Saturday 27 September 2014

BJP, Narendra Modi : मोदी आणि लांडगे

खालचं कार्टून नक्की पहा. चित्रं नेटवरून घेऊन त्यात काही बदल केले आहेत. उद्गार मात्र माझे आहेत. 
















५ रुपयाची बियर आता ८० रुपयाला मिळू लागली 
म्हणून काय जनता दारूची दुकानं जाळू लागली . 

१ रुपयाची कोकाकोला आज १२ रुपयाला मिळू लागला 
म्हणून अमेरिकेचा पुतळा कुणी पेटवून नाही दिला.  

१५ रुपयाचा Mac-Donald बर्गर ५५ ला मिळू लागला 
म्हणून रस्त्यावर येऊन कुणी बंद नाही पुकारला. 


५ रुपयाचं चिप्सचं पाकिट आता २५ ला मिळू लागलं 
म्हणून कुणी चिप्सचं खाणं बंद नाही केलं.   

२५ रुपयाचं सिनेमाचं तिकीट ३०० ला मिळू लागलंय 
म्हणून कुठं कुणी उपोषणाला बसलंय ?  

आणि साखर २ रुपयांनी महाग झाली 
तर टिव्हीवर ब्रेकिंग न्यूज आली.   

१० रुपयांचं रेल्वे तिकीट ११ रुपये  ४० पैश्याला झालं 

आणि काँग्रेससह साऱ्या विरोधकांना भलतच रडू आलं.

३ महिन्यात पेट्रोल ६ रुपयांनी स्वस्त झालं
सोनंसुद्धा ३१ वरून २४ वरती आलं. 

कांदा होऊ दिला नाही १०० रुपये किलो
तरी देश म्हणतो, " साथ स्थानिक पक्ष के चलो." 

कुठलाच पक्ष मराठीला घालत नसतो खतपाणी
तरी आम्ही म्हणत असतो शिवसेना सर्वगुणी.       

काँग्रेस दहा वर्षात एका
"सरबजीत सिह" ला भारतात परत आणू शकलं नाही आणि मोदी सरकारनं १५ दिवसात इराकमधल्या अतिरेक्यांच्या तावडीत सापडलेल्या २०० हून अधिक भारतीयांना सोडवलं. 

उत्तर प्रदेशातल्या आणि काश्मीर मधल्या पुरात सापडलेल्या प्रत्येकाला सोडवायला मोदी सरकार धावलं. 
तेव्हा त्यांनी फक्त हिंदूंना वाचवून मुस्लिमांना प्रवाहात नाही वाहू दिलं. 

आणि तरीही विरोधक मोदींना जातीयवादी म्हणणार.
स्वतः जातीवर आधारित आरक्षण देत मोदींच्या नावानं कहणानार .   

भले मोदी कुठल्याही दुर्घटना स्थळी भेटीला नाही गेले. 
आणि  हेलीकॅप्टरमधे बसुन अन्नाची पाकिटं वाटत मिडीयाला सामोरे नाही झाले . 

मोदी नाही गेले कुठल्याच दुर्घटनाग्रस्तांच्या छावणीत, 
आणि मोदी नाही आडकले मिडीयाच्या दावणीत. 
 
मतदार बंधुंनो हे सारं लक्षात घ्या. 

बटाटे आणि कांद्याच्या भावाच्या पलिकडे विचार करून पहा. 

आम्हाला विचार स्वतंत्र आहे म्हणून आम्ही मोदींनी शिक्षकदिनी दिलेल्या भाषणावर आक्षेप घेतो आणि काँग्रेसन शिक्षणाच्या मांडलेल्या बाजाराकडे सोयस्कर डोळेझाक करतो. 

पण मित्रांनो एकटया मोदींनी कुणा कुणाला तोंड द्यावं. 

पाकिस्तान मोदींच्या विरोधात ! 
अमेरिका मोदींच्या विरोधात ! 
काँग्रेस मोदींच्या विरोधात ! 
राष्ट्रवादी मोदींच्या विरोधात !
जेडीयू मोदींच्या विरोधात ! 
समाजवादी मोदींच्या विरोधात !  
बसपा मोदींच्या विरोधात ! 
तृणमूल मोदींच्या विरोधात !  
काँग्रेस मोदींच्या विरोधात ! 
आणि आपही मोदींच्या विरोधात !

पण लक्षात ठेवा दहा वाघ एकत्रितपणे कधीच कुणावर चालून जात नसतात 
मात्र एका वाघावर एकत्रितपणे चालून जाणारे नक्कीच लांडगे असतात.  

गरिबी हटाव म्हणत काँग्रेसन या देशावर वर्षानुवर्ष राज्य केलं. 
आणि फुकट पाणी देतो म्हणणाऱ्या केजरीवालच गंगेत घोडं न्हालं. 

पण मोदी म्हणतात -

"न तो मैं मुफ्त पानी दूँगा ,
ना ही मुफ्त भोजनकि बात करूंगा ,
बल्कि मैं इतने रोजगार पैदा करूँगा,
भारत के युवाओं को इतना सक्षम कर दूंगा,
की मेरे देश का हरेक व्यक्ति
स्वाभिमान से अपना भी पेट भरेगा
और दूसरों की भी प्यास बुझाएगा"
 

दोष मोदींचा नाही आमचा आहे, 
जो फुकट देईल त्याचा इथं हरेक चमचा आहे. 
 

मत विकणारी आमची लोकशाही, 
साप साप म्हणत बडवते भुई. 

आता हे बस झालं मित्रांनो, 

मतदार जागा करा देश जागा होईल. 
आमचा देश पुन्हा उन्नतीचे गीत गाईल.    

मित्रांनो हो पोस्ट पूर्ण वाचा. हे सारं पटलं असेल तर प्रतिक्रिया दया. हि पोस्ट शक्य तेवढी फॉरवर्ड करा.


 

8 comments:

  1. अनय कुलकर्णी30 September 2014 at 11:48

    सर मोदी कुणाला घाबरत नाहीत. ते या देशाला नक्कीच चांगले दिवस दाखवतील.

    ReplyDelete
  2. मोदी कुणाला घाबरत आहेत असं मी माझ्या लेखात कुठही म्हणालो नाही. पण एका माणसावर सगळ्यांनी चालून जाण योग्य नाही ना. आणि इतर कुणीही कितीही मोदींच्या विरोधात असू दे मतदारांनी मोदींना साथ दिली तर मोदी सगळ्या जगाला पुरून उरतील.

    ReplyDelete
  3. लोकांना कळतंय पण विरोधकांना कधी कळणार. या विरोधकांनी आजपर्यंत देशाचं कल्याण केलं नाही. पण मोदींच्या मात्र कायम विरोधात बोलणार

    ReplyDelete
  4. विरोधक त्यांचं काम करताहेत. मोदी त्यांची चिंता करत नाहीत आणि आपणही करण्याचं कारण नाही. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  5. तरी लांडगे सुधरणार नाहीत
    भावनेला शब्दात कसे व्यक्त करू..
    बस असे समझा
    आज सार्या शब्दाचा दुष्काळ पडला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. रमेशजी भावना पोहचल्या.

      Delete