Tuesday 16 September 2014

Narendra Modi, BJP : मोदींची क्रेझ संपली का ?

बिहारची पोटनिवडणूक झाली. भाजपाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. नितीश आणि लालूंनी आपापली पाठ थोपटून घेतली. आता नुकताच विविध राज्यात पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीचा निकाल हाती आलाय. मोदींचा प्रभाव संपलाय असा सुर विरोधकांनी विविध वाहिन्यांवर लावून धरलाय. पण खरं काय खरंच मोदींचा प्रभाव संपलाय ?


बिहारमधे भाजपाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. आत्ताच्या पोट निवडणुकातही भाजपाची पीछेहाट झाली आहे असं चित्र दिसतंय. भाजपला लोकसभेच्या ३ पैकी केवळ १ आणि विधानसभेच्या ३३ पैकी केवळ ११ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळेच विरोधक खुष आहेत आणि मोदींचा प्रभाव संपल्याचा त्यांना साक्षात्कार झालाय.  

पण खरंच मोदींची क्रेझ संपली आहे का ? मला नाही तसं वाटत. त्याची कारणं पुढीलप्रमाणे देत येतील - 

 १ ) देशाची सत्ता हातात आल्यानंतर पोट निवडणुकात बारीक लक्ष घालण्याची मोदींना गरज वाटली नाही. कारण या तीस पस्तीस जागा म्हणजे देशाचं राजकारण नव्हे. या पोट निवडणुकीपेक्षा अधिक प्राधान्य असलेले अनेक विषय मोदी सरकारसमोर आहेत. 

२ ) मोदींनी आणि अमित शहांनी आपापल्या बळाचा कोणताही वापर न करता काय घडतंय ते भाजपाला पहायचं होतं. 

३ ) या स्थानिक पोट निवडणुकात कोणतेही स्टार प्रचारक सहभागी नव्हते. 

४ ) उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशानं मुलायम आणि अखिलेश भारावून गेले असतील. पण बसपा निवडणुकांपासून दूर राहिल्याचा फायदा समाजवादी पार्टीला मिळालाय हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. 

५ ) राज्यस्थान , युपीमधे बीजेपीला कमी जागा मिळाल्या म्हणून बीजेपीची हवा संपली असं विरोधकांचम्हणणं आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये बीजेपी जिंकते तेव्हा ममता बनर्जींची हवा संपली असं म्हणायचं का ? 

६ ) युपी मधल्या ११ जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या पोट निवडणुकांपैकी ८ मतदार संघ हे लोकसभेला भाजपा खासदार ज्या ठिकाणी विजयी झाले नव्हते तिथले आहेत. 

७ ) मोदी काय करताहेत हे अजून सामान्य मतदारांच्या लक्षात आलेलं नाही. बीजेपीच्या अपयशाचं खापर मोदींवर किंवा अमित शहांवर फोडता येणार नाहीच पण विरोधकांच्या यशाचं श्रेयही विरोधकांना घेता येणार नाही. ४ महिन्यात विरोधकांनी अशी कोणती कामगिरी केली आहे कि ज्यामुळे त्यांनी यशावर हक्क सांगावा. 

८ ) ग्रामपंचायतीच्या आणि या पोटनिवडणुका सारख्याच. त्यात प्राबल्य असतं स्थानिक उमेदवारच त्यापेक्षा व्यापक मुद्द्यांवर उमेदवार बोलतच नाहीत आणि बोलले तरी त्याचा काही फायदा नसतो. कारण मतदार स्थानिक मुद्दे सोडुन इतर मुद्यांचा विचार करत नाहीत. 

९ ) स्थानिक किंवा प्रांतीय पक्षाचं राजकारण देशहिताच्या दृष्टीने मुळीच फायद्याचं नाही हे मतदारांच्या पुरेसं लक्षात आलेलं नाही. आम्ही देश पातळीवरच्या राजकारणासाठी अर्थातच लोकसभेसाठी भाजपाला मतदान केलं आहे आता स्थानिक प्रश्नांसाठी आम्ही स्थानिक पक्षाला मतदान करणार हा हेतू समोर ठेवून मतदारांनी मतदान केलं. 

१० ) भाजपाच्या प्रचाराची खरी ताकद एकत्रित प्रचारात आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाला तसा एकत्रित प्रचार करता आला नाही.

 पण या निकालाच्या निमित्ताने लोकसभेच्या निवडणुकात भाजपा आणि मित्रपक्षांना जे यश मिळालं त्या यशाला मोदींच्या व्यक्तिमत्वाची किनार होती हे विरोधकांना आणि मित्र पक्षांनाही मान्य करावं लागेल. 
आणि मोडी जेव्हा पुन्हा मैदानात उतरतील तेव्हा साऱ्यांनाच दबकून रहावं लागेल. 

त्यामुळेच आजच्या भाजपाच्या अल्प यशाने शिवसेनेने बाह्या आणखी मागे सारल्या असतील तर जरा सबुरीनं. कारण वेळ पडलीच तर वेगळं लढायला आणि ताकद दाखवुन द्यायला. मोदी केव्हाही तयार असतील. आणि तेव्हा शिवसेनेच्या पदरात जे पडेल ते शिवसेनेचं अधपतन असेल .

 

No comments:

Post a Comment