Friday 14 November 2014

Marathi Blog : मराठी ब्लॉग लेखनाची स्पर्धा

खरंतर हि पोस्ट परवाच लिहायला घेतली होती. पण वीज गेली. ती आली संध्याकाळी ५ वाजता. पाच वाजता पीसी सुरु केला तर नेट  कनेक्ट होईना. मग कस्टमर कंप्लेंट. आज त्यांचा टेक्निशियन आला. नेट सुरु झालं. लगेच अर्धवट लिखाण सुरु केलं. मित्रांनो indiblogger हि ब्लॉगची डिरेक्टरी ब्लॉग लेखकांसाठी अनेक स्पर्धा आयोजित करते. पण
त्यातल्या अधिकाधिक स्पर्धा या केवळ इंग्रजी भाषेतील ब्लॉगसाठी असतात. त्यामुळेच मराठी ब्लॉगर त्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत. indiblogger कडे स्पर्धांसाठी अनेक प्रायोजक असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करतात. आणि बक्षिसेही सन्मानजनक असतात. मराठी ब्लॉगला आणि ब्लॉग डिरेक्टरीला प्रायोजक नसल्यामुळे त्यांना इच्छा असूनही स्पर्धा आयोजित करणे जमत नाही. पण तरीही ' माझी वाड्मय शेती '  हा ब्लॉग नियमित लिहिणाऱ्या आणि अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे जनक असणाऱ्या गंगाधर मुटे यांनी त्यांच्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातुन मराठी ब्लॉग लेखनाची स्पर्धा आयोजीत केली आहे. पाच सहा दिवस उरलेत तेव्हा त्वरा करा. मराठी ब्लॉग लेखन स्पर्धेत भाग घ्या. 

स्पर्धेच्या नियम व अटी  जाणुन घेण्यासाठी   येथे क्लिक करा. 

प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा. 

प्रवेशिका सादर करण्यासाठी अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०१४. तेव्हा त्वरा करा. 

2 comments:

  1. धन्यवाद विजयजी,
    आभारी आहे.

    ReplyDelete
  2. गंगाधरजी आपण माझ्या या ब्लॉगला बहुदा पहिल्यांदाच भेट देताय. रिमझिम पाऊसवर आपले स्वागत आहे.

    ReplyDelete