Wednesday 12 November 2014

SHivsena, BJP : भाजपाचं चुकलं असेल पण ….

आज महाराष्ट्र हे देशातलं जवळ जवळ एकमेव असं राज्य उरलंय जिथं बहुमतातलं सरकार सत्तेत नाही. अन्यथा भारतातल्या प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षाचं असो अथवा राष्ट्रीय पक्षाचं असो पण कोणत्यातरी एकाच पक्षाचं आणि बहुमतातलं सरकार आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्यात तर वर्षानुवर्ष भाजपाचं सरकार आहे. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात वर्षानुवर्ष भाजपाचं नसलं तरी अन्य पक्षाचं का असेना पण एकाच पक्षाचं सरकार आहे. याचा अर्थ
एकच महाराष्ट्रातली जनता अजुनही जागृत झालेली नाही.

यावेळचंच पहा ना. काँग्रेस - राष्ट्रवादी नको म्हणुन महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेला युतीच्या पदरात न भूतो न भविष्याती अशा ४२ जागा टाकल्या. पण विधानसभेला आघाडी बिघडली आणि युती तुटली तेव्हा कोणत्या पक्षाला बहुमत द्यावं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं नाही. त्रिशंकू प्रीष्टीती निर्माण झाली.  आणि त्यानंतर गेली महिनाभर सुरु असलेलं राजकीय मानापमान नाट्य आपण पहातो आहोत. 

या सगळ्या नाट्यातून शिवसेनेला सत्तेची खूप हव आहे हे जसं नागरिकांच्या लक्षात आलं तसंच राष्ट्रवादी आपला भ्रष्टाचार भाजपाला पाठींबा देऊन लपवू पहात आहे हेही जनतेच्या लक्षात आलं. पण उपयोग काय झाला. आज भाजपानं बहुमत सिद्ध केल्यानंतर सगळे बोंब मारताहेतच ना ! भाजपानं जे केलं ते नियम बाहय होतं का ? भाजपानं असं म्हणजे आवाजी पद्धतीनं बहुमत सिद्ध करण्याची रणनीती का आखली असावी ? या विषयी मी नंतर भाष्य करेनच. पण मागील तासाभरात मी माध्यमांच्या चर्चा ऐकल्या, विरोधी नेत्यांची वक्तव्य ऐकली, त्यांनी घेतलेली भुमिका पाहिली, फेसबुकवरच्या अनेक मित्रांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. आमचे फेसबुकवरचे पाठीराखे भले आपापल्या नेत्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले असतील. पण माध्यमांमध्ये चर्चा करणारी मंडळी विचारवंत अथवा राजकीय विश्लेषक या सदरात मोडणारी होती. पत्रकार आसबे होते, कुमार केतकर होते, अर्जुन डांगळे होते, आपचे विश्वंभर चौधरी होते. पण त्यांचा सुरही विरोधी पक्षांसारखाच,  आमच्या फेसबुकवरील मित्रांसारखाच. ' लोकशाहीचा खून झाला ', ' जनतेचा विश्वासघात झाला.' 

पण मी मात्र अत्यंत आत्मविश्वासानं हे विधान करतोय कि , ' भले, भाजपानं जे केलं ते चुकीचं केलं असेल. पण लोकशाहीचा खून वगेरे काही झाला नाही. आणि जनतेचा विश्वासघातही झाला नाही. '

सत्तेत आपल्याला वाट मिळाला नाही म्हणुन आज सारे दंड थोपटताहेत. विरोधी पक्ष असावा पण तो आपल्याला सत्तेचा लचका मिळाला नाही म्हणुन ' काव' काव ' करणारा नसावा. केंद्रात भाजपाचं मंत्रीमंडळ अस्तित्वात तेव्हा पहिल्या दिवसापासुन काँग्रेसनं विरोधच केलाय. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या त्या विषयी कुणीच बोलायला तयार नाही. आणि त्यावर बोललं तरी एवढाच म्हणणार , " आंतरराष्ट्रीय बाजारभाव उतरलेत. " काँग्रेसच्या साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधीच का नाही हो उतरले  आंतरराष्ट्रीय बाजारभाव ? 

