हिंदुस्तानच्या
सिमेपल्याड जाऊन जगभरात वास्तव्या करणाऱ्या............
इंग्लिशस्तानच्या मातीवर माय मराठीची छाप सोडणाऱ्या.......... इंग्रजीवर
मराठी मोहर उमटविणाऱ्या माझ्या ब्लॉगच्या रसिक वाचकांना
लेखकांना आणि समुद्रापलीकडे असूनही मराठीवर प्रेम करणाऱ्या मराठीशी असलेले
ऋणानुबंध जपणाऱ्या तमाम रसिकांना माझी हि कविता अर्पण.
हि साता समुद्रापलीकडं गेलेली माणसं मराठीवर जीवापाड प्रेम करताना पाहून खूप खूप बरं वाटतं.
नाही तर आम्ही............. राहतो हिंदुस्थानात आणि तळवे चाटतो इंग्रजीचे आम्ही म्हणजे अगदी मी सुद्धा.
माझीच
गोष्ट सांगतो. परवा ग्रामीण भागातल्या एका एम. इ. बी. सी. अधिकाऱ्याशी
बोलण्याचा योग आला. नाव तिवारी.............अहमदाबादी किंवा लखनोवी. तो
त्याच्या लखनोवी हेलात मराठी हाणत होता आणि मी त्याच्यावर इंप्रेशन
मारण्याच्या हेतूनं इंग्रजी झाडत होतो.
महाराष्ट्रात शासनानं पहिली इयत्तेपासून इंग्रजी सक्तीची केली तेव्हा मीच लिहिलेली कविता मला आठवली आणि माझी मलाच लाज वाटली.
अधूनमधून इंग्रजी हाणणं आम्हाला आमच्या विद्वत्तेच प्रतिक वाटत. पण आपल्याच मराठी भाषेतून बोलताना आम्हाला अभिमान का नाही वाटत ? लाज वाटते मला आपल्या मातृभाषेवर प्रेम न करता स्वतःला हिंदुस्थानी म्हणवणाऱ्यांची.
देशोदेशीचे झेंडे माझ्या ब्लॉगवर झळकू लागले तेव्हा मला मला खुप अप्रूप वाटलं. मराठी माणूस जावून जाणार कुठे फारतर अमेरिका, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया नाहीतर दुबईपर्यंत. पण मला ज्ञातही नसलेल्या दोन............चार..............सहा...........आठ नव्हे तर चक्कं सोळा देशात पोहचलेला मराठी माणूस पाहून खूप खूप बरं वाटलं. ही कविता खास त्यांच्यासाठी -
No comments:
Post a Comment