Sunday 9 November 2014

Shivsena, BJP : मिठाचा खडा आणि उद्धव ठाकरे


शिवाजी महाराजांची शिवशाही उद्धव ठाकरेंसारखी मुळीच नव्हती. कधी वाकायचं आणि कधी झुकावायचं याचं त्यांना पुरेपूर ज्ञान होतं. काखेत मान देतानाच कोथळा कसा बाहेर काढायचा हे त्यांना ठाऊक होतं. पण उद्धव ठाकरेंचा मात्र एकच मंत्र,
' मोडेन पण वाकणार नाही.' पण एकदा मोडुन पडल्यानंतर पुन्हा उभारी घेता येत नाही याची उद्धव ठाकरेंना जाण नसावी. नसावी म्हणण्यापेक्षा नाहीच. कारण त्यांना तशी जाण असती तर त्यांनी युती तुटू दिली नसती. युती तुटल्यानंतर काही दिवसांपूर्वीच्या आपल्या मित्रपक्षावर नको तसे आणि नको तितके शाब्दिक बाण सोडले नसते. आपल्याच मित्रपक्षाला प्रमुख शत्रु मानलं नसतं. आणि इतकं घडल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर रहाण्याचा शहाणपणा दाखवला असता.

पण उद्धव ठाकरेंनी प्रत्येकवेळी मिठाच्या खड्याची भूमिका निभावली. होता होईल तेवढं दूध नासवलं. मी हे सारं माझ्या मनाचं लिहितोय असं नव्हे. गेल्या काही दिवसातल्या प्रवासात त्रस्थ लोकांची चर्चा मी ऐकली आहे. जनतेचं मन ओळखण्याचं कसब उद्धव ठाकरेंच्याकडे नाही. उद्धव ठाकरे आज, ' शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, स्वाभिमानाने आम्ही पुढे जात आहोत. ' असं कितीही छाती बडवून सांगत असले तरी त्यांनी गेल्या वीस दिवसात जी भूमिका घेतली आहे त्यावरून जनता त्यांच्या या शब्दांवर मुळीच विश्वास ठेवणार नाही. 

आज शेवटच्या क्षणी जनतेची सहानभूती मिळविण्यासाठी, ' हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये, म्हणून मी नरमाईची भूमिका घेतोय. ' असं उद्धव ठाकरे सांगताहेत. पण लोकसभेचे निकाल हाती आल्यापासून उद्धव ठाकरेंनी कोणत्या क्षणी नरमाईची भुमिका घेतली ? मिशन १५० प्लसचा हट्ट त्यांचा. युती तुटली पण त्यांनी माघार घेतली नाही. देशाच्या पंतप्रधानांचा बाप काढला त्यांनीच. विधानसभेचे निकाल हाती आले आणि भाजपानं प्रस्ताव घेऊन माझ्या दारी यावं हि अपेक्षा करत बसले ते उद्धव ठाकरेच. आम्हाला उपमुख्यमंत्रीपद, विधानसभेच अध्यक्षपद, अर्थमंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसुल खातं यासह १० मंत्रिपद हवीत असा ह्ट्ट धरून बसले ते उद्धव ठाकरे. दिल्लीत पोहचलेल्या  देसाईंना शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहु दिलं नाही ते उद्धव ठाकरेंनी. 

याउलट भाजपाची भुमिका. शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. आम्ही त्यांना सन्मानाची वागणूक देऊ. आम्हाला शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायला आवडेल. हे सगळं सांगत असताना, ' मंत्री मंडळाचा विस्तार विधानसभेत बहुमत पार पडल्यानंतर करू. त्यावेळी शिवसेनेचा सन्मान राखला जाईल असाच तोडगा काढू.' एवढ आणि एवढंच सांगितलं गेलं. पहिल्यापासून शेवटपर्यंत हेच. उगाच उद्धव ठाकरेंसारखं आज तळ्यात तर उदया मळ्यात असं नाही. 

