Comment To Blog |
इंडीब्लॉगर ही विविध भाषांमधील ब्लॉगची संग्रहिका ( directory ) आहे. यात मराठी भाषांमधील ब्लॉगसोबत इंग्लिश, हिंदी, कन्नड, तेलगु अशा विविध भाषांमधील ब्लॉग पहायला मिळतात. यातील इंग्लिश भाषांमधील ब्लॉगला भेट दिल्यांनतर दोन - तीन तासांच्या कालावधीतच त्या ब्लॉगला तीनशेहून अधिक वाचकांनी भेटी दिल्याचे व ७० ते ८० प्रतिक्रिया ( comment ) मिळाल्याचे मी अनेकदा पहिले आहे. परंतु मराठी भाषांमधील ब्लॉगला मात्र केवळ ५० च्या आसपास वाचक व एखादी दुसरी प्रतिक्रिया मिळाल्याचे मी पहातो. मराठी ब्लॉगला मराठी विश्व या व्यासपीठावरून सर्वात अधिक वाचक मिळतात. पण कित्येक ब्लॉगला तर महिनोमहीने एकही प्रतिक्रिया मिळत नाही.
असं का होत असेल यावर मी बराच विचार केला. आणि मला असं लक्षात आलं कि इंग्लिश हि राष्ट्रीयच नव्हे आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे इंग्लिश, तमिळ,तेलगु अशा सर्वच भाषांमधील ब्लॉगर्स आणि वाचक इंग्लिश ब्लॉगला भेट देतात आणि सहाजिकच इंग्लिश ब्लॉगला अल्पावधीतच खूप वाचक आणि प्रतिक्रिया मिळतात.
असं असलं तरी मराठी ब्लॉगला तासाभरात जे पन्नासएक वाचक भेट देतात त्यातील कमीतकमी १०-२० वाचक तरी प्रतिक्रिया का देत नाही. तेच तुम्ही फेसबुकवर जा कितीतरी दुय्यम दर्जाच्या पोस्टला लाखो पसंती ( like ) आणि हजारोंनी प्रतिक्रिया मिळालेल्या असतात. आणि या प्रतिक्रिया आणि पसंती देणाऱ्या वाचकांमध्ये मराठी वाचकांची संख्याही लक्षणीय असते.
मग मराठी ब्लॉगर्सच्या नशिबी वाचकांचा आणि प्रतिक्रियांचा दुष्काळ का ? यावर अधिक विचार करता करता खालील मुद्दे लक्षात घ्यावेसे वाटले -
१ ) मराठी ब्लॉग वरील लिखाणाचा दर्जा चांगला नसतो.
२ ) मराठी ब्लॉगच्या वाचकांना मराठी ब्लॉगर्स विषयी आणि त्यांच्या लिखाणाविषयी आत्मीयता नसावी.
३ ) प्रतिक्रिया कशा दयाव्यात याविषयी मराठी वाचकांना आणि नवख्या ब्लॉगर्सला माहिती नसावी.
परंतु ब्लॉग लिहिणारे आणि ब्लॉगला भेट देणारे रसिक वाचक संवेदनशील असतात याविषयी माझ्या मनात शंका नाही. त्यांच्या सामाजिक जाणीवही खूप व्यापक असतात याची जाणीव मला आहे. त्यामुळेच चांगल्या लिखाणाची दखल घेतल्याशिवाय आणि त्या लिखाणाला प्रतिक्रिया दिल्याशिवाय हे वाचक पुढे जातील असं मला वाटत नाही. पण असा विचार करताच हेही लक्षात येत कि अनेक दर्जेदार ब्लॉगवरही प्रतिक्रियांची वानवाच असते.
माझा रिमझिम पाऊस हा ब्लॉग मला चांगलाच वाटणार. पण माझ्या ब्लॉगसह मराठीबोली , गंगाधर मुटेंचा रानमोगरा ( शेती आणि कविता ), थोडी गम्मत जम्मत , मीरा समीर यांचा अक्षर मीरा , महेंद्र कुलकर्णींचा काय वाट्टेल ते, कांचन कराईचा मोगरा फुलला अशा अनेक चांगल्या ब्लॉगवरही वाचकांची आणि प्रतिक्रियांची रेलचेल दिसत नाही.
