Thursday, 29 May 2014

Indian Politic and Nareandra Modi : मोदी नाटकी आहेत ?

भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होती. या बैठकीसाठी मोदी संसद भवनाच्या प्रवेशद्वाराशी आले . संसद भवनाच्या पायरीशी नतमस्तक झाले. वाजपेयींच्या आठवणीने गहिवरले,  आडवानींच्या उपकाराच्या  भाषेने गदगदले. एकीकडे मिडियाचे कॅमेरे हे सारं चित्रित करीत होते आणि दुसरीकडे समीक्षक , राजकीय विश्लेषक 'हे नाटक तर नाही ना ' अशा शंकेनं मोदींच्या या कृतीकडे पहात होते.
बहुतेक वाहिन्यांवर या संदर्भातली चर्चासत्रे रंगली होती. पण अशाप्रकारची चर्चासत्रे आयोजित करून आपण जनतेच्या मनात देशातील सर्वोच्च नेतृत्वाविषयी शंकेची पाल निर्माण करतो आहोत हे मात्रं कुणीच लक्षात घेत नव्हतं. आणि जनतेच्या मनात मात्रं ' खरंच , मोदी नाटकी आहेत ? ', असा प्रश्न उपस्थित होत होता.

पण मोदी नाटकी नाहीत. झालंय काय आपल्या देशाच्या कोणत्याही पंतप्रधांना आपण अशा रितीने संसदेच्या पायरीशी नतमस्तक होताना पाहिलं नाही , डोळ्यात पाणी येउन गहीवरताना पाहिलं नाही,  भावना अनावर होऊन गदगदताना पाहिलं नाही. आणि त्यामुळेच मोदींची त्या दिवशीची प्रत्येक कृती समिक्षकांना, विष्लेषकांना, अभ्यासकांना एक नाटक वाटत होती. असं करून मोदी मतदारांवर मोहिनी घालू पाहताहेत असा सुर अनेकजण लावत होते. पण समीक्षक, राजकीय विश्लेषक यांच्यासारख्या बुद्धिवाद्यांनी असा विचार करणं सहाजिकही होतं. कारण आजतागायत त्यांनी कोणत्याही पंतप्रधानांनाच सध्या मंत्र्यांना किंवा खासदारांनाही अशा प्रकारे संसदेच्या पायरीशी नतमस्तक होताना पाहिलं नव्हतं. 


पण तो निष्कर्ष खरा नव्हे. कारण मोदी हे एका संस्कारात वाढलेले आहेत. हे संस्कार जसे घरातून आले आहेत तसेच आरयसयस मधूनही आलेले आहेत. मोदींची प्रत्येक कृती हि त्या संस्काराची परिणीती होती. पण प्रचार मोहिमेदरम्यान मोदी ज्या तडफेने आणि कोणाचीही भिडभाड न बाळगता बोलत होते ते पहाणाऱ्यांना मोदी इतके भावुक होऊ शकतील हे पटत नव्हतं. पण मोदींवर संशय व्यक्त करणारी हि मंडळी प्रचार मोहिमेदरम्यान मोदी युद्धभूमीत उभे होते आणि आता युद्ध संपल्यानंतर ते त्यांच्या दरबारात होते. युद्धभूमीत तलवार म्यान करून बसायचं नसतं आणि दरबारात तलवार उपसून उभं रहायचं नसतं  हे कळण्या इतपत मोदी निश्चित सुज्ञ आहेत.

मोदींच्या या सगळ्याच वागण्याचा काही अर्थ काढायचा असेल तो एवढाच काढता येईल कि,' मोदींची संसदेवर अत्यंत निष्ठा आहे. त्याची आपल्या लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. जनतेविषयी त्यांच्या मनात अत्यंत प्रेम आहे. म्हणूनच अच्छे दिन आनेवाले है हे वास्तवात उतरेल असं म्हणण्यास काहीच हरकत नाही.'

ते अत्यंत भावूक आहेत. पण भावूक आहेत म्हणून ते कठीण प्रसंगी रडत बसणार नाहीत. मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा स्वभाव आहे. पण ते तो कुणाला सहजासहजी दिसू देणार नाहीत.           
       

No comments:

Post a comment