शिवसेनेचं काय तर, '  भाजपानं आधी राष्ट्रवादीबाबतची भुमिका स्पष्ट करावी मग आम्ही आमची आमची भूमिका जाहीर करतो.'  म्हणजे आधी भाजपानं , ' ते राष्ट्रवादीला धरणार कि सोडणार ते सांगायचं. ' आणि मग भाजपाची मान कशी काखेत घ्यायची ते उद्धव ठाकरे ठरवणार. उद्धव ठाकरेंना वाटतंय राजकारणातले सगळे छक्के पंजे आपल्यालाच ठाऊक आहेत इतर सारे अजुन बोळ्यानं बोळ्यानं दुध पीताहेत. 

मी माझ्या ' काय आहे भाजपाच्या मनात ' या लेखात ' शिवसेनेने वाट पहावी. शेवटी सारे काही मंगलच होईल. मी तर त्यापुढे जाऊन असं म्हणेन कि शिवसेनेने एक पाऊल पुढं टाकुन भाजपाला बिनशर्त पाठींबा द्यावा. भाजपा तो नाकारू शकणार नाही. असा बिनशर्त पाठींबा घेताना भाजपानं शिवसेनेच्या पदरात काहीच टाकलं नाही तर नाचक्की भाजपाची होईल. आणि जनतेची सहानभूती शिवसेनेसोबत राहील.गरज आहे ती शिवसेनेने डोक्यात राख घालून न घेता समंजस भुमिका घेण्याची.' असे मत मांडले होते. पण हे सौजन्य उद्धव ठाकरे शेवटपर्यंत दाखवु शकले नाहीत.  

उद्धव ठाकरेंचा हा अनाठायी स्वाभिमान शिवसेनेला रसातळाला घेऊन जाईल कि उंच शिखरावर याचे  उत्तर काळच देईल.      



12 comments:

  1. आज ची वस्तुस्तीती

    ReplyDelete
  2. इतकी राष्ट्रवादीची अलर्जी आहे तर, शरद पवारांना पंतप्रधान पदाचे समर्थन का बर दिले होते? शरद पवार बाळासाहेबांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष का आहेत? आणि त्यांच्या सांगण्यावरून प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठींबा का दिला होतात? भाजपने राष्ट्रवादिला पाठींबा कधीही मागितला नाही. जर शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठींबा दिला तर, तर राष्ट्रवादीचा नाही प्रश्नच येत नाही. शिव सेनेने जनतेला मूर्ख समजू नये, शिवसेना लाचार नेतृत्वाचा पक्ष आहे हे त्यांनी आधीच साबित केले आहे. अजित पवार बरोबर का बर वाटाघाटी करीत होता ? हे प्रथम स्पष्ट करावे. अजूनही एक दिवस आहे. संजय राउतला लांब ठेव आणि स्वतः विचार कर. महाराष्ट्रासाठी काय योग्य पाऊल आहे हे समजण्याइतकी तुझी कुवत नक्कीच आहे. तुझा आताचा मुख्य प्रोब्लेम संजय राउत आहे, BJP नाही. उधोजीराजेना वंशपरंपरेने शिवसेना पक्ष प्रमुखपद (लायकी नसताना ) मिळाले असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे बिलकुल नाही, म्हणून शिवसेनेचे हसू होत आहे. शिवसेनेत हिम्मत नाही...एवढाच स्वाभिमान दुखावला होता तर सरळ केंद्रातून गीतेंना का नाही राजीनामा देऊन विरोधात बसवले? शेवटी शेवटच्या क्षणापर्यंत लोणी किती मिळते याकडे डोळा ठेवायचा आणि तो मिळाला नाही की मात्र "महाराष्ट्राचा अपमान होतोय", "आमचा सन्मान राखला जात नाही" असे ढोंग करायचे...जनतेला सगळे कळते उधोजी...भाजप कदाचित तुमचा सन्मान राहत नसेलही...पण आपणही हेच केले असते त्यांच्या जागी असतात तर..१०० टक्के माज दाखवला असता....वो करे तो 'अपमान' ओर आप करे तो 'स्वाभिमान'?..

