Friday, 25 April 2014

Politics : मोदी आणि मेस्सी

lionel Messi

बार्सिलोनाचा जिगरबाज फुटबालपटु लिओनेल मेस्सी. त्याचा एक वॉल पेपर आमच्या चिरंजीवांच्या मोबाईल स्क्रीनवर आहे. माणसांचे फोटो हे माणसांसारखेच असणार त्यामुळेच त्या फोटोचं मला काही विशेष वाटलं नाही. पणत्यावर मेस्सीचा एक उद्गार आहे. म्हणतो, " play for the name on front of the shirt and they will remember the name on the back."


अर्थात " तुम्ही तुमच्या जर्सीच्या दर्शनी भागावर असणाऱ्या नावासाठी खेळा , क्रीडारसिक, तुमचे चहाते आपोआपच त्या जर्सीच्या पार्श्व भागावरील ( तुमचं ) नाव लक्षात ठेवतील."


सचिन तेंडूलकर हाही असाच जिगरबाजखेळाडू. पण फार थोड्या अगदी बोटावर मोजता येण्याएवढ्या खेळाडूंकडेच एवढ देशप्रेम असतं. बाकी सगळ्यांनाच थोडीशी प्रसिद्धी मिळाली कि पैसा हवा असतो. म्हणूनच क्रिकेटमध्ये फिक्सिंगचा शिरकाव झाला. खेळाडूंकडेच प्रत्येक नव्हे तर प्रत्येक नागरिकाकडे एवढी देश निष्ठा असली असती तर कोणताही देश किती प्रगती करू शकला असता याचा नुसता अंदाजच केलेला बरा.


हे सगळं लिहिण्याचं कारण असं की परवा मोदींचाही असाच एक उद्गार माझ्या पहाण्यात आणि वाचण्यात आला, " तो असा -


narandra modi
यातला comman man म्हणजेच अरविंद केजरीवाल यांचा आम आदमीच नव्हे काय ? काँग्रेसच्या किती नेत्यांकडे अशी विचारधारा आहे हो ? ते तोंड उघडतात ते केवळ इतरांवर चिखलफेक करण्यासाठीच. सत्तेचा सारीपाट अरविंद केजरीवालही आता काँग्रेसचाच कित्ता गिरवू लागलेत. काहीही झालं की त्यामागे बीजेपीचाच हात असल्याची आवई ते उठवू लागलेत. केजरीवालांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. ते प्रामुख्यानं बीजेपीलाच टार्गेट करताहेत कारण कॉंग्रेसला आपण खिजगणतीतही धरत नाही हे ते देशाला दाखवून देऊ पाहताहेत आणि आम आदमी पार्टी हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे अशी हवा ते निर्माण करू पहात आहेत.

त्यामुळे काहीच फरक पडणार नाही. बीजेपीला आता कोणीच रोखू शकणार नाही. कारण -


https://maymrathi.blogspot.com/

2 comments:

  1. मोदी ग्रेट आहेत हे प्रत्येकालाच माहित आहे अगदी विरोधकांनाही. पण चांगल्या माणसाचं कौतुक करायचं नाही हा भारतीयांचा स्वभाव आहे.

    ReplyDelete
  2. काल मी फेसबुकला ' लवकरच हा देश नेहरू गांधींचा म्हणून नव्हे तर मोदींचा म्हणून ओळखला जाईल. ' असं विधान वाचलं. आणि एक दिवस ते खरं होणार असा विश्वास आहे.

    ReplyDelete