सकाळी सकाळीच फोन वाजला. उठालोच. उठून बसावं लागणार होतंच. कारण मी कधीही माझा फोन उशाशी ठेवून झोपत नाही. तो माझ्या पायाकडे ठेवलेला असतो. त्यामुळे उठलो. अंगावरच पांघरूण दूर केलं. फोन घेतला. पाहिलं तर शेतावरच्या माझ्या वाटेकऱ्याचा फोन. एवढ्या सकाळी का फोन केला असेल याने असा प्रश्न पडला. मनात म्हटलं, "बहुदा अवकाळी पाऊस आला असेल आणि त्याने माझा नऊ एकर गहू आडवा केला असेल."
'मन चींती ते वैरी न चिंती' असं म्हणतात ते उगाच नाही. बरं अशा वेळी हे मन सुध्दा चांगला विचार मुळीच करत नाही. सगळ्या वाईट शक्यताच मनात येतात.
कदाचित त्याच्या गाईला वासरू झालं असेल असाही विचार मनात आला. पण पहिलीच शक्यता अधिक गृहीत धरून फोन घेतला.
तर
त्याचाच आवाज. माझी सगळी शेती पाहणाऱ्या विजुचा. तो म्हणाला, "काका, सकाळी सकाळी दिवस उगवायच्या आता कोरा चहा करा. बाळूमामाचं नाव घेवून त्यात चिमूटभर भंडारा टाका. आणि तो चहा घ्या."
म्हटलं, "कशासाठी? कोरोना होऊ नये म्हणून का?"
"हो. लोकं म्हणतात. सगळीकडे तेच सुरू आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगावं." विजू म्हणाला
"ठीक आहे."
"म्हणलं तुम्हाला सांगावं की न सांगावं. परत तुम्ही म्हणताल कसल्या याच्या अंधश्रद्धा?"
मी सुशिक्षित, शहरात लहानाचा मोठा झालेलो. मी अशा अंधश्रद्धा मुळीच मानत नसेल अशी खात्री होती त्याला. पण अंधश्रद्धा कशाला म्हणायचे? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मते, देवाचं अस्तित्व स्वीकारणे ही सुध्दा अंधश्रद्धा आहे. मग ते मूर्तीला फोडून दाखवणार आणि म्हणणार बघा आहे का त्या मूर्तीत देव? देव असताना देवाला जाणाऱ्या माणसांचा देवाच्या वाटेवर मृत्यू कसा होतो? असा प्रश्न विचारणार.
जे देव मानत नाहीत त्यांना माझे एकच सांगणे, बाबांनो पाच मिनिटे श्वास बंद करून जगता येते का बघा? ऑक्सीजन ऐवजी हायड्रोजन श्वासात भरता येतो का बघा? जगण्यासाठी श्वासाची गरज ज्याने निर्माण केली त्याला मी ईश्वर मानतो. जगण्यासाठी ज्याने पाण्याची निर्मिती केली त्याला मी ईश्वर मानतो. जगण्यासाठी आवश्यक वेगवेगळ्या प्रकारची धान्य एकाच मातीतून जन्माला घालणाऱ्या अदृश्य शक्तीला मी ईश्वर मानतो. असो.
अंध श्रद्धेविषयी माझे काय मत असेल यांचा अंदाज नसलेला विजू चाचरत बोलत होता. त्याला दिलासा देण्यासाठी मी म्हणालो, "विजू, लोकांना वाटणाऱ्या एखाद्या अंधश्रद्धेमुळे आपलं चांगलं होणार असेल, त्या अंधश्रद्धेमुळे आपलं नुकसान होणार नसेल तर त्यात वाईट काय?"
मी बायकोला आवाज दिला. तिने चहा केला. बाळु मामाचं नाव घेवून त्यात दोन तीन चिमूट हळद टाकली. मी दिनदर्शिकेत सुर्योदयाची वेळ पाहिली. सूर्योदय ६.४२ ला होता. त्याच्या आत आम्ही चहा पिलो. आणि मी लिहायला बसलो.
आता जर मला एखाद्या डॉक्टरने मला सांगितले की, "कोरोना टाळण्यासाठी हे अमुक एक औषध उपलब्ध झाले आहे ते घ्या." तर, "छे छे, मला औषधाची गरज नाही." असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण विज्ञान आणि श्रद्धा यांची सांगड घालायला हवी असं मला माझ्या पुस्तकांनी आणि अनुभवाने शिकवले आहे. सगळे उपाय खुंटतात तेव्हा डॉक्टर आणि वैज्ञानिक सुध्दा त्या ईश्वराकडे आशेने पहातात. तर आपण इतर माणसं किती सामान्य.

सुंदर शब्दांकन,,,
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
Delete