Sunday 16 November 2014

MIM, BJP, Shivsena : एमआयएमचा विजय आणि हिंदुत्वाचा पराभव

आमचा समाज कोणत्याही गोष्टीची दखल फार त्वरेने घेतो. केजरीवालांचंच पहा ना. दोन वर्षापूर्वी या माणसाचं नावही कुणाला माहित नव्हतं. तो आण्णांच्या आंदोलनाचा आधार घेऊन पुढे येतो. आणि लगेच दिल्लीचा मुख्यमंत्री होतो. गेली १४ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या मोदींना तरी चार वर्ष पुर्वी कोण ओळखत होतं ? पण पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन भाजपानं त्यांचं नाव जाहीर केलं आणि गेल्या वर्षभरात मोदींच नाव प्रत्येकाच्या तोंडी झालं. तेच MIM या पक्षाबाबतीत. विधानसभेला त्यांचे दोन आमदार काय निवडुन आले आणि
अनेकांना जगबुडी आल्यासारखे वाटले. माध्यमांपासुन सोशल मिडीयावर आठ दिवस केवळ तेवढीच चर्चा रंगली. फेसबुकवर तर असंख्य प्रतिक्रिया. हिंदूंच्या प्रतिक्रिया विरोधात असणं सहाजिक आहे. पण काही मुस्लिमांच्या एमआयएमचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मीही संतापलो होतो. पण या असंख्य प्रतिक्रियांमध्ये एका मुस्लिम तरुणाची हिंदुंना उद्देशून लिहिलेली प्रतिक्रिया ओवैसीच्या विधानापेक्षा अधिक महत्वाची होती. फेसबुकवरच्या हिंदूंच्या संतापजनक प्रतिक्रियांना उद्देशून तो म्हणतो, " अरे हम भी महाराष्ट्रीयन है l  ". काही मुस्लिम तरुणांनी एमआयएमचा विरोध करणाऱ्या प्रतिक्रियाही नोंदविल्या होत्या.

काही असले तरी मुस्लिमांच्या एमआयएमचे दोन आमदार निवडून येतात आणि बहुसंख्य हिंदु असलेल्या महाराष्ट्रात मनसेचा केवळ एक आमदार निवडुन येतो ( तोही दुसऱ्या पक्षातून आयात केलेला ), एकट्या शिवसेनेला अथवा भाजपाला एकहाती सत्ता मिळत नाही हा एमआयएमचा विजय नसुन हिंदुत्वाचा पराभव आहे. पण असंख्य प्रतिक्रिया देणाऱ्यांनी याला कारणीभुत कोण याचा कधी विचार केलाय ? एक प्रमुख कारण सांगतो. असं होण्याचं प्रमुख कारण म्हणजे कधी आम्ही हिंदू असतो, तरी कधी कोकणी, कधी मराठा असतो तर कधी दलित, कधी विदर्भाचे असतो तर कधी उत्तर महाराष्ट्राचे, कधी दादांचे असतो तर कधी साहेबांचे, कधी कमळाचे तर कधी शिवसेनेचे, कधी काँग्रेसचे तर कधी राष्ट्रवादीचे. हे सगळे भेद विसरायला हवेत. तरच आम्ही काहीतरी करू शकतो. 

एमआयएम हा पक्ष खूप जुना. १९२७ ला अस्तित्वात आला. मुस्लिम मतांचं धुर्वीकरण आणि राजकारणात प्रवेश हाच त्यांचा हेतु. पण हिंदूंना एका झेंड्याखाली आणायला हवं हे कळायला हिंदूंना १९६० साल उजाडावं लागलं. बाळासाहेबांनी हिंदूंना साद घातली आणि शिवसेना जन्माला आली. तरीही बाळासाहेब होते तोवर सारं ठीक होतं. पण आता हिंदू हित या ऐवजी राजकारण हेच शिवसेनेचं ब्रीद झालंय. 

