Comment To Blog |
पहिल्या भागात मी ब्लॉगर मित्रांना आणि रसिक वाचकांना वाचलेल्या ब्लॉगला प्रतिक्रिया देण्याची इच्छा असतानाही का देता येत नसावी या बाबत लिहिलं होतं.
या भागात प्रतिक्रिया देण्यासाठी काय काय करावं लागतं याविषयी लिहिणार आहे.
अनेक लेखक ब्लॉगर , वर्डप्रेस या सह अनेक वेगवेगळ्या साईटवर लिहित असतात. पण जगातले जवळजवळ ९० % हून अधिक लेखक ब्लॉगर , वर्डप्रेस लाच अधिक पसंती देतत. त्यामुळेच आपण केवळ याच दोन साईट वरील ब्लॉगला प्रतिक्रिया कशी द्यायची ते पाहू या. त्यातही लेख अधिक मोठा होऊ नये म्हणून या भागात केवळ ब्लॉगर वरील ब्लॉग चाच विचार करणार आहोत.
१ ) पोस्ट खालील Comment , No Comment , Leave your comment, प्रतिक्रिया द्या यासारख्या लिंकवर क्लिक करा.
Comment To Blog |
त्यानंतर ठळक अक्षरे type the text या अक्षरांच्या खाली असलेल्या रिकाम्या चौकटीत लिहा. अक्षरे ओळखता आली नाहीत तर चौकटी समोरील पहिल्या खुणेवर क्लिक करा. तुम्हाला नवीन अक्षरे मिळतील.
Comment To Blog |
३ ) आता तुम्हाला तुमची ओळख द्यायची आहे. त्यासाठी choose an identity च्या खालील चार वर्तुळांपैकी कोणत्याही एका वर्तुळावर क्लिक करा.
अ ) पहिल्या वर्तुळावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटवर लॉग इन करावे लागेल.
आ ) दुसऱ्या वर्तुळावर क्लिक केल्यास तुम्हाला पर्याय समोर येतात. तिथे पाच छोटी चित्रे आहेत.
* पहिल्या चित्रावर क्लिक केल्यावर Open ID - हा पर्याय मिळतो. इथे तुमच्या ब्लॉगची URL टाका.
उदा. माझ्या ब्लॉगची URL - http://maymrathi.blogspot.com/
* पुढील चित्रे अनुक्रमे Live Journal, Wordpress, Typepad आणि AIM साठी
आहेत. या ठिकाणी तुमचे खाते असेल तरच तुम्हाला हे पर्याय वापरता येतात.
इ ) तिसऱ्या वर्तुळावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे नाव आणि अथवा तुमच्या ब्लॉगची URL विचारली जाते. दोन्हीपैकी काही एक टाकले तरी चालते.
ई ) शेवटच्या वर्तुळात ( Anonymous ) क्लिक केल्यावर तुम्हाला काहीच विचारलं जात नाही. कारण अनोंयमोउस या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे अज्ञात अथवा अनोळखी. त्यामुळेच हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कोणतीच ओळख मागितली जात नहि. आणि त्यामुळेच जिथे comment अथवा प्रतिक्रिया लिहायची आहे ती लिहून झाल्यावर जर तुम्ही हा शेवटचा पर्याय निवडला तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही.
५ ) आता शेवटची पायरी. Publish Your Comment वर क्लिक करा. एवढ केलंत कि तुमची comment त्या ब्लॉगच्या खाली दिसू लागणार. अर्थात इथंही एक अडचण. काही लेखक त्यांनी पाहिल्याशिवाय कोणतीही comment प्रकाशित होऊ देत नाहीत. त्यामुळेच तुम्ही लिहिलेली comment लगेचच त्या ब्लॉगच्या खाली दिसणार नाही. तर Your comment will be visible after approval of blog author असा मेसेज तुम्हाला दिसेल.
वर्डप्रेस वर प्रतिक्रिया साधारणतः अशीच आहे. जो काही थोडाफार फरक आहे तो पुढच्या भागात स्पष्ट करीन.
process kichkat hoti. pan tumchya postmule sgla lkshat aala
ReplyDeleteThanks Vinayak, yawar aata shewtchi post lihinar aahe.
Deleteयातला Anonymous ( अज्ञात ) हा पर्याय कुणालीही वापरता येइल. चला आता तरी मराठी ब्लॉगर प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा करू या.
ReplyDeleteमी माझं काम केलंय श्रद्धा . मला ते करणं गरजेचं वाटलं . कारण हे सगळं नीटसं लक्षात यायला मला तीन वर्ष लागली आहेत.
Deleteचला आता तरी मराठी ब्लॉगर आणि वाचक प्रतिक्रिया देतील अशी अशा करायला हरकत नाही.
ReplyDeleteप्रतिक्रिया देणं अथवा न देणं हा रसिक वाचकांच्या निवडीचा भाग आहे. मी माझं काम केलंय.
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल मनापसून आभार. मी लिहिलेल्या लेखाचे परिणाम आता दिसू लागलेत. वाचक प्रतिक्रिया देऊ लागलेत. पण त्यांनी Anonymous या पर्याया ऐवजी Name / URL हा तिसरा पर्याय निवडावा. म्हणजे आपले नावही लेखक पर्यंत पोहचेल.
ReplyDelete