Sunday, 27 April 2014

Indian Politics and Arvinda Kejriwal : अरविंद केजरीवाल आणि रेप

व्यंगचित्र श्रेयस नवरे यांचे असून नेटवरून घेतले आहे.
अरविंद केजरीवालांनी आधी आण्णांच्या आंदोलनात पुढाकार घेऊन नंतर आण्णांचा बळी देऊन बरोबर दिल्लीतली सत्ता मिळवली. आता केजरीवालांना वाटतंय ' दिल्ली ( लोकसभा ) दूर नही .' आम आदमीला ( तुम्हाला - आम्हाला ) दिल्ली मुंबई पेक्षाही लहान आहे हे माहित नसेल. पण केजरीवालांना तरी माहिती असायला हवं ना ? त्यांना माहिती असेलही पण ते मुद्दामहून डोळेझाक करताहेत. मांजर डोळे झाकून दुध पीतं म्हणून तिच्या पाठणीत फुकनी बसायची चुकते काय ? तीच अवस्था केजरीवालांची होणार आहे.


गेली अनेक वर्ष मुंबईत ठाण मांडून बसलेल्या शिवसेनेला महाराष्ट्रा पलिकडे झेप घेता आलीय का ? केजरीवाल बाळासाहेबांहून श्रेष्ठ तर मुळीच नसावेत. किंवा नाहीतच. त्यामुळेच अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी कुठपर्यंत झेप घेईल याचा अंदाज न केलेलाच बरा. दिल्ली म्हणजे देश नव्हे हे केजरीवालांना कळायला हवं. मिडीयाही आज केजरीवालांचा उदोउदो करतं आहे. पण हवा फिरली कि मिडिया आपोआप फिरेल.   
arwind kejriwal


मी सोशल मिडीयावर अनेक तरुणांच्या प्रतिक्रिया पहातो. मी काय किंवा ते काय मोदींचे समर्थक नाहीत. पण मोदी अर्थात बीजेपी आजमितीला देशासमोरचा सर्वात चांगला पर्याय आहे. गरज आहे ती बहुमताची. 

केजरीवाल आणि इतर प्रादेशिक पक्ष करून करून काय करतील, तर त्रिशंकू लोकसभेला हातभार लावतील. त्यामुळेच प्रत्येकानं विचार करून मत द्यायला हवं. प्रादेशिक पक्षांना तर दूर ठेवायलाच हवं. मग ती केजरीवालांची आप असो , मायावतींची बसपा असो , मुलायमसिंगांची सपा असो , ममतांची तृणमूल असो किंवा आणखी कुणी. या सगळ्यांना दूर ठेवत भाजपला बहुमत द्यायला हवं . 

No comments:

Post a comment