गेली अनेक वर्ष मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे पण अनेकदा प्रयत्न करूनही शिवसेनेला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर डोकं काढता आलं नाही. शिवसेनेने प्रयत्न भरपूर केले. गोवा, उत्तरप्रदेश, पंजाब अशा विविध राज्यात आमदारकी खासदारकी लढवली. पण एखादा दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला कुठंही यश मिळालं नाही. 

एमआयएमपेक्षा शिवसेनेची ताकद कितीतरी जास्त आहे हे वाचकांना कळावं म्हणुन हे सारं सांगितलं. 

पण हिंदू केवळ महाराष्ट्रातच नाहीत. ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडेच आहेत. युपी, एमपी मधले हिंदु आमच्यापेक्षा कितीतरी कट्टर. अशा देशभरातल्या हिंदुंना एका छत्राखाली आणण्याचं काम भाजपानं केलं. भाजपाच्या राजकारणाला केवळ हिंदुत्वाची झालर नसुन राष्ट्रीयत्वाचीसुद्धा किनार आहे. त्यामुळेच हिंदू तर भाजपाच्या छत्राखाली आलेच. पण स्वतःला भारतीय मानणारे सगळेच भाजपाच्या छत्राखाली आले. त्यात हिंदू होतेच पण मुस्लिम, ख्रिस्ति अशा इतर धर्मियांचे पुरस्कर्तेही होते.   

एमआयएमचा प्रभावं हैद्राबादच्या पलिकडे नाही. मुस्लिम बहूल भाग हे एमआयएमचं कार्यक्षेत्र. त्यापलीकडे ते कधी गेले नाहीत आणि जाऊ शकणार नाहीत. पण एक गोष्ट इथं आवर्जून नमूद करायला हवी कि हैद्राबाद महानगर पालिकेची सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी तीन हिंदूंना महापौरपद दिलं. हे शिवसेनेने केलं असतं ? आणि शिवसेना प्रमुखांनी असा निर्णय घेतला असता तर तो शिवसैनिकांना रुचला असता ? 

हे सांगताना एमआयएम हा हिंदू धार्जिणा पक्ष आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही. त्यांच्या या कृतीमागे हिंदू मतांचं गणितच असेल. पण त्यांचे महाराष्ट्रात दोन आमदार विजयी झाले म्हणुन घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण १९८९ पासुन लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या एमआयएमला कायम केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आलाय. तर तामिळनाडूच्या विधानसभेत ७ पेक्षा अधिक जागा कधीच जिंकता आल्या नाहीत. मुळात त्यांनी किती जागा जिंकल्या याला काहीच महत्व नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशालाही विरोध असण्याचं काही कारण नाही. विरोध असायला हवा तो त्यांच्या मुस्लिम धार्जिणेपणाला आणि कट्टर मुस्लिमवादाला. त्यांचा मोहरक्या ओवैसीनं २०१३ मधे जे विधान केलं ते धोकादायक आहे. अर्थात जिथं पाकिस्तान काही करू शकत नाही तिथं हा एकटा काय करणार ? पण हिंदुस्थानात राहुन, इथल्याच हवेत श्वास घेऊन, इथल्या मातीत पिकलेल्या अन्नाचा घास घेऊन हिंदूंना कापून काढण्याची भाषा करणाऱ्या ओवैसीवर देशद्रोहाचा आरोप ठेऊन त्याला तुरुंगात डांबायला हवं होतं. भाजपानं तशी मागणीही केली होती पण मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसनं ती मागणी उडवून लावली. 

खरंतर एमआयएम या केवळ मुस्लिमांच्या मतांवर अवलंबून असणाऱ्या पक्षाची एवढी भीती बाळगायची काहीच गरज नाही. पण यातुन एक धडा नक्कीच घ्यायला हवा. आणि तो म्हणजे हिंदूंनी संघटीत व्हायला हवं. मराठा असो, ब्राम्हण असो, दलित असो, महार असो, मांग असो, चांभार असो प्रत्येकानं एकाच छत्राखाली यायला हवं. भले मग ते छत्र शिवसेनेचं असेल, मनसेचं असेल अथवा भाजपाचं. पण आपापले वैयक्तिक हेवेदावे, स्वार्थ बाजुला ठेऊन एक व्हायला हवं.     