मुळात आमच्या संविधानानुसार विजयी नेत्यांनी एकत्रिपणे आणि एकमेकांच्या सहकार्यानं राज्य चालवावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण ज्या मातीतल्या दो सख्ख्या भावांच पटत नाही तिथे या आठरापगड गुणधर्माच्या पक्षांचं कसं पटणार आणि ते एकविचाराने राज्य काय चालवणार. म्हणुन ज्या पक्षाला त्या त्या राजकीय भवनाच्या संख्येच्या कमीत कमी निम्मं बहुमत असेल त्या पक्षाला सत्ताधारी तर त्या खालोखाल जागांवर विजयी होणाऱ्या पक्षाला सत्ताधारी पक्ष मानण्यात येऊ लागले. 

असो. भाजपाचं सरकार अल्पमतातलंच आहे असं आपण क्षणभर गृहीत धरू . पण त्यामुळे काय बिघडणार आहे. आज इतर कोणत्याही पक्षापेक्षा त्यांचं संख्याबळ जास्त आहे. मग त्यांनी सत्तेवर बसावं आणि इतरांनी सहकार्य करावं. कारण जनतेला काय हवंय. वीज, रस्ते, पाणी, शेतमालाला योग्य भाव, तरुणांना रोजगार. हेच ना ! भाजपाच्या या पेक्षा पूर्ण केल्या तर जनता त्यांना डोक्यावर घेवून नाचेल. आणि तेच होईल अशी आपण अपेक्षा करू या. 

           

35 comments:

  1. Correct ahe boss !! Fakt deshacha vikas ani tyalach sath !!

    ReplyDelete
  2. लेखक साहेब भाजपने तुमचा
    ब्रेन वॉश केला आहे ……. भा जप शिवाय चूक बरीबर दिसत … तुम्हाला काहीच दिसत नाही
    एकच री ,,,,,ओढताय ती म्हणजे भाजप …… शिवसेना , कॉंग्रेस …आनि राष्ट्रवादी …. यामध्ये कोणीच चांगल नाही अस तुम्हाला म्हणायचं आहे का ?

    ReplyDelete
  3. काय बोलून रहाला न बे. त्यान निमाला धरुन केल की नाही एवढ सान्ग बा तू.

    ReplyDelete
  4. हर्षदजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट देताय. आपले स्वागत. प्रतिक्रियेबद्दल आभार. आपणास माझे विचार पटले पण एवढा सुज्ञ विचार करणारही जनता आहे कुठे महाराष्ट्रात ?

    ReplyDelete
  5. हेमंतजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट देताय. आपले स्वागत. प्रतिक्रियेबद्दल आभार. देशात भाजपची सत्ता येऊन केवळ ५ महिने झालेत. आपण भाजपाचा कोणता निर्णय चुकीचा वाटला ते सांगावे. ६० वर्ष काँग्रेस मानगुटीवर बसली होती. कोट्यावधी रुपयांचे घोटाळे झाले. तेव्हा कुणाचाच आवाज निघत नव्हता. मी भाजपाचा समर्थक नाही. विरोधकांना टीका करायची तर करू दया. ते त्यांचं कामच आहे. पण जनतेनं भाजपावर पाच वर्ष विश्वास दाखवावा. नाही घडले मनासारखे तर जा ना हवे त्यांच्या मागे.

    ReplyDelete
  6. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. पण नावानिशी प्रतिक्रिया दिलीत बरे होईल. काळ जे घडलं त्यातली कोणतीही घटना नियमबाह्य नव्हती. असे माझे मत आहे. आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध करता येते. त्यात गैर काहीच नाही.

    ReplyDelete
  7. Can we see a corruption free India anyday?

