Wednesday, 30 April 2014

Rape and mindset : बलात्कार का होतात ?

बलत्कार. एक सामाजिक किड. एक कलंक.परवा परवाच तर तिघा नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली . पण म्हणून बलात्काराच्या घटना थांबल्या नाहीत. आजही वर्तमान पत्र उघडलं कि बलात्काराची , विनयभंगाची बातमी वाचावयास मिळाली नाही असा दिवस जात नाही. सेक्स हि एक भूक आहे. ती प्रत्येकातच असते. त्यामुळेच
हा विषय दबून दबून का असेना प्रत्येकजणच चघळतो. हि बातमी पहिल्या पानावर टाकली कि बहुतेकजण लोकांच्या नजर चुकवून का होईना ती बातमी आधी वाचतात याची जाणीव वृत्तपत्रांना असते. त्यामुळे अशी बातमी ते अधिक रसभरीत वर्णन करून छापतात. आमचे पुढारीही भ्रष्टाचार करून एक प्रकारे तमाम जनतेवर बलात्काराच करत असतात. आणि आम्ही तो बलात्कार तोंड दबून सहन करत असतो. अण्णा हजारे यांच्यासारखी सारखी काही सत्यवादी मंडळी त्याविरुद्ध आवाज उठवतात तेव्हा त्यांनाच चवचाल ठरवले जाते.

बलात्कारच्या बळी केवळ स्त्रिया असतात असे नव्हे तर स्त्रिया, पुरुष , मुले मुली, वृद्ध अशी सारीच मंडळी बलात्काराला बळी पडत असतात. पण समाजात चर्चा होते ती फक्त स्त्रीलिंगी व्यक्तीवर पुरुष लिंगी व्यक्तीने केलेल्या शारीरिक बलात्काराची. कारण बलात्काराची तेवढी एकच  व्याख्या आमच्या मनावर बिंबवली गेली आहे. पण क्षणाक्षणाला घडणाऱ्या मानसिक बलात्काराचं काय ? कार्यालयात जेव्हा एखाद्या व्यक्तीचं केवळ वरिष्ठांच्या पुढे पुढे करत नाही म्हणून किंवा त्यांच्या पुढे लाळघोटेपणा करत नाही म्हणून जे मानसिक खच्चीकरण करण्यात येत तोही एक बलात्काराचाच प्रकार नाही काय ? काही असलं तरी आपण इथ चर्चा करणार आहोत ती केवळ स्त्रीलिंगी व्यक्तीवर पुरुष लिंगी व्यक्तीने केलेल्या शारीरिक बलात्काराची.

बलात्काराचा विषय फार फार गाजण्याच एक कारण मी वरती दिलंच आहे. या विषयाची एवढी चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रसिद्धी माध्यम. या विषयातल गॉसिप त्यांना माहित आहे. त्यामुळेच या विषयाचा ते फार कीस काढत असतात. तो विषय जेवढा अधिक बारकाव्यान हाताळता येईल तेवढा बारकाव्यान हाताळतात.


सिंधुताई सपकाळ याच्यासारखी जेष्ठ समाज सेविकाही, " स्त्रियांनी अर्धवट आणि तंग कपडे घातले तर बलात्कारच होतील. ” असे म्हणते तेव्हा बलात्कार पिडीत आणि बलात्कारित व्यक्तींनी काय बोध घ्यायचा ?

पण मला लिहायचं आहे ते बलात्कार का होतात त्याविषयी -


१ ) कोणत्याही व्यक्तीशी ( मग ती स्त्री असो अथवा पुरुष ) त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित करणं म्हणजे बलात्कार होय.


२ ) कामवासना हो माणसातली स्वभाविक आणि मानसिक प्रवृत्ती आहे. ती जशी पुरुषांच्या ठायी असते तशीच स्त्रियांच्या ठायी हि असते. त्यामुळेच कामवासना जागी होते तेव्हा तिचं क्षमन होणं किंवा त्यासाठी प्रयत्न होणं हे नैसर्गिक आहे. परंतु त्यासाठी कुणाचाही त्याव्यक्तीच्या मनाविरुद्ध वापर करणं हे चुकीचं आहे.

त्यामुळेच बलात्कार फक्त भारतातच होतात असे नाही. तर स्त्री पुरुष समानता स्वीकारलेल्या अमेरिकेसारख्या प्रगत देशातही बलात्काराच्या घटना घडत असतात. जगातल्या एकूण ६८३००० बलात्कारांपैकी एकट्या अमेरिकेत ९०००० बलात्कार होतात. अमेरिकत बलात्कार होतात म्हणून भारतातले बलात्कार क्षम्य आहेत असं नाही म्हणायचं मला. बलात्कार ही घटना निंदनीयच आहे. आणि आपल्या देशासारख्या संस्कृतीप्रिय, संस्कारक्षम देशात तर ती अधिकच निंदनीय आहे.


३ ) बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला सहजासहजी शिक्षा होईल याची शक्यता कमी असते. आमच्या कायद्यात अनेक पळवाटा आहेत.


४ )  बलात्काराच्या भावनेनं झपाटलेल्या व्यक्तीला छोट्या मुलींना  केवळ चोकलेटसारख्या गोष्टीचं आमिष दाखवून समाजाच्या नजरेआड नेता येत. शिवाय अशा मुली अशा घटनेत खूप घाबरल्यामुळे व सदर घटना त्यांना निट कथन न करता आल्यामुळे बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचं अधिकच फावत. 

त्यामुळेच छोट्या मुलींना याविषयी कसा समजावून सांगायचा हा फार मोठा प्रश्न उरतो.


५ ) अशी घटना न्यायालयात आल्यानंतर त्या घटनेचा निकाल लागेपर्यंत खूप वेळ जातो. स्त्रियांची यात प्रचंड मानसिक कुचंबणा होते. त्यामुळे त्या बलात्काराच्या घटना मनातच ठेवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच समाजातील बलात्कार करू पहाणाऱ्या नराधमांचे फावते.

६ ) स्त्रिया स्वतःला नेहमी खूप असुरक्षित समजतात. त्यामुळेच अशा घटनांना बळी पडताना त्या घटनेला तोंड देण्याच धैर्य त्यांच्यात उरत नाही. अशा घटनांना निर्भयपणे तोंड देण्याचं धाडस त्यांचं निर्माण करणं हि एक सामाजिक जबाबदारी आहे.

७ ) बलात्कार झाला म्हणजे त्या स्त्रीचं सर्वस्व लुटलं गेलं आणि त्आणि त्या घटनेनंतर ती स्त्री समाजाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नाही हि भावना प्रत्येकानं झुगारुन दिली पाहिजे आणि पिडीत स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. 

अशा घटनांचा जर कोणत्याही परिस्थितीत केवळ महिन्या दिड महिन्यात निकाल लावून गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन करण्याचा पायंडा पडला तरच बलात्काराच्या घटनांना आळा बसेल.





2 comments:

  1. मी अजून हा तुमचा लेख पुर्णपणे वाचला नाही कारण मी सध्या12वी बोर्डची परीक्षा देतो आहे आणि मी त्यामध्ये गुंतलेलो आहे. मला सांगा की, हया बलात्काराच्या घटना जास्तकरून उत्तर भारतातच का घडतात? आपल्या महाराष्ट्रात का नाहीत? याचे उत्तर एकच आहे की उत्तर भारतात मुस्लिमांचा वावर जास्त आहे. अश्या मुस्लिमांच्या नादी लागून उत्तर भारतातले हिंदू सुध्दा हिंदूत्त्व विसरू लागले आहेत. तुम्हाला कदाचित माहितीच असेल की इस्लाम धर्माची स्थापना करणारा मोहम्म्द पैगंबर या माणसाने त्याच्या 52 व्या वर्षी स्वत:च्या 9 वर्षाच्या आयशा नावाच्या मुलीशी बलात्कार केला होता. ही 9 वर्षाची आयशा, पैगंबराची मुलगी की बहिण ते मला आता आठवत नाही पण या दोघांपैकी एक होती Google it. त्यामुळे या मुहम्मद पैगंबरने चालू केलेला इस्लाम follow करणारे मुस्मिस सुध्दा त्याच्यासारखेच बलात्कारी बनले. पण्‍ा एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या हिंदू लोकांबरोबर राहून महाराष्ट्रातीन मुसलमान सुधारले आहेत व सुशिक्षित होत आहेत व स्त्रियांना आदर देवू लागले आहेत.

    (माझ्याकडे सध्या कुरानमधील Top 10 चुकी व गैरसमजूती आहेत ज्या मी काही मित्रांकडून मिळवलेल्या आहेत. या गोष्टी सिध्द करतात की कुरान हे मानवाने बनवलेले आहे व खोटेपणाने देवाच्या नावाने प्रसारीत केलेले आहे. जर तुम्ही यावर लेख लिहिणार असान तर मी तुम्हाला त्या Top 10 गोष्टी आनंदाने पाठवीन. त्यासाठी मला येथे मॅसेज करा parulekarakshay6@gmail.com )

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी, अभिप्रायाबद्दल आभार. लहान वयातही आपण अत्यंत प्रगल्भतेने विचार करता आहात. आता आपली परीक्षा संपत आली असेल. पेपर चांगले गेले असतील असा विश्वास आहे. आपल्या उर्वरित पेपरसाठी शुभेच्छा. परीक्षा संपल्यानंतर माझा ब्लॉग सवडीने सविस्तर वाचा. आपले अभिप्राय मिळतीलच हि अपेक्षा.

      Delete