Wednesday 29 October 2014

Shivsena, RPI : राम नसलेला आठवले


माझा स्थानिक पक्षांना, त्यांच्या राजकारणाला तीव्र विरोध आहे. या पूर्वी लिहिलेल्या ' स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा ' या लेखात त्याविषयी मी सविस्तर भाष्य केलं आहे. पण सामान्य माणसाच्या हे नीटसं लक्षात येत नाही. लक्षात येत नाही असं नाही. पण
चुलत भावापेक्षा सख्खा भाऊ जवळचा वाटावा तसे लोकांना स्थानिक पक्ष जवळचे वाटतात. पण वटवृक्षासारखी राष्ट्रीय पक्षांची भुमिका अलिकडे लोकांच्या दृष्टीआड झाली आहे. स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा पदोपदी आपल्या दृष्टीस पडत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष का करतो कुणास ठाऊक ? 

आता रामदास आठवलेंचच पहाणा. मी मागे, '  शिवसैनिका हे वाच रे ' या लेखात मी त्याविषयी लिहिलं होतं. २ आमदार निवडून आणायची या माणसाची पात्रता नाही. पण हा आधीच उपमुख्यमंत्री पदावर दावा करत होता. याला सत्तेत १० टक्के वाट हवा होता. का हो ? आणि आज एकही आमदार निवडून आलेला नसताना यांना दोन मंत्रीपद हवी आहेत. महामंडळं हवी आहेत. का ? हि काय खिरापत आहे का ?

ज्या माणसाला नीट बोलता येत नाही. इंग्रजी सोडा, हिंदी नीट बोलता येत नाही. आपली कविता हा लोकांच्या कौतुकाचा विषय नसुन चेष्टेचा विषय आहे हे ज्याला कळत नाही अशी मंडळी आमचं, समाजाचं नेतृत्व करतात हि या लोकशाहीची केवढी मोठी शोकांतिका आहे. असल्या माणसासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तरी लाज वाटायला हवी. पण त्याहीपेक्षा भाजपानं असल्या नेत्याला सोबतही घेऊ नये. किंवा आपल्या झेंड्याखाली असणारा एखादा नेता त्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आणावा. पण असल्या माणसाला दूर ठेवावं.

फेसबुकवर या माणसाला मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्या कि फार हसू येतं. भले हि प्रतिक्रिया देणारी सगळी मंडळी स्वर्ण अथवा समाजातल्या वरच्या स्तरातली असतील. मी असला कोणताही स्तर मनात नाही. पण या सगळ्या प्रतिक्रियात एका दलित तरुणाने अत्यंत उघडपणे सांगितलं होतं कि, ' मी बौद्ध असुन, बाबासाहेबांचा कट्टर भक्त आहे. पण रामदास आठवले हा आमचा नेता आहे.  हे सांगण्याची मला लाज वाटते. ' याला मतदार जागा होणं म्हणतात.

जे रामदास आठवलेंच तेच शेट्टींच. त्यांचीही धमकी आम्हाला सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही. तर युती करताना जो ठराव झाला आहे तो आम्ही उघडा करू. जे या दोघांचं तेच इतर दोघांचं. जानकार आणि
विनायक मेटे यांनाही मंत्रीपदं हवीत. सहा - सात आमदार पदरी असलेल्या अपक्षांनाही मंत्रीपदं हवीत.

शिवसेनेने तर काय मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी लग्नाआधीच घटस्फोट घेतला. मागचा पुढचा कोणताही विचार न करता मित्रांवरच तोफ डागली. पण स्वतःच तोफेच्या तोंडी पडले. आज अनेकजण म्हणताहेत कि एकट्या उद्धव ठाकरेंनी ५० हून अधिक सभा घेतल्या. हा विजय एकट्याचा आहे. मग लोकसभेतल्या भाजपाच्या विजयाला काय म्हणायचं. अहो एकट्या मोदींनी चारशेहून अधिक सभा घेतल्या. अवघा देश पिंजून काढला. पक्षाला बहुमत मिळवून दिलं. परंतु कॉंग्रेसच्या साठ वर्षाच्या सत्तेत जेवढे प्रश्न विचारले गेले नाहीत, जेवढी टिका झाली नाही तेवढी टिका मोदींवर या पाच महिन्यात होते आहे. वा रे विरोधक आणि वा रे जनता. नेत्यांनी कान भरायचे आणि कार्यकर्त्यांनी ' री ' ओढायची.

' मी बौद्ध असुन, बाबासाहेबांचा कट्टर भक्त आहे. पण रामदास आठवले हा आमचा नेता आहे.  हे सांगण्याची मला लाज वाटते. ' असं सांगणाऱ्या तरुणाप्रमाणे जोपर्यंत प्रत्येकजण जागृत होत नाही तोपर्यंत रामदास आठवलेंच्यासारखे नेते जनतेचं नेतृत्व करत रहाणार आणि स्वतःच्या स्वार्थापायी आमच्या देशातली लोकशाही धोक्यात आणत रहाणार.   

4 comments:

  1. आठवलेजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. -बामनविरोधी आघाडी

    ReplyDelete
  2. dalit samajala mage dhakanarya athavalela darat suddha ubhe karu naka. pankaja mundesuddha dalit hatyakandabaddal kahi bolat nahi.

    ReplyDelete
  3. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. असल्या आघाडया समाजात फुट पडतात आणि केवळ स्वतःचे स्वार्थ साधतात. रामदास आठवलेंनी दलित समाजासाठी काय केले त्याचे एक उदाहरण दया.

    ReplyDelete
  4. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. आठवले नगरला जाऊन आले. काय साधलं ? पंकजा मुंडेही जाऊन आल्या. पण असल्या भेटींना मी महत्व देत नाही. मारेकऱ्यांचा तपास लागणं आणि त्यांना शासन होणं महत्वाचं. पोलिस यंत्रणा ते कान करेलच. पण वर्ष उलटुन गेला तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडले नाहीत. कधी कधी या अनिष्ट प्रवृत्तींच नशीब जोरावर असतं.

    ReplyDelete