याही ब्लॉगला प्रतिक्रिया का मिळत नसतील यावर विचार करताना मला दोनच शक्यता दिसल्या _
१ ) मराठी ब्लॉगर्सना इतरांनी आपल्या पोस्टला प्रतिक्रिया दयाव्यात असं खूप वाटतं. पण तो स्वतः मात्र इतरांच्या ब्लॉगला प्रतिक्रिया देण्याची टाळाटाळ करतो.
२ ) मराठी वाचक हा आळशी असुन वाचायचं आणि सोडून द्यायचं एवढीच त्याची वृत्ती असते.
३ ) प्रतिक्रिया कशी दयावी हे त्याला माहिती नसतं.
यातील पहिल्या मुद्द्याविषयी बोलू. ब्लॉगर्सलाच नव्हे तर एकूणच मराठी माणसाला दुसऱ्याच कौतुक करायला आवडत नाही. त्यामुळेच तमाम मराठी ब्लॉगर्सला माझी अशी विनंती आहे कि प्रत्येक नव्हे पण तुम्हाला आवडणाऱ्या आणि कधीकधी न आवडणाऱ्या ब्लॉगलाही नेमानं प्रतिक्रिया देत चला.
Comment To Blog |
आता राहता राहिला तिसरा मुद्दा. प्रतिक्रिया कशी दयावी हे ब्लॉगर्सला आणि रसिक वाचकांना माहित नसावं.
पोस्ट मारुतीच्या शेपटाप्रमाणे खुप लांबली आहे. तेव्हा प्रतिक्रिया ( Comment ) कशी दयावी ? याची माहिती मला शक्य तेवढ्या चांगल्या रितीने पुढच्या भागात अर्थात एक दोन दिवसातच देइन.
Hello i like your post. It may be helpful to many of the bloggers and readers.
ReplyDeleteThanks. Keep reading.
DeletePudhchya Postchi wat phat aahe.
ReplyDeleteThanks Karishma. I think you made mistake while typing your name. I posted part two also. Pl go through it. Let me know is it helpful ?
Deletemla mahiti ahhe pan he mahiti whayla khup diwas gele.
ReplyDeleteहोय या पोस्ट गुगल सर्च वरून ब्लॉगवर येणाऱ्या आणि नव्यानं ब्लॉग लिहिणाऱ्या वाचकांसाठीच लिहिली आहे. कारण फेसबुकवर प्रतिक्रिया देण्याइतकं ब्लॉगला प्रतिक्रिया देणं सोपं नाही हे मला माहिती होतं.
Deletelike kase kartat he pan mahit nahi
ReplyDeleteब्लॉगर टेम्प्लेट मधे लाईक/ डिसलाईक बटण नसतं. असलंच तर केवळ लाईक बटण असतं आणि त्यापुढे किती वाचकांनी लाईक केलं त्याची संख्या येते. परंतु ब्लॉगरवरील ब्लॉग असो अथवा वर्डप्रेसवरील ब्लॉग असो. ओनरनं लाईक बटण आणलं तरच ते वाचकांना दिसतं. फेसबुकवरील पेजप्रमाणे ते आधीपासूनच तिथे असत नाही.
ReplyDeleteविजयजी मलाही असेच वाटते कि अनेकांसमोर हाच प्रश्न असावा कि कॉमेंट कशी द्यावी. नाहीतर फेसबुक वर तर कोमेंट्स भरभरून देत असतात. किंवा 'लोग इन' करा मग कॉमेंट द्या याचा कंटाळा करत असावेत. मी एक video करण्याचा विचार करत आहे.
ReplyDeleteधन्यवाद.
आपण व्हिडीओ नक्की करावा. प्रतिक्रिया देताना लॉग इन करावे लागणे हि बाब नक्कीच त्रासदायक आहे. पण इंग्रजी ब्लॉगवर मी काही तासातच १५ ते २० प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. यात टेक्निकल ब्लॉग बरोबरच अनुभवात्मक ब्लॉगही आघाडीवर असतात. असो मी मात्र रोज ५ ब्लॉगला नियमितपणे प्रतिक्रिया देण्याचा परिपाठ चालू केला आहे. अर्थात योग्य प्रतिक्रिया. चांगली पोस्ट असेल तर चांगली प्रतिक्रिया आणि पोस्त आवडली नाही तर सल्लात्मक प्रतिक्रिया.
ReplyDelete