Saturday, 15 March 2014

Love Poem : खुशाल पडतो प्रेमात

परवाच मी ' आपण साले वेडेपिसे ' हि कविता पोस्ट केली आणि आज ' खुशाल पडतो प्रेमात ' हि कविता पोस्ट करतोय. खरंतर -

आपण साले वेडेपिसे
खुशाल पडतो प्रेमात

या एकाच कवितेच्या एकाच कडव्यातल्या दोन ओळी वाटतात. पण ' आपण साले वेडेपिसे ' या कवितेचा नायक ' तो ' होता . तर ' खुशाल पडतो प्रेमात ' या कवितेची नायिका एक नुकतंच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणारी तरुणी आहे.

खरंच कसं होतं असं ? ' प्रेमात पड ' असं कुणीच सांगत नसतं.
पण तरीही खेळण्यांशी खेळायचे दिवस संपतात. तारुण्याची मोरपिसी झुळूक अंगभर फिरत असते. कुठल्या तरी नकळत क्षणी आपण त्याच्या प्रेमात पडतो. पण असं प्रेमात पडल्यानंतरचा प्रत्येक क्षण कसा हवा हवासा वाटू लागतो.

कोण कुठला ओळख नसते
नाव गाव माहित नसते 
तरी कसे त्याच्या डोळ्यात
आपले अवघे गाव वसते

या ओळी रसिक वाचकांना आणि तरुणीला कदाचित वास्तववादी वाटणार नाहीत. पण त्यानं तिला किंवा तिनं त्याला प्रपोज करणं आणि एकमेकांना होकार देणं हि फार पुढची पायरी झाली. ज्या क्षणी कुणीतरी मनात घर करतं त्या क्षणांसाठी त्या ओळी.

आणि एकदा प्रेमात पडलं कि नंतर अनुभवास येणाऱ्या अनेक भावनांची हि कविता-

Love Poem

12 comments:

  1. रेवती प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. इतर कविताही जरूर पहाव्यात.

    ReplyDelete
  2. रेवती प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete
  3. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete
  4. अनामिक मित्रांनो प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. पण प्रतिक्रिया देताना आपण Anonymous या पर्याया ऐवजी Name / URL हा तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आपणास केवळ आपले नाव टाकूनही प्रतिक्रिया देता येईल. या पर्यायासाठीही login करण्याची गरज पडत नाही.

    ReplyDelete
  5. समिधा तू बऱ्याच माझ्या लिखाणाला प्रतिक्रिया देतेस त्याबद्दल मनापासून आभार. त्याहीपेक्षा तू एक शिक्षिका त्यामुळे तू दिलेल्या अभिप्रायामुळे अधिक सकस लिखाणाची जबाबदारी वाढते.

    ReplyDelete
  6. Kawita kupach aahe.

    ReplyDelete
  7. रेशमजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete