Wednesday 8 April 2020

अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाडांच्या अंगरक्षकांनी बेदम मारहाण केली

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी


दोन दिवसापूर्वी अनंत करमुसे या तरुणाला जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर नेऊन जनावरासारखी मारहाण करण्यात आली. त्याविषयीचे फोटो पाहिल्यानंतर मी हबकलोच. हीच का लोकशाही? यासाठीच का एकमेकांच्या शेपट्या धरून हे सत्तेत आले? राज ठाकरेंचे समर्थक त्यांच्या विरोधात लिहिले कि झुंड शाही करत दारात येणार, शिवसेनेचे समर्थक भगवा  दादागिरी करणार, दादांचे, साहेबांचे समर्थक वेगळेच, संभाजी ब्रिगेड राम गणेश गडकरी यांच्यासारख्या लेखकाच्या पुतळ्याची विटंबना करणार आणि तरीही
या देशातली काही मंडळी असल्या मंडळींचं समर्थन करतात. यासाठी का सत्ता हवी असते यांना?

खरेतर मी कालच यावर लिहू शकलो असतो. परंतु पुरेशी आणि योग्य माहिती घेतल्या शिवाय मी लिहीत नाही. त्यामुळेच फेसबुकच्या माध्यमातून हि बातमी  कळल्यानंतर मी कालपासून या घटनेची माहिती घेत होतो. परंतु अनंत करमुसे यांची पोस्ट आव्हाडांनी डिलीट करायला लावली. आज आव्हाड म्हणताहेत माझी कौटुंबिक बदनामी केली. पुरावा काय? आव्हाड म्हणताहेत, कि त्या तरुणाला मारहाण झाली त्यावेळी मी तिथे नव्हतोच. मी माझ्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपाचे खंडन करतो.

मित्रांनो निर्भयाच्या बलात्काऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावरील आरोप स्विकारले नव्हतेच. आरोप नाकारले कि ते एकतर सिद्ध होत नाहीत. आणि सिद्ध झाले तरी त्यासाठी वर्षानुवर्षांचा कालावधी जावा लागतो. परंतु जनता या सगळ्याचा न्याय करेल आणि कोणी पावसात भिजलं म्हणून जनता भुलणार नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं.

नशीब यांनी अनंत करमुसेला मारहाण करून सोडून दिले. उद्या मारून कुठल्या गटारात फेकून दिले असते तरी कळले नसते. हातात सत्ता असते तेव्हा काहीही करणे शक्य असते. राम कदम यांनी दहीहंडीच्या उत्सवात एक विधान काय केले, सगळ्या पत्रकारांनी त्यांना सळो कि पळो करून सोडले होते. आठ दिवस ती बातमी चालवली गेली होती. प्रसन्न जोशी या एबीपी माझ्याच्या वार्ताहराने तर तुम्ही जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागणार नाही तोवर आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओची पायरी चढून देणार नाही अशी भाषा वापरली होती. परंतु अनंत करमुसे या प्रकरणात मात्र सगळेच पत्रकार मूग गिळून गप्प आहेत.

फेसबुकवरून या घटनेविषयी कळल्यानंतर काल मी दोन तास वेगवेगळी मराठी न्यूज चॅनल पाहिली. दोन चॅनलवर हि बातमी साधारणपणे १० सेकंड दाखविण्यात आली. एका चॅनलवर काहीवेळ बॉटम स्ट्रीप चालवली गेली. बस. आणखी काही नाही. खरेतर पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस कर्मचारी, मुख्यमंत्री, गृहमंत्री, दादा, काका या सगळ्यांचा पाठपुरावा त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया नोंदवली जायला हवी होती. पण तेच, बातमी कशी रंगवयची याचा विचार करून रंगवली जाते. काळ त्याचाच अनुभव घेतला.

