Thursday, 17 April 2014

Love Poem : तुझे डोळे


" डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका "

हे भावगीत सगळ्यांच्या चांगलंच परिचयाचं आहे. तिला आपलं असं रोखून पाहणं फारसं आवडत नसलं तरी आपल्याला मात्रं तिचे डोळे खूप खूप हवे असतात. भले तिनं रोखून पाहिलं तरी. तरी ती डोळा भेट आपल्याला हवी असते.

कारण तिच्या डोळ्यात प्रेम असतं......... आपुलकी असते........... जिव्हाळा असतो......... माया असते.............ममता असते...........श्रद्धा असते..........आणि या साऱ्याहून महत्वाचं म्हणजे आपल्या जगण्याची उमेद तिच्या डोळ्यात असते. तिच्या डोळ्यात असतं आपलं आभाळ.


डोळे खोल ..........डोळे गहिरे........ डोळे हळुवार..............डोळे खट्याळ............डोळे लाडिक.......... डोळे मिस्कील.........डोळे ओढाळ.

' जुलमी डोळे ' तिचेही असतात. पण तिच्या डोळ्यांच्या जुल्मिपणाला एक फार फार वेगळी अर्थछटा असते. तिच्या डोळ्यांनी केलेला जुलूमही आपल्याला हवा हवासा असतो. म्हणूनच -

" डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका " असं म्हणण्याचा अधिकार फक्त तिला...... आपल्याला नाही.



2 comments:

  1. पियुषजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete