वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता ? किती बेभरवश्याच आयुष्य जगतो आहोत आम्ही. या साऱ्याला जबाबदार कोण आम्ही कि आमच्या देशातली व्यवस्था ? यातून बाहेर पडायला मार्गच नाही का ?
आहे ! निश्चित आहे. फक्त आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेला लढा, झाशीच्या राणीन केलेला उठाव, भगतसिंगाच बलिदान, स्वातंत्रवीर सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा आठवायला हवी.
हो ! मान्य. हे सारं परकीय सत्तेविरुद्ध होतं. आता आपण, आपणच निर्माण केलेल्या लोकशाही विरुद्ध कसं लढायचं ?
असाच प्रश्न पडणार असेल तर अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आठवावा, फ्रान्स मधल्या जनतेन तिथल्या झुंडशाहीशी आणि माजलेल्या जमिनादारांशी लढण्यासाठी केलेला उठाव आठवावा. हे लढे तर त्या त्या जनतेन स्थानिक प्रशासनाविरुध्च लढले होते.
आणि हो, या साऱ्या लढ्यात पुढाकार घेणारी माणसं अत्यंत सामान्य होती. मग आम्हीच का असे षंढ बनलो आहोत ? निश्चित काहीतरी करायला हवंय.............एक दिशा, एक धोरण ठरवायला हवंय.
Sundar.
ReplyDeleteमहेशजी या हा ब्लॉग नव्यानं सुरु केला तेव्हा सुरवातीच्या काळात लिहिलेली हि [पोस्ट. एवढी जुनी पोस्ट वाचकांनी वाचून प्रतिक्रिया दिल्यांनतर खूप आनंद होतो
ReplyDelete