    ReplyDelete
  3. सुजीत, केवढी परखड प्रतिक्रिया नोंदवली आहेस. नुसती परखड नाही तर वास्तवसुद्धा आहे. उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीची अलर्जी वगेरे काही नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे शिवसेनेला पाठींबा दिला असता तर शिवसेना केव्हाच बोहल्यावर चढली असती आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते. आता ते सगळ्यांनाच नाके मुरडणार. कारण म्हणतात ना, ' कोल्ह्याला द्राक्षे आंबट. ' तशातली गत आहे उद्धव ठाकरेंची. इतकाच स्वाभिमान होता तर आजही ' कुणावर विश्वास उरला नाही पण चर्चा चालू राहील. ' असं विधान करण्याऐवजी विरोधात बसले असते. पण केकचा मोह सुटत नाही ना.

    ReplyDelete
  4. अमोलजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट देताय. आपले मनपूर्वक स्वागत. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. असेच भेट देत रहा.

    ReplyDelete
  5. सत्ता सोडवत नाही आणि स्वाभिमानाचं काय करावं हेही समजत नाही अशी कोंडी झालीय शिवसेनेची. राष्ट्र्वादीने पाठिंबा देणं आणि शिवसेनेने स्वाभिमानाच्या गोष्टी करणं हे सत्तापिपासु प्रादेशिक पक्षांचं राजकारण आहे यात विश्वासघात,गद्दारी या भावनिक गोष्टी झाल्या.त्या भावनिक गोष्टीत आपण अडकतो आणि आपले (so called) नेते घानेरड राजकारण करून मोकळे होतात.आणि आपण आपली मत मांडत बसतो.भाजपा विकासा च्या मार्गावर आहे सर्व पक्षांनी त्याना मदत करावी

    ReplyDelete
  6. संदीपजी आपली प्रतिक्रिया अत्यंत योग्य आहे. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार. असेच भेटत रहा.

    ReplyDelete
  7. विजयजी
    उध्दवचे बरेच निर्णय चुकलेत
    निकाल लागल्यावर त्यानी
    ज्यानी आपल्याला मते दिली
    त्यांच्या विकासाच त्यांना मजबूत
    सरकार देण
    मराठी माणुस आणि हिंदूत्वाचा
    काहिच विचार नाही केला
    भाजपा पुढे एकच मागणी मला
    किती मंत्रीपदे मिळणार एवढी एकच
    मागणी ज्या लोकांनी ६३ आमदार
    निवडुन दिले त्या लोकांचे काय प्रश्न आहेत
    ह्याच्याशी त्यांना काही देणघेण नाहिए
    आणि विधानसभा आध्यक्षपद यासाठी
    त्याना सेनेची ६३ तरी मते मिळतील का?

    ReplyDelete
  8. रमेशजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. आपले म्हणणे बरोबर आहे पण हे उद्धव समर्थकांना पटत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेतला वाटा आणि भाजपाला झुकवण हो दोनच ध्येय उद्धव ठाकरेंनी बाळगली. प्रचारादरम्यानही ते विकासावर फारसे बोललेच नाही. त्याविषयी मी माझ्या काही लेखात लिहिलं आहे. काही वाचकांना वाटतं मी शिवसेनेवर जाणीवपुर्वक टीका करतोय. पण तसं नाही. भाजपानं या पाच वर्षात काही भरीव नाही केलं तर मी त्यांच्यावरही टीका करायला कमी करणार नाही.

