Thursday, 13 March 2014

Love Poem : आपण साले वेडेपिसे

ती दिसते आणि आपण हरखून जातो. आपल्याही नकळत तिच्या प्रेमात पडतो. ती आपल्यावर प्रेम करतेय कि नाही याची जाणीवही नसते आपल्याला. ते जाणून घेण्याची गरजही वाटत नाही आपल्याला. आपण गृहीतच धरून चालतो सारंकाही आपल्याला हवं तसं घडेल म्हणून .

आपण सारं गृहीत धरतो आणि नुसतं तिचं हसू पाहून वेडेपिसे होत रहातो. ती दिसत नाही भेटत नाही, आपल्याशी बोलत नाही. पण आपण जाता येता केवळ तिचं गोड हसू पाहतो  ………… आणि जगता जगता रोज एक मरण भोगत रहातो.

पण ती ..........
ती मात्र तिच्या जगात खुशाल असते. आपण तिच्यासाठी किती वेडेपिसे झालो आहोत याची जाणीवही नसते तिला...........पण आपण दिसलो कि ती पुन्हा खट्याळ हसते. आपल्या मनातला तिच्या प्रेमाचा रेशीमधागा आणखी घट्ट करते.

तिचं तेच हसू आपण आपल्या मनात खोल खोल जपून ठेवतो. पण तिचं हसू मनाच्या खोल तळाशी जपून ठेवण्याच्या नादात आपलं हसू मात्र आपण विसरून जातो.  ती दिसली नाही ........तिचं हवं हवंसं हसू दिसलं नाही कि आपण वेडेपिसे होतो.....तिचं हसू दिसावं म्हणून आपण आपलं काळीजही तिच्या पावलांपुढं पसरू पहातो.

पण ती ..........

ती मात्र तिच्याच नादात चालत रहाते.........हरिणीसारखी नाजूक पावलं टाकत पुढं येते........आणि तिच्या पावलांपुढं पसरलेलं आपलं काळीज पाहून थबकते..........आपलं हात हाती घेते.

खरं तर हि कविता लिहिताना -

नाजूक पाऊल टाकत 
ती तिच्याच नादात पुढं येते
आपलं काळीज बघून मग
आपला हात हाती घेते

हे कडवं -

नाजूक पाऊल टाकत ती
तशीच पुढं चालत रहाते
" कसा आहेस राजा तू ?",
म्हणायचं ही विसरून जाते.

असं लिहिणार होतो.

पण तिच्या पावलांसमोर पसरलेलं काळीज पाहून ती तशीच चालत राहील हे मनाला पटेना. कारण कोणतीही तरुणी, स्त्री तिच्या पावलांसमोर आलेलं एखाद्याचं काळीज तुडवून तशीच पुढे जाईल हे मनाला पटेना. समजा ती तशी वागलीच तर त्याला कारणीभूत असतात आमच्या रूढी, परंपरा, सामाजिक चालीरीती, थोर मोठ्यांनी घालून दिलेली बंधनं. केवळ त्यासाठीच ती तिचं मन मारून जगत रहाते. दुख आतल्या आत गिळत रहाते. समाजाला तिच्या मनातल्या वेदना कळू नयेत म्हणून हसत रहाते.

  Love Poem

2 comments:

  1. शेवटच्या कडव्यातील पहिल्या ओळीतील शेवटच्या शब्दाने जरासे हसवले.

    ReplyDelete