अशा या रिमझिम धारा, निसर्गाचं हिरवं रूप आम्हा शहरवासियांच्या नशिबी नाहीच. आम्ही सतत सिमेंटच्या जंगलात हरवलेले. कधी कधी वाटतं आमच्या घरांपेक्षा कोंबड्यांची खुराडीही बरी. त्यांनाही दिवसभर मोकळा श्वास घेता येतो. पण आम्ही मात्र फ्ल्याट नावाच्या खुराड्यातून निघतो आणि ऑफिस नावाच्या कत्तलखान्यात जातो. आपलंच रक्त शोषल जाताना आणि आपलीच कातडी सोलली जाताना पाहतो. पुन्हा
येतो फ्ल्याट नावाच्या खुराड्यात. या साऱ्यातून निसटतो एक दिवस आपण. आणि झोकून देतो स्वतःला क्षणभरासाठी अशा निसर्गाच्या कुशीत. मला तर बऱ्याचदा तेवढं ही जमत नाही. मग मी मला हवा असलेला निसर्ग रेखाटायचा असा दुबळा प्रयत्न करतो.

आमचं ऑफिस…………….. आमच्या खुर्च्या…………….आमची आकडेमोड…………!!!!!!!!
पांढरे पुढारी………दलाला………… आडते………..!!!!!!!!!!!
आम्ही समजतो आमच्यामुळेच चालतं आहे जग. पण काळ्या मातीत राबणाऱ्या अशा हजारो हातांचे कष्ट आम्हाला दिसतंच नाहीत. या अशा खऱ्या खुऱ्या वारसदारांनी जर मातीत राबायचं थांबल तर आम्ही जगू शकतो ??????
No comments:
Post a Comment