30 comments:

  1. मला वाटले की तुम्ही मुस्लीम समाजावर टीका कराल म्हणुन पण तुमची सुज्ञ प्रतिक्रीया पाहून आनन्द वाटला. कोणत्याही जातीचे उदात्तीकरण न केल्याबद्दल धन्यवाद. MIMसारखे पक्ष देखील खुपच थोड्या भागात मर्यादीत राहतात.
    BJP देखील कट्टर हिन्दु नाही आणि नसावी.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण नावानिशी प्रतिक्रिया दिली असती तर बरे झाले असते. आपण कुठल्या समाजाचे ते कळले नाही. ती बाब माझ्या दृष्टीने महत्वाची नाही. भाजपा कट्टर हिंदुत्ववादीच आहे. पण कट्टर हिंदुत्ववाद म्हणजे इतर धर्मियांवर अन्याय नव्हे.

      Delete
  2. विजयजी मस्त अभ्यास पुर्ण लेखन
    आपण जे सांगितले कि सर्वानी फक्त हिंदू
    म्हणून मतदान करावे बरोबर पण राजकिय
    पक्षाने पण नुसती मते घेवून फायदा नाही
    कारण एकदा निवडुण येता येत पण सतत नाही
    त्यासाठी जे हिंदूची मते घेणार्ये आहेत त्यानी हिंदू
    कायम एक रहावेत यासाठी प्रत्येक हिंदूना
    धार्मिक शिक्षण द्यावे वैदिक आणि हो जे हिंदूत्ववादी
    विचारवंत आहेत त्यांची एक साखळी बनवुन
    प्रत्येक हिंदू एकसंघ कसा ठेवता येईल ते प्रयत्न
    करावेत सर्व साधुसंतानी, साधकानी,वारकरी, महाराज
    यांनी किर्तन, प्रवचना बरोबर हिंदूत्व कसे जपले
    जाईल अंहकार बाजुला ठेवुनी सर्वजण जर कामाला
    लागले तर औवसी नक्कीच स्वतः देश सोडून जाईल

    ReplyDelete
  3. रमेशजी माफ करा पण आपण हिंदुत्ववादाचे खुपच टोकाचे विचार मांडलेत . हिंदुत्व आणि राष्ट्रभावना या दोन्हीची सांगड घालायला हवी. धर्माचं महत्व शिक्षणातून नव्हे संस्कारातून पटवून देता येतं. आणि ते काम पालकांचं आहे. शिक्षण आणि शास्त्र, शिक्षण आणि कला यांची सांगड घालायला हवी हव मात्र नक्की.प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  4. प्राची देसाई16 November 2014 at 15:20

    सर खुपच छान लेख आहे. प्रत्येकानं यावर विचार करायला हवा.

    ReplyDelete
  5. प्राची खूप दिवसांनी तुझी प्रतिक्रिया मिळाली. आभार.

    ReplyDelete
  6. खूप चांगला लेख प्रत्येक भारतीय (देशप्रेमी) नागरिकाने अवश्य वाचवा आणि विचार करावा.

    ReplyDelete
  7. आभार यतिन. पण उद्धव ठाकरेंच्या विरोधात लिहिल्यानंतर माझ्यावर तुटून पडणारे शिवसैनिक आणि मराठा आरक्षण रद्द होणार या भितीनं माझ्यावर टिकेचा भडीमार करणारी मंडळी या लेखावर मात्र काहीच बोलायला तयार नाहीत,

