( मी अनेक लग्नात घोड्याचा नाच पाहिला आहे. पण परवा माझ्या पुतण्याच्या लग्नात मी पाहलेला घोडयाचा नाच थक्क करणारा होता. त्याचा व्हिडीओ खाली आहे. )
नृत्य हि कला माणसाची. इतर कोणताही प्राणी मानवा इतकं सुरेख नृत्य करू शकत नाही. पण आपल्या बरोबर इतर प्राण्यांना नाचायला लावण्यात माणसाला फार मजा वाटते. माकड हा माणसाच्या या हौसेला बळी पडणारा एक प्राणी. पण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी माणसानं माकडाला जसं भरीस घातलं तसंच तसंच इतर प्राण्यांना. त्यासाठी कुणाला नाचायला लावलं, कुणाला धावायला लावलं, कुणाच्या झुंजी लावल्या, तर एखाद्या प्राण्याबरोबर स्वतःच झुंजी घेतल्या.
घोड्याच्या अंगची कला धावण्याची. पण आपल्या स्वार्थासाठी माणसानं घोडयालाही नाचायला भाग पडलं. वाऱ्याशी स्पर्धा करण्यासाठी ज्या प्राण्याचा जन्म झालाय त्याला खरंतर असं वरातीत नाचणं मुळीच रुचणारं नव्हतं. पण हंटर समोर वाघाची शेळी होते…………. वेसण घातलेला बैल सरळ रस्ता धरतो. तसं या नाचणाऱ्या घोडयाच्या तोंडात एक पितळी काटेरी अस्त्र घातलं होतं. त्याच्या दोन्ही बाजूला दोरी होती. ती दोरी ओढली कि ते काटेरी अस्त्र त्या घोडयाच्या जबड्याच्या दिशेने सरकायचं. त्या अस्त्राचे काटे त्या घोड्याच्या जबड्याला टोचायचे आणि इच्छा नसतानाही घोडा नाचायचा. त्याला खिंकळताही येत नव्हतं. काही वेळा नंतर त्या घोडयाच्या जबड्याच्या कोपऱ्यातून रक्त येऊ लागलं. पण ते मुकं जनावर काहीच बोलू शकत नव्हतं. हे सारं अमानवी असलं तरी त्या घोड्याचं नृत्य नक्कीच प्रेक्षणीय होतं. सारे इच्छुक नाचे नाचायचं विसरून त्या घोड्याचं नृत्य पहाण्यात मग्न झाले होते.
No comments:
Post a Comment