Thursday, 5 March 2020

तुमच्या घरात चालेल का समलिंगी?


परवा एका वर्तमान पत्रात समलिंगी तरुणांना समजून घ्यायला हवे अशा आशयाचा लेख वाचला. विशेष म्हणजे हा लेख एका स्त्रीने लिहिला होता. म्हणजे पुरुषाने लेख लिहिला असता तर मला फार आश्चर्य वाटले असते नसते असे नाही. परंतु
एक स्त्री समलिंगी संबंधाचे समर्थन कसे करू शकते असा प्रश्न मला नक्कीच पडला. असे लेख लिहिणारी मंडळी आम्ही समाजाला मानवतावादी दृष्टिकोन देतो आहोत असा आव आणतात. परंतु समलिंगी संबंध हि विकृती आहे, मानसिक रोज आहे. आणि त्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करणे गुन्हा मानायला हवा.

गे मंडळी त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढतात, रस्त्यावर उतरतात  मीडिया त्याला प्रसिद्धी देते. अशा मोर्चांचे फोटो छापते. आणि अशा संबंधात अडकलेल्या मंडळींना असे संबंध ठेवणे हा तुमचा अधिकार आहे अशी फूस लावते.

परंतु अशा प्रकारे समलिंगी संबंधाचे समर्थन करणाऱ्या मंडळींच्या घरात अशी विकृती जन्माला आली तर ते त्याचा आनंदाने स्विकार करतील काय? समलिंगी विकृती असलेल्या मंडळींना जगण्याचा अधिकार नाही असे मी मुळीच म्हणत नाही. परंतु त्यांच्यातील विकृतीचे जाहीर समर्थन करणे केव्हाही चुकीचेच.

मानसशास्त्रीय संबंधांचा अभ्यास करणारे, स्वतःला मानस शास्त्राचे अभ्यासक म्हणवणारे अथवा समोपदेशक हि बिरुदावली मिरवणारे अशा विकृतीच्या मुळाशी जाऊन त्यांचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न का नाही करत? दोन तरुण अथवा दोन तरुणी एकत्र राहिल्या तर समाज तिकडे संशयाने पहात नाही. शिवाय काही अंशी का असेना लैंगिक भावनांचे क्षमन होते. म्हणून समलिंगी संबंध निर्माण होण्याचे प्रमाण वाढते आहे. आता तर काय सुप्रीम कोर्टानेच समलिंगी संबंध कायदेशीर ठरविल्यामुळे अशा गोष्टींचे समर्थन करणाऱ्या मंडळींना बळ प्राप्त झाले आहे.

परंतु सुप्रीम कोर्टात समलिंगी संबंधांना वैध ठरविणाऱ्या न्यायाधीशांच्या, त्यासाठी लढा देणाऱ्या वकिलांच्या अशा संबंधांचे समर्थन करणाऱ्या तमाम मंडळींच्या घरात अशा विकृती जन्माला आल्या तर त्यात नेमकी काय आणि कशी मानहानी असते हे संबंधितांच्या लक्षात येईल.

मध्यंतरी बीड पोलीस दलातील महिला पोलीस म्हणून रुजू झालेल्या ललिता साळवे हिला नौकरीत कायम ठेवण्यात आले आणि तिच्यातील मानसिक, शारीरिक बदलांची दखल घेत लिंग परिवर्तनाची परवानगी देण्यात आली. या संपूर्ण घडामोडींवर वेळोवेळी बातम्या झळकल्या. अगदी आता ललित झालेल्या त्या ललिताने एका मुलीशी विवाह करेपर्यंत मीडिया त्या घटनेचा पाठपुरावा करत होती. आणि यापुढेही मीडिया त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा पाठपुरावा करत राहील. त्याविषयी बातम्या पेरत राहील.

कारण एकच अशा सर्व मंडळींना सामाजिक संस्कार आणि रितीरिवाज मोडून काढायचे आहेत. परंतु या सर्व तथाकथित ज्ञानी मंडळींनी समलिंगी संबंध हि अनैसर्गिक बाब असून मानसिक विकृती आहे हे समजून घेत अशा गोष्टीचे समर्थन करण्याऐवजी तअशा संबंधाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांची बुद्धिमत्ता खर्च केली तर ते अधिक समाजहिताचे ठरेल.

कीड लागलेल्या झाडावर औषध फवारणी करून आपण त्यावरील कीड दूर करण्याचा प्रयत्न करतो. समलिंगी संबंधांच्या बाबतीत सुद्धा अशीच भूमिका घ्यायला हवी ना. कि ती कीड संपूर्ण मानवजातीत पसरावी यासाठी प्रयत्न करणार आहोत आपण?

मीडियाने अशा गोष्टींना प्रसिद्धी देण्याचे थांबविले तरी पुरेसे होईल.

No comments:

Post a Comment