Tuesday, 31 March 2020

माणुसकीचे ढोंग बंद करा.


lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी
गेली तीन चार दिवस परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे देशातील गरिबांवर हे संकट आले आहे. अशा आशयाच्या पोस्ट फिरत आहेत. गावाकडच्या मंडळींनी शहरातून गावात दाखल होऊ पाहणाऱ्या शहर वासियांचे रस्ते रोखून धरले आहेत. का?  तुमचेच कोणीतरी आहेत ना ते? सरकारने हजार वेळा सूचना देऊनही मुस्लिम
एकत्र येताहेत. मशिदीत परदेशी नागरिकांना लपवून ठेवत आहेत त्यांचे काय करतो आम्ही?

मित्रांनी देशातले जवळजवळ १.७५ कोटी तरुण जगभरातल्या विविध देशात काम करताहेत. आपल्या जिवाभावाच्या माणसांचा, आई वडिलांचा, देशाचा, इथल्या मातीचा विरह सहन करताहेत. बरं हि मंडळी देशाबाहेर गेली ती स्वतःच्या कुवतीवर. आरक्षणाच्या कुबड्या घेऊन नव्हे. कुठलं सरकारी अनुदान घेऊन नाही. स्वखर्चाने गेली आहेत.

हि भारताबाहेर काम करणारी मंडळी आपल्या देशाला दरवर्षी ५४३०८ कोटी रुपयांची परदेशी गंगाजळी आपल्या देशात पाठवताहेत. परदेशी करन्सी आपल्या देशात पाठवणाऱ्या भारतीय तरुणांचा चीनच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. हे तरुण भारतात जी रक्कम पाठवतात त्यामुळे भारतीय GDP मध्ये २.५ % भर पडते. हे तरुण देशात जे परकीय चलन पाठवतात ते आपल्या शेती उत्पन्नाच्या २५ टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला परदेशात काम करणाऱ्या या तरुणांचा मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. आणि आपण "परदेशातून येणाऱ्या या अशा मंडळींची नाके बंदी का नाही केली?" असा सवाल उपस्थित करतो. केवढा हा नीचपणा?

गावाकडची मंडळी गरजेला शहरातल्या भाऊबंदाकडे आली आहेत. अडीनडीला पैसापाणी घेऊन गेली आहेत. मनात आलं तेव्हा आजारपाण्यासाठी आपल्या शहरातल्या भाऊबंदाकडे येऊन राहिली आहेत. जाताना वाटखर्चीला पैसे नाहीत म्हणून पुन्हा त्याच्याकडूनच हजार पाचशे घेऊन गेली आहेत. गावाकडून एखादं धान्याचं पोतं शहरातल्या भावाला पाठवायचं म्हटलं कि या गावाकडच्या मंडळींच्या जीवावर येतं. "मस पैसा हाय त्याच्याकडं. त्याला का तिकडं मिळंना ना व्हय?" हाच त्यांचा सवाल. शहरातला भाऊ गावाकडे येऊच नये. आम्हाला त्याची जमीन बिनबोभाट खाता यावी. मनाला येईल तशी बांध कोरत आपल्या मांडीखाली दाबता यावी. असेच यांचे विचार. पण आज कोरोनाच्या साथीत त्यांचा भाऊबंद शहरातून गावाकडे निघाले तेव्हा मात्र गावाकडच्या भाऊबंदांनी गावाकडच्या वाटा अडवून धरल्या. म्हणजे काय तू वेशीच्या बाहेर मेला तरी चालेल. आम्हाला मात्र इथे सुखाने जगू दे. किती हा जगण्याचा नीचपणा.

सोसायट्यांनी परदेशातून आलेल्या व्यक्तींना सोसायटीमध्ये प्रवेश नाकारले. मग समाजज माध्यमांवर आम्ही माणुसकीची चाड असणाऱ्या ज्या पोस्ट टाकतो तो, कँडल मार्च काढतो, निषेध व्यक्त करतो तो सर्व निव्वळ देखावाच असतो म्हणायचे तर. कशासाठी? काही केले तरी तुम्हालाही एक ना एक दिवस मरण येणार आहेच ना. मग हातात हात घेऊन संकटाला तोंड द्या ना. खरंच फारच गंभीर परिस्थिती असेल तर त्यातून धीराने मार्ग काढा ना. मग आपल्या रक्ताच्या नात्याला दूर लोटायचं आणि रस्त्यावरील अनोळखी भिकाऱ्यासाठी सहानभूती दाखवायची असले हे माणुसकीचे ढोंग बंद करा.

एक सामान्य कोरोना काय आला. आपल्याला माणुसकीचा विसर पडला. एक ना एक दिवस कोरोना जाणार आहेच. होऊन होऊन काय होईल? पाच दहा हजारांचा बळी जाईल. पण आपल्यातली माणुसकी तर टिकवून ठेवायला हवी.  

No comments:

Post a Comment