    ReplyDelete
  8. Anusuia आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉग भेट दिलेली दिसते. आपले स्वागत. प्रतिक्रियेबद्दल आभार. मी भाजपाचा प्रवक्ता नाही. त्यामुळे एक निश्चित भाष्य करू शकणार नाही. पण जगाच्या पाठीवर भ्रष्टाचार मुक्त देश नाही. तरीही मला विश्वास आहे कि आमच्या अर्थव्यवस्थेला लागलेली हि किड बर्याच प्रमाणात रुर करण्यात भाजपा नक्कीच यशस्वी होईल

    ReplyDelete
  9. मराठा आरक्षण काढले ना bjp नी. बहुजनानो सावध व्हा. आरक्षण काढल जातय.

    ReplyDelete
  10. आपण एक प्रश्नाचे उत्तर द्या
    आपण फक्त शिवसेने बद्दल वायीट लिखाण का करत असता??
    भाजप पक्ष सोडुन सर्वच पक्ष भ्रष्ट्राचारी आहे का ??

    मी सांगतो कि ,
    भाजप पक्ष हाराम्खोर आहे ...

    ReplyDelete
  11. हारामखोर देवेंद्र फडणवीस बामण cm झाला कि हे होणार होतेमराठा समाज हा सर्वच पक्ष राजकारण्यांच्या डोळ्यात खुपतोय. समाजातील जेष्ठ तसेच श्रेष्ठ मंडळींनी सर्व समाजाला गरीब श्रीमंत यांना बरोबर घेऊन जात असतांना इतर बहुजन समाजाच्या लोकांना दुर केल नाही पण मराठा समाजातील लोकांना शिक्षण नोकरी यापासून वंचित ठेवण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो.

    -: निषेध :-
    भाजपा सरकार, देवेंद्र फडणवीस सरकारचा, समाजातील लोकांनी अशा जातीवादी लोकांना मत दिली त्यांचा आम्ही निषेध करतो.

    -: जाहीर आभार :-
    आता बसा आपल्या कर्माची फळ भोगत आपल्या मुलांच्या आयुष्य आपणच बरबाद करणाऱ्या आई-वडीलांचे देखिल जाहीर आभार

    ReplyDelete
  12. Ka maratha samajatil mulana edjucation made arakshan pahije karan aaj ithe arakshanamule 100 marks cha mulga peksha 40 marks cha mulga naukaris lagat ahe ..ani kai pan doctor hot ahet ani tyamule changla bright mulga naukaris n lagta dusre lagat ahe..nai tar ejucation made sarvan same arakshan thevave.,.MARATHA samajala arakshan avashyak ahe ani te milalech pahije

    ReplyDelete
  13. मित्रांनो कृपा करून निन्वी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही.

    मित्रा चार महिन्यापुर्वी सत्ताधारी पक्षानं मनमानी करून आरक्षण दिलं तेव्हा खूप छान वाटलं होतं ना ?

    ReplyDelete
  14. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.

    मित्रा शिवसेनाच नव्हे माझा सर्वच स्थानिक पक्षांना विरोध आहे. आपण माझा स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा हा लेख वाचावा.

    ReplyDelete
  15. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.

    भाजपाकडे काय जादूची कांडी आहे का कि परवा मुख्यमंत्री झाले आणि आज लगेच आरक्षण काढलं. कि केस गेली चार महिने न्यायालयात चालू होती आज तिचा निकाल आला.

    ReplyDelete
  16. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.

    मराठा समाज मुळात मागास नाही. आणि असं असेल तर सगळ्यांचच आरक्षण रद्द करा. अगदी माझ्यासकट. आहे तयारी समाजातल्या प्रत्येक घटकाची ? आम्हाला ४० टक्के मार्क मिळवून डॉक्टर होण्यात आनंद वाटतो. पण कष्ट करायची तयारी नाही. त्यासाठी आरक्षण हवं समाजाला सवलती हव्यात, समाजाला एकीकडे स्वस्ताई हवी आणि दुसरीकडे शेतमालाला भाव हवेत, समाजाला कोणतेही कर भरायला नकोत, समाजाला.

    उद्या शासनानं सगळंच माफ केलं. अन्न, पाणी, वस्त्र, वीज सगळंच फुकट पुरवलं तरी आनंदच वाटेल.

