Saturday, 1 February 2014

Marathi Kawita : रे घना

चित्र : जेष्ठ चित्रकार श्री. शिरीष घाटे

रिमझिम पावसाचे दिवस. नेहमीच्या संकेत स्थळी तिची …. आपली भेट ठरलेली. आपण वेळेवर …….. ती नेहमीसारखीच……. हुरहूर लावणारी ….. उशीर करणारी. वाट पाहून कंटाळतो आपण. पण

 ती वाटेवर दूरवरही कुठे दिसत नाही. आपण अधिक हळवे झालेलो. धोडीही कुठे पानांची कुठे सळसळ झाली कि आपल्याला वाटत तीच आली. पण ती येतच नाही. पण आकाशात गच्चं ढग दाटून येतात. आपली सखी कुठे आहे हे त्या मेघांना तरी माहित असेल या जाणीवेने मग आपण त्या मेघांनाच थांबवू पाहतो आणि विचारू पाहतो आपल्या सखीचा ठावठीकाणा.

यातला सखा म्हणतोय,” हे घना, जेव्हा ती घरी नव्हती तेव्हा मला मोहात पडण्यासाठी, त्यांच्या प्रेमाची माझ्यावर पखरण करण्यासाठी रंभा, परी आणि एका राजाची राजकन्या माझ्या घरी आली. पण मला तिच्याशिवाय कोणाचीही सोबत नको. तिच्याशिवाय दुसरया कोणाचीही सांगत नको. तिच्याशिवाय माझा मन आणखी कोणामध्येही रमणार नाही. तेव्हा माझी सखी कुठे आहे ते मला सांग ना.”

तो पुढे असाही म्हणतो कि, ” पावसाची सर हि तुझी सखी. ती तुझ्या सोबत आहे. पण माझी सखी माझ्यासोबत नसताना मी कसा तुझ्यात चिंब होण्याचा आनंद घेवू शकतो. त्यामुळे जर तू तिचं ठाव ठिकाणा सांगितला नाहीस, जर तू तिची माझी भेट घडवून आणली नाहीस तर मी मुळीसुद्धा तुझ्या सरींमध्ये चिंब होण्याचा आनंद घेऊ शकणार नाही.” त्या साऱ्या भावनांची झिम्मड म्हणजे हि कविता.

No comments:

Post a Comment