    ReplyDelete
  9. मराठ्यांनो निवडणूकीत लय भाजप भाजप म्हणून बोंबलत होतात ना ............घ्या आता भाजप..........हरामखोरांनो आम्ही रक्ताचं पाणी केलं आरक्षणासाठी आणि तुमच्यासारख्या दळभद्री लोकांनी भाजपला उरावर बसवलं........उच्च न्यायालयात भाजपा सरकारने बाजू व्यवस्थीत न मांडल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालय...........समाजहिताचे कोणतेपक्ष आहे हे ओळखायला शिका.........आम्ही एखाद्या पक्षाविषयी सकारात्मक बोललो की लगेच आम्ही विकल्या गेलोत असे आरोप होतात अरे हरामखोरांनो.......तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाहीय रे आमची............शरिरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यत समाजासाठी लढणार.........याद राखा भाजपा सरकारच्या काळात मराठ्यांची अन् शेतक-यांची माती होणार आहे........ही तर सुरूवात आहे...............

    ReplyDelete
  10. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. आपण नाव टाकले तरी आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई करणार नाही. कृपया अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत. या ब्लॉगवर जातीयवादाला थारा नाही.

    मित्रा भाजपा सत्तेवर आले त्याला चार दिवस झाले. सत्तेत आल्यानंतर चार दिवसात आरक्षण काढयला मुख्यमंत्र्यांजवळ जादुची कांडी नाही. हि केस चार महिन्यांपासून न्यायालयाधीन आहे. आणि पूर्वीच्या सरकारने नेमून दिलेली मंडळीच आरक्षणाच्या बाजुने बाजू मांडताहेत. कृपया समाजात गैरसमज पसरवू नयेत.

    ReplyDelete
  11. उध्दव ठाकरेंचे वागणे म्हणजे बालबुध्दीच ।। त्यांचे बोलणे म्हणजे लहानग्याने मोठ्यां जवळ रडून आपलेच खरे हे सांगणे ।। धुर्त राजकारणी अशी भाषा न वापरता योग्य पर्याय वापरतो मग त्याचा अंजाम काहीही होवो ।। बिघडलेल्या डावालाही योग्य ट्रॅकवर आणून शत्रूला चित करतो ।। पण अजूनही उध्दवना राजकारणातीली निर्णय क्षमता सिध्द करता येत नाहीय ।।
    लाचारी पत्करून सत्तेत जातांना सामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणल्या असत्या तर उध्दवजींनी सत्तेची लालसाच केली नसती.परंतू तेंव्हा त्यांच्या जवळ असणारे सत्तेत जाण्याकरीता उतावळे होते तर सामान्य सैनिक स्वाभिमानाने विरोधात बसावे ह्या मताचे होते.
    भाजपाच्या लाटेमुळे सेनेचे बाप म्हणण्याचे स्वप्न तर भंगलेच परंतू मोदी शहांपुढे नतमस्तक होण्याची वेळ आली.

    ReplyDelete
  12. उध्दव ठाकरेंचे वागणे म्हणजे बालबुध्दीच ।। त्यांचे बोलणे म्हणजे लहानग्याने मोठ्यां जवळ रडून आपलेच खरे हे सांगणे ।। धुर्त राजकारणी अशी भाषा न वापरता योग्य पर्याय वापरतो मग त्याचा अंजाम काहीही होवो ।। बिघडलेल्या डावालाही योग्य ट्रॅकवर आणून शत्रूला चित करतो ।। पण अजूनही उध्दवना राजकारणातीली निर्णय क्षमता सिध्द करता येत नाहीय ।।
    लाचारी पत्करून सत्तेत जातांना सामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणल्या असत्या तर उध्दवजींनी सत्तेची लालसाच केली नसती.परंतू तेंव्हा त्यांच्या जवळ असणारे सत्तेत जाण्याकरीता उतावळे होते तर सामान्य सैनिक स्वाभिमानाने विरोधात बसावे ह्या मताचे होते.
    भाजपाच्या लाटेमुळे सेनेचे बाप म्हणण्याचे स्वप्न तर भंगलेच परंतू मोदी शहांपुढे नतमस्तक होण्याची वेळ आली.

    ReplyDelete