    ReplyDelete
    Replies
    1. मराठ्याच काढल ते वाईटच झाल. पण सगळ्याच आरक्षण काढायला निघायला की र तू. बामनानी बाटवला की र तुला.

      Delete
  17. आरे किती मराठा द्वेष भरलाय तुझ्या अन्गात. नराठ्याच्या किती पिढ्या बरबाद झाल्या बघ. मराठा मुख्यमन्ञी असताना सुद्धा कुणाचे आरक्षण काढले नाही. मग हा द्वेष का?

    ReplyDelete
  18. मित्रा अशा प्रतिक्रिया देऊन काय उपयोग ? मानव जातीचं कल्याण कसं होईल याचा विचार करणं गरजेचं. पण आपण फक्त आपल्यापुरतंच पहातो.

    ReplyDelete
  19. मित्रा माझ्या गेल्या दिड दोन महिन्यातल्या सगळ्या पोस्ट वाच. मला शिवसेनेचा द्वेष करण्याचं काहीच कारण नाही. उदया एकटया शिवसेनेची सत्ता आली तरी मला आवडेल. पण एकट्या शिवसेनेचीच यायला हवी. कळेल तरी शिवसेना काय जनकल्याण करते ते.

    ReplyDelete
  20. केशव पवार15 November 2014 at 17:36

    सर असल्या घन्र्द्या लोकांच्या कॉमेंट पब्लिश कशाला करता

    ReplyDelete
  21. केशवजी कुणी काय प्रतिक्रिया दिली यामुळे मला फारसा फरक पडत नाही. कदाचत आपली अशी प्रतिक्रिया पब्लिश झालेली पाहून त्या मंडळींना लाज वाटेल हि अपेक्षा.

    ReplyDelete
  22. प्रविणजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलेली दिसते. रिमझिम पाऊस वर आपले स्वागत. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  23. गणेशजी अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. यापुढे आपल्याकडून हीच अपेक्षा

    ReplyDelete
  24. धनगराना आरक्षण द्या. भाजपाचा पाठिम्बा होता ना. नाहीतर बघा धनगरी हिसका.

    ReplyDelete
  25. धनगरांच्या आरक्षणाबाबत रान उठवणारे जानकर साहेब कुठं आहेत ? त्यांनीच हा मुद्दा लावून धरायला हवा. धनगर आरक्षणाबाबत गेल्या महिन्याभरात ते चकार शब्द बोलले नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. एकदा म्हणता मराठ्याना आरक्षण नाही पाहिजे एकदा म्हणता धनगराना आरक्षण पाहिजे. काय दूतोन्डी आहात तुम्ही. आता आदिवासीन्च्या जिवावर का उठलाय? bjp सगळ्याच आरक्षण काढायला लागलय.

      Delete
  26. संदीपजी प्रतिक्रियेबद्दल आभार. परंतु पुअर वाटण्यासारखे माझ्या लेखात काय आहे हे कळले तर बरे होईल. कारण माझ्या दृष्टीने यातला अखेरचा विचार महत्वाचा होता.

    ReplyDelete
  27. माझा आरक्षण या बाबीलाच विरोध आहे. आरक्षणामुळे कोणत्याच समाजाचा विकास होत नाही आणि होणार नाही उलट आरक्षण समाजाला मानसिक दृष्ट्या अपंग करते.

    ReplyDelete
  28. मित्रा, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी विरोध असण्याचं कारण काय ? कारण मी कितीही विरोध केला तरी मतांची गोळाबेरीज करणारं सरकार आरक्षण कधीही रद्द करणार नाही.

    ReplyDelete
  29. मित्रा, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मीही आरक्षित वर्गातच मोडतो. पण अंगावर पांघरलेली हि झुल आपण कधीतरी झुगारायला हवीच ना ?

    ReplyDelete
  30. तुमचा बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाला विरोध आहे का ?

    ReplyDelete
  31. तुमचा, मराठा आरक्षणाला विरोध का ?

    ReplyDelete