आम्ही जेवायला बसलो होतो. जेवता जेवता सहज आठवणी निघाल्या. म्हणजे बायकोनं काढल्या. नाही तरी बायकांना चघळायला सतत काहीतर विषय हवाच असतो.
बायको म्हणाली, ” आशु तिच्या मुलांची किती काळजी घेते, नाही का हो ? “ अशा प्रश्नाला हो म्हणावं नाही म्हणावं काही कळत नाही. कारण हो म्हणावं , " मी आपल्या मुलांची काळजी घेत नाही का ? " असा प्रतिप्रश्न येणार. आणि नाही म्हणावं तर , " असे कसे हो तुम्ही ? तुम्हाला तुमच्या बहिणीचही कौतुक कसं नाही.? " अशा आडकित्यात मान सापडायला नको म्हणून प्रश्न कानामागेच ठेवून आम्ही आपले जेवण चघळत होतो.
” बघा ना, परवा आख्ख्या प्रवासात तिनं मुलांना कधीही बाहेरच पाणी पिऊ दिलं नाही. प्रत्येकवेळी बिसलरी घेतली. आपण नाही बाई आपल्या मुलांसाठी असं काही केलं.”
आमचं लक्ष आपलं जेवणात.
” आपण मुंबईला जाताना, तुम्ही चहा घ्यायचात. मला आणि दादाला एक भेळ घेऊन द्यायचात. जयू तर लहानच होता.”
मला आणि दादाला एक भेळ घेवून द्यायचात असं बायको म्हणाली मात्र, आमच्या मोठ्या चिरंजीवांनी लगेच कोटी केली.
” हो मला आठवतंय, तू मला चुरमुरे द्यायचीस आणि स्वतः मात्र फरसाण खायचीस.”
त्याच्या या कोटीवर आम्ही सारेच पोट धरून ह्सलोत. तिच्या तोंडातला पाण्याचा घोटही घशाखाली उतरेना आणि आमच्या तोंडातला घासही.
mast...
ReplyDeleteI can relate the day to day experience you share. Im following your blog from last 6months.
Keep it up!!
आभार सागर. वाचकांची मनोरंजन करावे हा जसा माझ्या ब्लॉगचा हेतू. तसाच मराठी रसिक वाचकांना मराठीची आणि वाचनाची गोडी लागावी हाही. त्यामुळेच उगाच काहीतरी लिहिण्यापेक्षा अधिकाधिक सकस लिहिण्याचा प्रयत्न मी करतो. आपण नुकताच लिहिलेला
ReplyDeleteबैल आणि मी हा लेख हि वाचवा. आपल्याला आवडेल आणि आपली प्रतिक्रिया मिळेल हि अपेक्षा. आपल्या ब्लॉगची लिंक कळवावी.