Friday 17 April 2020

भोगी पेक्षा योगी उत्तम

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी
काही मंडळींच्या डोळ्यावरची झापडं दूर होत नाहीत. काँग्रेसने ६० हुन अधिक वर्षे या देशात राज्य केलं आहे. आणि आपण केवळ सहा वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारला जाब विचारतो आहोत. ६० वर्षात काँग्रेस वीज, पाणी, शेतीमालाला हमीभाव हे प्रश्न सोडवू शकली नाही आणि
आपण सहा वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदींना प्रश्न विचारतो आहोत. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पवारांसारखा जाणता (खरंतर नेणता..... ) राजा म्हणतो कि ज्या मोदींना परिवार नाही त्यांना जनतेच्या समस्या कशा कळणार? योगी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हाही अनेकांनी असेच प्रश्न उपस्थित केले. परंतु मोदी आणि योगी यांनी ज्या रितीने राज्यकारभार केला त्यावरून भोगी नव्हे तर योगीच या देशाला दिशा देऊ शकतात हे स्पष्ट झाले आहे.

३७० कलम रद्द केले, तीन तलाक कायद्याला मूठमाती दिली, राम मंदिराचा प्रश्न सोडवला, काश्मीर प्रश्न सोडवला, सहा वर्षात एकदाही २६/११ झाले नाही, संसदेवर अतिरेकी हल्ला झाला नाही, देशाची आंतरराष्ट्रीय राजकारणातली प्रतिमा कमालीची उंचावली आहे. काँग्रेसच्या ६० वर्षाच्या राजवटीत यातले काहीही झाले नाही. ते मोदींनी ६ वर्षात करून दाखवले आणि तरीही या देशातल्या काही नतद्रष्ट मंडळींना मोदींचे मोठेपण लक्षात येत नाही. कोणती झापडं आहेत यांच्या डोळ्यावर?

परंतु मोदी, योगी यांच्यासारखी मंडळीच या देशाला पुढे नेऊ शकतील. कारण त्यांना ना आपल्या पुतण्याला आमदार करायचंय, ना मुलीला खासदार करायचंय, ना नातवंडांसाठी काही कमवून ठेवायचं, ना भावाला फायदा मिळवून द्यायचाय. ना सुनेला महामंडळ दयायचंय ना स्वतःसाठी राजवाडा बांधायचाय. जनता हाच त्यांचा परिवार. योगी आपल्या वडिलांना कोणता शब्द देणार नाहीत, त्यासाठी जनतेला वेठीला धरणार नाहीत. त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नाही. आपल्या पोराला कॅबिनेट मंत्री करायचं नाही. बायकोला कुठलं महामंडळ द्यायचं नाही.

एकनाथ खडसेंना डावलून फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं. कारण फडणवीस यांच्या मागे त्यांचं कुणी खुर्चीवर दावा सांगणार नाही. त्यांनी आपल्या बायकोला कुठलं पद दिलं नाही. खडसेंच तसं नव्हतं त्यांनी सून खासदार हवी होती, मुलगी आमदार हवी होती, स्वतःलाही मुख्यमंत्री व्हायचं होतं. पक्षाने हे बघितलं म्हणून त्यांना दूर ठेवलं. आणि विष पेरणाऱ्या मंडळींनी, बहुजन खडसेंना दूर ठेवून बामणाला मुख्यमंत्री केलं अशी ठिणगी टाकली.

मोदी, योगींना केवळ जनतेचं हित महत्वाचं. परंतु काही जणांची अवस्था चमकीसाठी रुसून बसणाऱ्या बायकोसारखी झाली आहे. जनतेला कार्यक्षम पंतप्रधान मिळाले याचा आनंद नाही, आमचे भ्रष्टाचाराचे मार्ग बंद होताहेत याच दुःख आहे. त्यांचं एकच धोरण देशाचं काहीही होऊ द्या. आमचे खिसे भरा. पगार वाढवा. टॅक्स कमी करा, अधिकाधिक अनुदान द्या. कारण काही नाही हो, आम्हाला आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी इस्टेट मागे ठेवायची आहे ना.

मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करता येत नाहीत, त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना कोणतेही लाभ मिळवून दिल्याचे दिसत नाही. म्हणून हा राहुल गांधी 'मोदीने इस हाथसे ३० हजार करोड निकाले और ऊस हाथसे अंबानींके जेब मे डाल दिए.' परंतु असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवायला जनता खुळी नव्हती. म्हणूनच विरोधकांनी हरबाजूने हल्ला केला, मोदींना पराभूत करण्यासाठी सत्तेतून खाली खेचण्यासाठी जंगजंग पछाडलं, महाआघाडीच्या फुसक्या घोषणा दिल्या परंतु जनतेने मोदींना २०१४ पेक्षा अधिक मताधिक्यांनी सत्तेत आणलं. आणि २०२४ ला मोदी २०१९ पेक्षा अधिक खाद्यसरांसह सत्तेत येतील.

कारण भोगीपेक्षा योगी उत्तम हे जनतेच्या लक्षात आलं आहे. भाजपने देशाला वाजपेयी, मोदी, योगी, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज यांच्यासारखे अनेक निस्वार्थी नेते दिले. इतर कोणत्याही पक्षात असा एखादा निस्वार्थी नेता असेल तर दाखवून द्या.

8 comments:

  1. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete
  2. Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete
  3. मस्त, खूपच उत्तम प्रकारे आपण आपलं मत माडले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

      Delete
  4. खरचं भोगी पेक्षा योगीच बरे...

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

      Delete