    ReplyDelete
  8. विजयजी आपलं बरोबर आहे
    पण मला वाटते हिंदूत्व
    आणि राष्ट्रीयत्व एकच आहे
    आणि मुळात पालकांना संस्कार
    करायला वेळच नाहीए
    आणि ज्यांच्याकडे वेळ आहे
    त्याना माहिती नाही
    मेक्याले शिक्षण पध्दती मुळे नुकसान
    झाले आहे
    त्यामुळे प्रथम
    मोठ्या माणसांना वरील प्रमाणे धर्म
    शिक्षण
    मिळणे गरजेचे आहे (वैदिक ज्ञान) नंतर
    ते संस्कारक्षम पिढी
    घढवतील असे मला वाटते
    मला सुद्धा त्याची गरज आहे

    ReplyDelete

  9. रमेशजी आपले म्हणणे पटते आहे. मार्ग शोधायला हवेत.

    ReplyDelete
  10. हीच कापून टाकण्याची भाषा हिंदू नेत्यांनी केली असती तर देशभर गदारोळ उठला (उठविला गेला) असता. त्यातून मुस्लीम संघटनांचे कौशल्य दिसून येते. पण दुर्दैवाने हिंदू संघटनात त्याचा अभाव दिसून येतो. हीच हिंदूंची एकी. बाकी लेख छान लिहला आहे.

    ReplyDelete
  11. रामनजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलेली दिसते. रिमझिम पाऊसवर आपले स्वागत. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    हिंदू संघटनांमध्ये संघटन कौशल्याचा आभाव नाही. गदारोळ वठवतात ती बोटचेपी धोरण स्विकारणारी आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष अथवा सेक्युलर म्हणवणारी विरोधी पक्षाची मंडळी. त्यांनी थोडी साथ दिली तर असल्या मंडळींना हुसकावून लावायला हिंदु संघटनांना क्षणाचा अवधी लागणार नाही. गोध्रा हत्याकांडला दहा वर्ष झाली तरी विरोधक मोदींच्या विरोधात अजूनही त्याचा हत्यार म्हणुन वापर करतात. तेही न्यायालयानं त्यांना निर्दोष ठरवलं असताना.

    ReplyDelete
  12. सर खुपच छान लेख आहे. प्रत्येकानं यावर विचार करायला हवा.17

    ReplyDelete
  13. Tumhi swatach kam kara adhi

    ReplyDelete
  14. आता एकामागे एक प्रतिक्रिया आल्यात. मी आधी कुणाला उत्तर देतोय वाचकांना कळत नाही यासाठीच मी निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत अशी कायम विनंती करत आलो आहे. पण काही मंडळींच्या अदयाप निनावी प[प्रतिक्रिया येताहेत. कृपया हे टाळा.



    आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. यापुढे आपल्याकडून हीच अपेक्षा. पण कृपा करून आपले नाव लिहावे.

    ReplyDelete
  15. टिकाकारांना जेव्हा काही बोलायला जागा उरत नाही तेव्हा ते 'Tumhi swatach kam kara adhi' अशी प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. असो तरीही तुमचे आभार.

    ReplyDelete
  16. जेंव्हा भाजपा आणि शिवसेना हिंदू मतांचे राजकारण करते ते तुम्हाला चालते जर mim ने मुस्लिम मतांचे राजकारण केलेतर ते देशद्रोही तुम्ही कशामुळे त्यांना देशद्रोही म्हणता हे कळाले पण जेंव्हा तोगडीया, सिंगल, सब्रहमन, आदित्यनाथ, मुस्लीम विरोधी बोलतात तेंव्हा चालते जर आम्ही निवडणूक नाही लढवली तर आमच्या प्रशनांनकडे कोन ला देनार जर आम्ही विजयी उमेदवारास मतदान नाही केले तर तो आमच्या वस्ती कडे ढुंकून पाहत नाही देशाच्या जेल मध्ये दहशतवादाच्या खोटया आरोपाखाली कित्येक वरष कॆद केले जाते आणि १०/१२ वरचा ने सोडून दिले जाते हे काय आहे

