Saturday, 18 July 2020

सडलेली शिक्षण व्यवस्था आणि कुजलेली बुद्धिमत्ता


आमची शिक्षण व्यवस्था आमच्या राजकीय व्यवस्थेने सडवलेली आहे. खरंतर या विषयावर २०० पानांचं पुस्तक होईल एवढं लिहिता येईल. परंतु पुस्तक लिहून काय होईल? हे सगळं चित्र बदलणार आहे का? जे मला दिसतंय ते आजवर कोणाला दिसलं नसेल का? कोणी या विरोधात लिहिलं नसेल का? परंतु लिहून काही साध्य होणार
नाही. तरीही मी लिहितो आहे. कारण लोक जागे व्हायला हवेत. संघटित व्हायला हवेत आणि त्यांनी या व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारायला हवे. हजार दहा हजार नागरिकांची संघटना अस्तित्वात यायला हवी. आणि जनहिताच्या विरोधात असलेल्या कोणत्याही निर्णयाच्या विरोधात त्यांनी सरकारला खाली खेचायला हवं.

मी कॉग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लिहितो ते यासाठी. त्यांनी शिक्षण क्षेत्राची वाट लावली. त्यांनी उद्योगक्षेत्राची वाट लावली. त्यांनी जनतेचं कल्याण करण्याच्या ऐवजी नेत्यांना उत्पन्नाचे मार्ग निर्माण करून दिले. सबसिड्या, अनुदाने, सहकार सोसायट्या, मार्केट कमिट्या, सहकारी बँका या जनतेच्या हितासाठी उभ्या केल्या नाहीत. त्यात जनतेपेक्षा राजकीय पुढाऱ्यांचं, आणि बड्या धेंडांचं हित गुंतलेलं असतं. आणि आमचं शिक्षण काय करतं, तर उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघत बसतं.  

शिक्षण व्यवस्थेला दिशा देण्यासाठी शिक्षण मंडळ आहे. शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्या त्या विषयात डॉक्टरेट मिळवलेली मंडळी त्या त्या जाग्यावर बसलेली आहेत. मग हि मंडळी काय करतात? कि त्यांच्या पदोन्नतीसाठी, पगारवाढीसाठी, राजकीय लाभासाठी, शासकीय पुरस्कारासाठी राजकीय पुढाऱ्यांचे भाट होतात. आठवीपर्यंत परीक्षा नको हा निर्णय पुढाऱ्यांनी घेतला असेल तर या तज्ज्ञांनी त्याला विरोध का नाही केला? असले निर्णय घेतले जात असतील तर हवेत कशाला शिक्षण तज्ज्ञ? नापास झालेली मुलं आत्महत्या करतात म्हणून त्यांना नापास करायचे नसेल तर, शेती करणाऱ्या माणसाला आत्महत्या करावी लागते म्हणून शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवायचे का? 

पन्नास वर्षांपूर्वी कुठे होतं DEd, BEd, मग त्यावेळच्या शिक्षकांना शिकवता येत नव्हतं का? जशा पुढाऱ्यांच्या शिक्षण संस्था अस्तित्वात आल्या तसे नवनवे अभ्यासक्रम अस्तित्वात आले. अभ्यासक्रमांना व्यासायिक अभ्यासक्रम हे संबोधन मिळालं. हे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत म्हणून त्याची फी भरमसाठ, SC/ST वर्ग वगळता इतरांना या अभ्यासक्रमासाठी फी सवलत नाही. आरक्षण नाही. BCS, BSA, MBA, BSc (agri), Diploma in Nursing असे कितीतरी अभ्यासक्रम  मागील २५ ते तीस वर्षात अस्तित्वात आले आहेत. मार्च महिन्यात एका छोट्याश्या सर्जरीसाठी ऍडमिट झालो होतो. तिथं नर्सिंग करणाऱ्या काही मुली वावरत होत्या. तात्यांना विचारलं तर म्हणाल्या आम्ही नर्सिंगच्या पोस्ट ग्रॅजुएशन कोर्सला आहोत. आता नर्सिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युशन म्हणजे नेमके काय असेल. म्हंटल बाळांनो फी किती? तर म्हणाल्या प्रत्येक वर्षाची ७० ते ८० हजार. 

बरं शिकून नौकरीची खात्री नाहीच. बेकारी वाढतेच आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांवर आरोप करतो. आम्ही बेकारी दूर करू. तरुणांना रोजगार देऊ अशी आश्वासनं दिली जातात. पण त्यासाठी कोणाकडेही कोणतीही रूपरेषा  नाही. मुलं शिकतात. मिळेल ती नौकरी पत्करतात. काही जण परदेशाची वाट धरतात, खऱ्या अर्थाने बुद्धिमान असलेले, कष्ट करणारे उच्च पदावर जातात, आणि शेवटी आमच्या राजकीय व्यवस्थेच्या हातातलं बाहुलं होतात. हि शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही कुजवायला हातभार लावतात. इथे उरते ती कुजलेली बुद्धिमत्ता. नुकतंच अजित पवारांचं एक स्टेटमेंट ऐकलं. 'ज्यांना कमी मार्क असतात तो व्यवहारात हुशार असतो, म्हणून कमी मार्क मिळवून सुद्धा तो पुढे जातो, आणि जास्त मार्कवाला नुसता डोक्यानेच जास्त असतो तो व्यवहारात कमी असतो. तो मागे राहतो.' हे त्यांचं तत्वज्ञान. 

पहाटे शपथ घेऊन, पुन्हा टांग मारून त्यांनी त्यांच्या अर्धवट बुद्धीची झलक दाखवून दिली आहे. ४४, ५४ आणि ५६ जागा असणाऱ्या तिन्ही ढ पक्षांनी १०५ जागा असणाऱ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवून, आम्हला सत्ता कशी आणि किती प्रिय आहे ते दाखवून दिलं आहे. उद्धव ठाकरेंना अंतिम वर्षाच्या मुलांची परीक्षा न घेता त्यांना पास करायचं आहे, ते केवळ त्यांची सहानभूती मिळावी म्हणून. असली राजकीय नेतृत्व, जनतेचं आणि देशाचं फक्त नुकसान करतील. त्यामुळे आपणच जागं व्हायला हवं. असल्या व्यवस्थेला उलथून टाकायला हवं.  

No comments:

Post a Comment