Tuesday, 1 April 2014

Women footwear : बाईची चप्पल

प्रसंगच तसा होता. तसं  पाहिलं तर सहज विसरून जावा असा पण माझ्या मनात त्या प्रसंगाने वादळ उठवळ. झालं काय -

बऱ्याच वेळा ऑफिसला जाताना माझ्यावर जीप, ट्रक यासारख्या खाजगी वाहनान ऑफिसला जाण्याची वेळ येते. काही चेहरे अधून- मधून दिसत असतात. तोंड देखले का असेना पण ओळखीचे वाटतात. कधी कधी चार - दोन शब्दांची देवाण घेवाण झालेली असते. कधी नजरानजर होताना ओठांच्या कोपऱ्यात हळुवार हसू फुलेल असत. डोळ्यांना डोळे भेटतात तेव्हा कधी कधी ओळखीचं आश्वासन दिसून येतं. अशाच एका मला माझ्या थांब्यावर भेटणाऱ्या " बाईचा " हा किस्सा. बाईचा किस्सा म्हणलं कि आता सगळेच जरा सावरून बसतील. ते सहाजिकच आहे. आणि सावरून बसायलाच हवं कारण किस्साही तसाच आहे.  


तर या बाई उंच, सडपातळ, देखण्या, गोऱ्यापान, बांधेसूद. तुम्ही म्हणाल," बाहेर भेटणारी बाई प्रत्येक पुरुषाला छत्तीस गुणीच वाटते." असो.

मला असं काही वाटल नसलं तरी सकाळच्या प्रसन्नवेळी त्यांच्याकडे पाहून प्रसन्न वाटावं अशा त्या बाई नक्कीच होत्या. शिवाय व्यवसायाने शिक्षिका, त्यांच्याशी बोलताना बरं वाटायचं.

एक दिवस भल्या प्रातःकाळी या बाई थांब्यावर आल्या. मी त्यांच्या आधी येऊन गाडीची वाट पाहत होतो .
ऊन तर सोडाच, पण सूर्यही अजून वर आलेला नव्हता. प्रातःकाळ म्हणजे सकाळची सहा - सव्वासहाची वेळ. ऑफिसची वेळ सव्वासातची. पुढचा प्रवास पावून एक  तासाचा. बाईंचाही प्रवास तेवढाच. माझ्या आधीच्या एका थांब्यावर त्या उतरायच्या.

वेळ भरा भरा सरकत होता. गाडीचा पत्ता नाही. मला ऑफिसला आणि बाईंना शाळेला उशीर होत होता. गाडी कधी येईल याच विवंचनेत आम्ही दोघे. बाकीचेही प्रवासी  होते थांब्यावर. पण आपल्या ओळखीची बाई जेव्हा आपल्या आसपास असते तेव्हा ते विश्व दोघांचंच असत.

अखेरला एक भला मोठा ट्रक  आला. तोही नेहमीच्याच पाहण्यातला. स्त्री - दाक्षिण्य म्हणून मी बाईंना प्रथम चढण्यास सांगितलं. बाई गाडीत चढताना काहीतरी खाली पडलेलं मी पाहिलं. पाहिलं तर…….." चप्पल " ……." लेडीज चप्पल."

असून असून असणार कोणाची. मास्तरीण बाईनचीच. मलाही त्याची पूर्ण कल्पना होती. पण शब्दाने जवळीक वाढवायची संधी कोण सोडेल ?

अर्थातच मी बाईंना विचारले, " म्याडम, चप्पल  तुमचीच पडली का खाली ?”

" हो, हो  सर. घ्या ना तेवढी वर." बाईंनी फक्त पहिले तीनच शब्द उच्चारले. पुढचे शब्द माझ्या मनचे. मला गरजही नव्हती बाईंच्या त्या शब्दांची. मी पटकन  चप्पल उचलली आणि बाईच्या हातात दिली. गाडीत बसलो. बाई जरा सावारूनच बसल्या. साहजिकच मलाही सावरून बसवाच लागलं.

