Tuesday, 19 May 2020

'च' लावून आत्मनिर्भर होता येत नाही उधोजी

cartoon by vijay shendgeचार दिवसापूर्वी आठ वाजता मोदीजी देश वासियांना संदेश देणार होते. साडेसात ते आठ मी पाच पन्नास पावले फिरायला बाहेर पडतो. त्यामागे
फिरण्यापेक्षा पाय मोकळे करणे हाच हेतू असतो. सकाळपासून घरत बसून कंटाळलो होतो. आठ वाजता मोदींच भाषण होतं म्हणून पाच सात मिनिट लवकर यायचं ठरवलं होतं. पण पाच मिनिट उशीर झालाच. रस्त्यातून येताना आणि दुसऱ्या मजल्यावरील माझ्या फ्लॅटवर जिने चढून घरी पोहचेपर्यंत प्रत्येक घरात टिव्हीवर मोदींचं भाषण सुरु असलेलं दिसत होतं. शंभर टक्के म्हणायला हवं, पण तसं नाही म्हणणार मी. परंतु देशातली जवळ जवळ ९० टक्के जनता मोदींचं भाषण बघत होती.

मोदी अत्यंत मुद्देसूद बोलत असतानाही पाच मिनिटात काही गुलामांच्या' मुद्द्याचं बोला' अशा पोस्ट सुरु झाल्या. मुद्द्याचं म्हणजे काय? तर आमच्या खिशात काही पडणार आहे कि नाही ते सांगा असं.  वर्षानुवर्षे स्वतःला सहकार सम्राट, आणि साखर सम्राट म्हणवणाऱ्या साहेबांनाही साखर उद्योग अडचणीत असल्याचे जाणवायला लागले. पण साहेब एकूण सहकारउद्योग आणि साखर उद्योग गोत्यात का आला आहे? असा प्रश्न देशातला कोणताही पत्रकार त्यांना विचारणार नाही.  

उधोजी सुद्धा या दोन महिन्यात अनेक वेळा कोरोनाचं निमित्त करून टिव्हीवर झळके. त्यांचं भाषण ऐकायला सुरुवात केली कि यात पाच मिनिटात विट येतो आणि मी दुसरा चॅनल लावतो. माझ्यासारखीच परिस्थिती अनेकांची होत असेल. तसे गुलामांच्या अपेक्षेप्रमाणे ते अगदी मुद्देसूद बोलत असतात. कोरोना जाणार'च'. महाराष्ट्रातली जनता कोरोनाला पराभूत करणार'च'. हे सगळे माझे सैनिक आहेत. ते कोरोनाशी मुकाबला करताना कधीही मागे हटणार'च' नाहीत. वगैरे वैगेरे. 'च' वर उद्धवरावांचं एवढं प्रेम का? ते मला न सुटलेलं कोडं आहे. नुसतं पैसे खाणार म्हणून भागत नाही. पैसे खाणार'च' म्हटलं कि प्रत्येक ठिकाणी पैसे खाण्याचा अधिकार प्राप्त होत असावा म्हणून त्यांचं 'च' वर जास्त प्रेम असावं असं मला वाटतं. 'च' लावल्याशिवाय १२५ कोटींची प्रॉपर्टी कशी होऊ शकेल नाही का?  

'च' लावण्यामुळे निग्रह व्यक्त होतो. असं मी मराठी व्याकरणात शिकलो आहे. उदा. मी जेवणार आणि मी जेवणार'च' यात च लावल्यामुळे मला भूक असो वा नसो मी जेवणार आहे असा अर्थ अभिप्रेत होतो. मी जेवणार'च' म्हणणाऱ्या माणसाने टोपल्यात काही आहे कि नाही याचा विचार करायला हवा ना. टोपल्यात नसेल तर काय खाणार. अर्थात ज्याला लाज नसेल तो भीक मागून आणेल आणि जेवले'च'. उधोजी रावांचे काहीसे तसेच चालू आहे. गेल्या दोन महिन्यात कोरोना आटोक्यात यावा यासाठी कृती काय? किती बेड उभे केले? किती टेस्ट केल्या. या सगळ्यापेक्षा आम्ही अत्यंत कडक लॉक डाऊन पाळणार'च' असं  म्हणत लॉकडाऊन नीटसा पळाला असता तरीही आज राज्यातली परिस्थिती वेगळी दिसली असती. 

पण कोरोनाचे काही होवो. उधोजी आमदार झाले'च'. आणि मुख्यमंत्रीपदी कायम राहिले'च'. हे मात्र खरे. .   

6 comments:

 1. नारायण राणे याना भाजपमध्ये आणून शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचा बेत फसला म्हणून एवढे आकांडतांडव कशासाठी. पराभव मान्य करून पुढे चला.

  ReplyDelete
  Replies
  1. कुणालातरी नेस्तनाबूत करण्यासाठी एखाद्याला पक्षात घेण्याची वेळ भाजपवर आलेली नाही. येणार नाही. २ खासदार ते ३०० खासदार अशी झेप घेणं याला स्वबळ म्हणतात? ५६ आमदार असणाऱ्या शिवसेनेला विजयी कसे म्हणायचे?

   Delete
 2. २ खासदार ते ३०० खासदार पैकी स्वतः चे कीती आणि चांगभलं म्हणून आलेले किती आहेत
  सर हे जगाला माहीत आहे सगळे सारखे आहेत पण एखाद्याला काम करु द्या ना भारतावर ही वेळ आली कशी
  कोरोणा आला कसा या वर पण बोला थोडे किती ही अंधभक्ती जगा आणि जगू द्या सर्वांना कळत सर्वांना काय खरं
  आणि काय खोटं आहे ते 🙏🙏🌷🌷

  ReplyDelete
  Replies
  1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

   Delete
 3. Replies
  1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

   Delete