ती आपल्या आयुष्यात येते.........तिचं हसू आपल्यावर उधळून देते.........आणि आपण ???????????
.........आपण आपले उरतच नाही मुळी.
.........आपण आपले उरतच नाही मुळी.
त्यानंतर एकच आस...........सगळीकडे तिचे भास............सोबतीला तिचा श्वास.................वैशाखातही श्रावणमास.
तिचं हसू असतं...............अगदी इवलसं...........तिच्या ओठांच्या दोन कोपरयात मावणारं.............पण आपल्या आयुष्यातलं सारं आभाळ व्यापणार.
पण तिला जाणीवही नसते या साऱ्याची......ती तिच्याच धुंदीत........चेहऱ्यावरचं हसू उधळीत तिच्या दारातल्या केवड्याला पाणी घालत.
तिचं हसू आपलं सारं आयुष्य व्यापून उरलं आहे याची जशी तिला जाणीव नसते तशीच तिच्या दारात फुललेल्या तळहाताएवढ्या केवड्याचा दरवळ आपल्या अंगणात पसरलाय आणि त्या दरवळानं आपण पुरते मंत्रमुग्ध झालेलो आहोत याचीही जाणीव तिला नसते.
ती जाणीव करून देण्याचाच हा छोटासा प्रयत्न -
No comments:
Post a Comment