एवढी त्यांची चप्पल त्यांच्या हाती देवूनही पुढे प्रवासात बाई एक शब्दही बोलल्या नाहीत. पण माझ्या मनात मात्र विचारांचे काहूर माजलेले.

वाटले स्त्री -  दाक्षिण्य असेल, परिचयाचा परिणाम असेल किवा असलेला परिचय अधिक दृढ व्हावा म्हणून असेल. पण आपण किती सहजपणे, कोणताही अनमान न करता, ज्या हाताने आपण अन्नग्रहण करतो त्याच हाताने गावभर फिरून आलेली  बाईंची चप्पल आपण बाईंच्या हातात सापूर्त केली. पण जर आधी आपण गाडीत चढलो असतो आणि आपली चप्पल खाली पडली असती तर…..या  बाईंनी ती उचलून आपल्या हातात दिली असती ?

मला माहित आहे. तुमच्यापैकी बहुदा सर्वांचीच उत्तरं, " त्या बाईन मुळीसुद्धा तुमची चप्पल उचलून दिली नसती.”

" बाई आणि अशी कधी कुणासाठी वाकेल शक्यच नाही." अशीच असतील.

तुमच कशाला ….सदर  घटना  मी   माझ्या  बायकोसह  काही  परिचित  महिलांना  सांगितली. साऱ्यांची उत्तरे  नकारार्थीच होती .पण  माझ्या  बायकोने नकार  नोंदवताना  माझ्याकडे अशा काही  गरीब, बिचाऱ्या, केविलवाण्या  नजरेनं पाहिलं कि, " आपण हे असं काय करून  बसलो ” असंच मला वाटलं.

त्या बाईने आपली चप्पल अशी उचुलून दिली असती का ? या प्रश्नावर माझ्या मनाने नकारार्थी उत्तर तर दिलाच, पण  आपली चप्पल उचलून  न देताही तिने काय मुक्ताफळं उधळली असती त्याचे एक चित्र मनात उभं राहिलं आणि माझ्या अंगावर शहारेच उभे राहिले.

तीच नव्हे कोणतीही बाई म्हणाली असती, " आहो, तुम्हाला साधी तुमची चप्पल सांभाळता येत नाही, मग बायको कशी संभालाळ ?” किंवा काही न बोलता तिनं असं काही नाक मुरडलं असतं कि, " शी ! आपण खरंच काही कामाचे नाही आहोत."

स्त्रीला आपण परावलंबी म्हणतो, परस्वाधीन म्हणतो, गरीब गाई मानतो. पण ते खरंच किती खरं आहे ?कारण तसं असतं तर स्त्रियांच्या अंगी असं  वागणं आलं नसतं. अशा मुजोरीपणान त्या वागल्या नसत्या. त्यांच्यातला अढत्तेखोरपणा असं पदोपदी दिसला नसता. त्यांच्यातली घमेंड आपल्याला पावलोपावली जाणवली नसती.
 
" या लेखाचा शेवट वाचल्यावर कुणाही स्त्रीने मला मोडीत काढून स्वतःच्या पायातली चप्पल हाती घेवू नये. सारयाच स्त्रियांना एकाच दावणीला बांधायला मी  काही कसाई नाही. काही स्त्रिया याला अपवाद असतील किंवा आहेतही. पण अपवाद म्हणजे नियम नव्हे. अपवाद म्हणजे गुण नव्हे. स्त्रियांमधला परोपकार हा बहुदा  त्यांच्या स्वार्थाशी निगडीत असतो. त्यांचा परोपकार केवळ दारात येणाऱ्या गोसाव्यापुरता किंवा भिकाऱ्यापुरता असायला नको.अशा प्रसंगी त्यांच्यातली माणुसकी दिसायला हवी. एवढीच या लेखन प्रपंच्यामागची अपेक्षा."

2 comments:

  1. BHARICH...........100% BAROBER AHE......

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रतिक्रिया मिळाली कि लिहिण्याची उमेद वाढते. पुन्हा एकदा आभार.

    ReplyDelete