शह देऊ शकतो. पण मोदींच नाव पुढे आलं तर आपण पूर्णपणे मागे पडणार आहोत. नुसते मागेच नाही पडणार तर पुरते झाकले जाणार.
पराभवानंतर आज अखिलेश यादव ज्या प्रकारचं राजकारण करताहेत, ममता ब्यानर्जी ' मोदींना पश्चिम बंगालमध्ये पाऊलही ठेऊ देणार नाही ' अशी भाषा प्रचारादरम्यान वापरतात, अरविंद केजरीवाल मोदींवर न पटण्यासारखी आगपाखड करतात. मोदींना राजकारणातून हद्दपार करायचं म्हणून वाराणसीत उभे राहतात. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात.
अनंत गीतेंना चांगलं खातं मिळालं नाही म्हणून ते नाराज होतात आणि उद्धव ठाकरे त्यांची तरफदारी करतात. यात जनतेचं कल्याण कुठं येतं हो ?
अर्थात मी हे सारं मतदारांना समजावून सांगण्याची गरज नाही. तो येत्या विधानसभा निवडणुकीत या स्थानिक पक्षांना त्यांची जागा दाखवूनच देतीलच.
No comments:
Post a Comment