    ReplyDelete
  17. MIM चे नेते मुस्लिमांचे कल्याण करतील असे आपणास वाटत असेल तर १०० % मुस्लिमांनी MIM ला मतदान करावे. पण आपण जे म्हणता त्यानुसार या देशाने आजतागायत मुस्लिम समाजासाठी काहीच केले नाही असे दिसते. पण आजतागायत या देशात प्रामुख्याने काँग्रेसचे राज्य होते आणि कॉंग्रेसने कायमच मुस्लिम समाजाचा एक गठ्ठा मते म्हणुन वापर केला हे आपण विसरता. शिवसेना असो , भाजपा असो अथवा काँग्रेस प्रत्येक पक्षात मुस्लिम नेते आहेत. मिम चा इतिहास खूप जुना असूनही हे नेते MIM मध्ये सामील झाले नाहीत हे लक्षात घ्या. असो प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  18. Shivsenecha itihas tumhala thiksa thauk nasava 1960 sivsena hindu muddyavar janmala nahi ali ,anibani madhe jailmadhe jau naye manun kasa indira gandhi cha payavar lolan ghetli , muslimanbarobar kase topi ghalun maitri che dhade giravle pls update karun ghya
    sanjeev koparde

    ReplyDelete
  19. संजीवजी अभिप्रायाबद्दल आभार. मी शिवसेनेविषयी जी माहिती घेतली आहे ती वेबसाईट वरून घेतली आहे. शिवसेना कधी अस्तित्वात आली हा मुद्दा गौण आहे. हिंदुंनी संघटीतपणे कणा करावं. पोटजातींचे, कधी कोकणी , कधी मराठवाडा, कधी पश्चिम महाराष्ट्र असे प्रांतांचे मुद्दे उपस्थित करू नयेत हि माझी अपेक्षा.

    ReplyDelete
    Replies
    1. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षा नंतर मुस्लीम समाज मजलीसच्या नेर्तृत्वा खाली एकत्र येत असताना तुमच्या सारख्यांच्या पोटात दूखनारच !! मजलीस पक्ष हिंदूविरोधी नाही, पण हिंदू राष्ट्र बनविण्याचा अट्टाहास करणार्‍या संघ परिवार, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल आणि नरेंद्र मोदींच्याही विरोधात आहे. आता मुस्लीम समाजाने स्वत:च्या उद्धारासाठी जागे व्हावे. मुस्लीम समाजाच्या विकासाबाबत महाराष्ट्र आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या तुलनेत फार मागे आहे. मुस्लीम समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जाही घसरलेला असून, वैद्यकीय सेवाही महाराष्ट्रात महागड्या आहेत. याउलट आंध्रप्रदेशात मुस्लीम समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर ४८0 कोटी रूपये शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याने उच्चशिक्षित होऊन बाहेर पडणार्‍यांची संख्या अधिक आहे. मुस्लीम समाज देशविरोधी असल्याचा गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आम्ही भारतीय आहोत, भारतीयच राहणार असून, देशासाठी गोळ्या झेलण्याचीही आमची तयारी आहे. हिंदू, शीख, अन्य धर्मांच्या लोकांचा या देशावर जितका हक्क आहे, तितकाच हक्क या देशातील मुस्लिमांचाही आहे.
      "देखो देखो कौन आया शेर आया शेर आया "
      बाळ ठाकरे नी भर सभेत मुस्लीमांना अरबी समुद्रात बुडवून टाकण्याची भाषा योग्य त्याच पध्दतीने मुस्लीमाना हिंदू बहुल भागात जागा देउ नयेत अशी भाषा तोगडियाची चलते मग ओवेसी का नाही

      Delete
  20. मित्रा अभिप्रायाबद्दल आभार. आपण जे कोणी आहात त्यांना मी माझा लेख पुन्हा वाचण्याची विनंती करीन. माझा लेख मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. आपण माझा देशद्रोही हा लेखही वाचावा. MIM काय, शिवसेना काय आणि RPI काय आपापल्या समाजाला वेठीला धरून स्वार्थ वैयक्तिक स्वार्थ साधणारं राजकारण जनतेच्या हिताचं असूच शकत नाही.

