Online Money/ Money From Blog |
एक काळ असा होता शंभर घरात एखादा फोन असायचा. मला आठवतंय माझ्या लहानपणी म्हणजे हि काही पन्नासएक वर्षापूर्वीची घटना नाही. फार तर पंचवीस तीस वर्ष झालेत या घटनेला. मला वडिलांशी तातडीनं संपर्क साधायचा होता. तेव्हा जवळपास कुठेच फोन नव्हता आणि मी आम्ही जिथं किराणा भरायचो त्या साधारणतः एक किलोमीटर अंतरावरील दुकानात जाऊन वडिलांना फोन केला.
पण आता दिवस बदललेत. काही दिवसापूर्वी पावलापावलावर दिसणारे कॉईन बॉक्स आता दिसेनासे झालेत आणि हाता हातात मोबाईल आलेत. घराघरात डेक्सटॉप आणि ल्यापटॉप झालेत. गुगल सर्च हा शब्दही कधी माझ्या ऐकिवात नव्हता. आता तो शब्द पोरासोरांच्या बोटावर आलाय. ब्लॉग कशाशी खातात हेही कुणाला माहित नव्हतं पण आता अनेकांचा ब्लॉग झालाय.
ब्लॉग हे उत्पन्नाचं साधन होऊ शकतं हे आता अनेकांना माहित झालंय. त्यामुळेच ज्याला थोडेबहुत शाब्दिक खेळ जमतात असे अनेकजण ब्लॉग लिहू लागलेत. मी स्वतःही अनेकदा या संदर्भातला शोध घेत असतो. पण अनुभवावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे कि ब्लॉग लिहून पैसे मिळवणं सोपं नाही. आणि मिळाले थोडेफार तरी त्यातून काही आपण गडगंज होणार नाही.
त्यामुळेच आजकाल मी ब्लॉग लिहितोय ते केवळ माझ्या समाधानासाठी. आपण समाज घडविण्यासाठी काहीतरी हातभार लावणार आहोत या जाणीवेतून. लिहिण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नाही म्हणून.
पण नराज होऊ नका. लिहित रहा.
दिवसभरात कमीत कमी दहा ब्लॉगला भेट दया.
निवडक दोनचार ब्लॉगला प्रतिक्रिया दया. मग तो ब्लॉग मराठी असो वा हिंदी. .............. तमिळ असो वा कन्नड.…………. बंगाली असो वा गुजराती.
Online Money/ Money From Blog |
भारतीय भाषांमधील ब्लॉगला अर्थार्जनाची संधी मिळवून देणाऱ्या काही साईट्स आहेत. त्याविषयी पाहू पुढच्या भागात.
No comments:
Post a Comment