रात्री बारा वाजता पोलीस घरी कोणाच्या सांगण्यावरून आले? त्यांच्याकडे अटक वॉरंट होते का? जे पोलीस अधिकारी म्हणून आले ते खरेच पोलीस अधिकारी होते का? कि पोलीस अधिकाऱ्याचा वेष परिधान करून आलेले जितेंद्र आव्हाडांचेच गुंड होते? जर ते पोलीस अधिकारी होते तर त्यांनी अनंत करमुसेला जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर कसे पोहचवले? मुळात सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांच्या, बदल्या, पदोन्नती हि या राजकीय पुढाऱ्यांच्याच हातात असते त्यामुळे आम्ही आम्ही जनतेचे सेवक आहोत असे ते सांगत असले आणि काही प्रमाणात तसे वागत असले तरी वेळप्रसंगी नेत्यांच्या हातातील बाहुले असल्याप्रमाणेच वागतात.

अनंत करमुसे तर फार छोटे व्यक्तिमत्व आहे. साध्वी प्रज्ञासिंह सारख्या स्त्रीला नऊ वर्षे तुरुंगात खितपत पडावे लागते. अनन्वित छळ सोसावा लागतो. जोवर भाजपची सत्ता येत नाही तोवर तिची सुटका होण्याची शक्यताही निर्माण होत नाही. हिंदुत्वाला 'हिंदू आतंकवाद' हा शब्दप्रयोग चिटकवला जातो त्यावेळी या देशात खरेच लोकशाही आहे का? असा प्रश्न पडतो. मोदींनी लोकशाहीची गळचेपी केली, मोदींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, मोदी हिटलर आहेत असे आरोप करणारे जितेंद्र आव्हाड, सदवही प्रज्ञासिंग यांच्या बाबतीत जे घडते तेव्हा काहीच का बोलत नाहीत.

महाभकास आघाडीचा पापाचा घडा भरला आहे. कोरोना जाईलच. पण जाताना या लोकविरोधी सरकारचा बळी नक्की घेईल. 

7 comments:

  1. खूप परखड आणि वास्तविक लेखन, तुमच्या लेखणीची धार खूप तेज आहे. सलाम.

    ReplyDelete
    Replies
    1. मनपूर्वक धन्यवाद.

      Delete
  2. वास्तव!पण हे कांही प्रथमच घडले नाही!ज्यांचा आदर्श समोर ठेऊन,जितेन्द्र आव्हाड सारखे हजारो लोक राज्याच्या राजकारणात आहेत,त्यांची कार्यपध्दती अशीच राहीली आहे!याचीही अनेक ऊदाहरणे देता,येतील.ज्यांची बाहेर मिडीयात सभ्य,पुरोगामी,संविधान प्रेमी अशी प्रतिमा आहे,यातील बोटावर मोजता येतील,अशा 4/2 नेत्यांचा अपवाद वगऴता,सर्वांची पार्श्वभुमी अगदी अशीच आहे!केन्द्र व राज्याची अनिर्बंध सत्ता,व सतेतेतुन मिळविलेली अवैध संपत्तीमुळे हा माजोरपणा यांच्यात जन्मजातच(राजकीय)आला आहे,विजयजी!

    ReplyDelete
    Replies
    1. आणि तरीही या सगळ्याला आम्ही लोकशाही म्हणतो. सगळेच दुर्दैवी.

      Delete
    2. विजय सर मागे बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले त्यावेळी ब्रिगेडी लोकांनी त्यावर गदारोळ केला होता. त्या ब्रीगेडींचे म्होरके एका टीव्ही डिबेटमध्ये इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना कुठल्या भाषेत धमकावत होते तेही आठवा. मात्र त्यावेळी प्रसन्न जोशी आव्हाडला सभ्य भाषेत बोला असेही म्हटला नाही. हेच आव्हाड अर्नबच्या डिबेटमध्ये अशीच भाषा करू लागले तेव्हा अर्नबने त्यांना डिबेट बाहेर केले होते.

      Delete
    3. V.S.Tondale, जी, म्हणता ते खरे आहे. परंतु आपल्या देशातली पत्रकारिता विकावू आहे. ती बातम्या देत नाही बातम्या बनवते. परंतु जनता सुज्ञ झाले हे आहे हेच तेवढे समाधानाचे.

      आणखी एक म्हणजे आपण कॉमेंट करताना reply वर क्लिक न करता enter your comment इथे क्लिक करावे.

      Delete