    ReplyDelete
  21. सर तुम्हीच म्हनताय हा लेख मुस्लीम विरोधी नाही म्हणून आणि समस्त हिंदू ना एका झेंड्याखाली आणायला हवं हे ही म्हनताय काय गरज आहे? आपण राज्यघटना ठरवताना लोकशाही ठरविले आहे ना मग आता का पाकिस्तान च्या पावलांवर चाललो आहेत ?
    काल पन सत्ता तुमचीच होती आज पण तुमचीच आहे पण आता भविष्य आमच्या हातात आहे आम्ही ठरवू

    ReplyDelete
  22. मित्रा अभिप्रायाबद्दल आभार. माझा विरोध मुस्लिम समाजाला नाही. ओवैसी, शाही इमाम बुखारी यांच्यासारख्या प्रवृत्तीला आहे. आणि आपणही जे ' भविष्य आमच्या हातात आहे 'असे म्हणताय त्याचे काय ? माझ्या ब्लॉग वरील काही सामाजिक कविता वाचुन पहा. म्हणजे माझी भूमिका आपणास पटेल.

    ReplyDelete
  23. भाजपा चा राष्ट्र वाद हा सर्व समावेशक नाही जे मुस्लिम भाजपा चे समर्थन करताना दिसतात ते राष्ट्रहितासाठी नव्हे तर वैयक्तिक कारणाने आहेत
    ओवेसीबद्दल बोलायचे कारण नाही कारण मी त्याचा समर्थ क नाही

    ReplyDelete
  24. तुमचा लेख विरोधाभासी आहे तुम्ही हिंदूंना एका झेंड्याखाली येण्याचे सुचवतात तेच ओवेसी करतात

    तुम्ही शाही इमाम ओवेसी चे नाव घेउन विरोध करतात पण तीच प्रवृती असलेले हिंदू संघटन उदा. विहिंप रास्वसं योगी आदित्यनाथ यांना विसरतात किंवा त्यांना देशभक्ती ची पावती देतात हे योग्य आहे का ?

    ReplyDelete
  25. मित्रा अभिप्रायाबद्दल आभार. भाजपा सर्वसमावेशक नाही हे आपले म्हणणे मान्य केले तरी कोणता राजकीय पक्ष सर्वसमावेशक आहे ? इतर पक्षांप्रमाणे भाजपा कमीत कमी मुस्लिमांना डोक्यावर घेत नाही आणि हिंदूंची गळचेपी होऊ देत नाही.

    ReplyDelete
  26. मित्रा अभिप्रायाबद्दल आभार. मी कोणताही धर्म मनात नाही. जात मनात नाही. परंतु कोणी त्याच मुद्द्याला महत्व देणार असेल तर मला माझी जात, माझा धर्म आणि माझा देश प्रिय आहे. स्वातंत्र्य पूर्वकाळातील काही बोटचेप्या धोरणांमुळे हे राष्ट्र निधर्मवादी राष्ट्र म्हणुन जगाच्या नकाशावर नोंदले गेले. पण हे हिंदू राष्ट्रच आहे. पण हे हिंदू राष्ट्र असले तरी इथे मुस्लिम बांधवांचा नव्हे तर कोणाचाच द्वेष केला जाणार नाही. कारण मानवतावाद हि आमची शिकवण आहे. या देशावर प्रेम असणाऱ्या कोणत्याही मुस्लिम संघटनेने ओवैसी अथवा बुखारींचा विरोध का नाही केला ?

    ReplyDelete
  27. हिंदू तोच जो ब्राह्मण नाही !!

    ReplyDelete
    Replies
    1. असं विधान करताना आपण आपले नाव लपवता मग आपण हिंदू असूच शकत नाही. हिंदुत्वाची आपण हि कोणती नवी व्याख्या सांगितली. या असल्या विकृत विचारांमुळेच हिंदुंवर कोणीही राज्य करते.

      Delete