परवा मोदींनी दिवे लावायचं आव्हान केलं आणि त्यावर टिकेची झोड उठली. खरंतर हे टीका करणारे मुठ्भरच असतात. परंतु त्या मूठभर लोकांना दिली कि सगळ्या जगातून मोदींना विरोध आहे असा आभास निर्माण करता येतो. मग मोदींनी काय बोलायला हवे होते हे
सांगण्याची चढाओढ लागली. बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, छगन भूजबळ, नबाब मलिक हे तर बोलणारच. परंतु ज्याला स्वतःचे चार आमदार आणि दोन खासदार निवडून आणता येत नाही तो राजू शेट्टी सुद्धा पंतप्रधानांनी काय बोलायला हवे होते हे सांगू लागले.
त्यात भरीस भर म्हणून फेसबुकवरील विचारवंत, अर्थतज्ञ, उद्योजक आपले विचार मांडण्यासाठी सरसावले. अनेकांनी अनेक प्रकारे आपली मते मांडली.
कोणी म्हणाले, "मोदींनी या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगायला हवा होता."
कोणी म्हणाले, "व्हेन्टिलेटरची व्यवस्था कशी केली जाणार आहे त्याविषयी बोलायला हवे होते."
कोणी म्हणाले, "यातून बाहेर पडल्यावर अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातील ते सांगायला हवे होते."
कोणी म्हणाले, "करोनावर मात करण्यासाठी नेमक्या काय आणि कशा उपायोजना केल्या जाणार आहेत ते सांगायला हवे होते."
कोणी म्हणाले, "जागतिकरणावर आणि शेती व्यवसायावर या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे ते सांगायला हवे होते. "
अनेकांनी उपहासात्मक पोस्ट लिहून मोदींच्या आव्हानाची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला.
या सर्व मंडळींना मला विचारायचे आहे, "जे तुम्हाला कळते आहे तो मोदींना का कळत नाही." परंतु वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांवर देशातल्या सगळ्याच जनतेशी बोलण्याची गरज नाही. यातील अनेक गोष्टी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती कराव्यात अशा आहेत. अनेक बाबी या त्या त्या क्षेत्रातील तज्ञांशी बोलाव्यात अशा आहेत. अनेक बाबी या देश कोरोना मुक्त झाल्यावर बोलाव्यात अशा आहेत. परंतु जे मोदींना कळते ते या तथाकथित विचारवंतांना कसे कळावे?
एकीकडे संपूर्ण जग कोरोना विरोधातील जागतिक लढ्याचे नेतृत्व मोदींनी करावे यासाठी साकडे घालते आहे आणि आम्ही मोदी कसे चूक याविषयी शंख करत बसलो आहोत. बाबांनो कोरोना जाईलच पण मोदींनी काय करायला हवे होते हे सांगत बसण्यापेक्षा आज रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे लावा. त्यात ना तुमचे नुकसान आहे ना देशाचे? अकलेचे दिवे पाजळण्यापेक्षा रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे लावणे केव्हाही योग्य. नाही का.?

No comments:
Post a Comment