Wednesday 15 April 2020

गाजराची पुंगी आणि उद्धव ठाकरे

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी

महाराष्ट्राला कोरोनाची लागण बऱ्याच उशीरा झाली आणि आज देशातील सगळ्या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र आघाडीवर आहे. इतका आघाडीवर आहे थोड्याच दिवसात महाराष्ट्र आपल्या देशातील न्यूयार्क होईल
आणि कोणी काहीही म्हटलं तरी याला मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांची अकार्यक्षमताच कारणीभूत आहे. आज महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्रातून जगभर जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे अशी काहीही स्पष्टीकरणे दिली जात असली तरी उद्धव ठाकरेंची अकार्यक्षमता लपून रहात नाही.

कोरोना संदर्भातील मोदींचे भाषण मी आवर्जून पाहतो. मात्र उद्धव ठाकरे यांचे भाषण कधीच पहात नाही. कारण एकच उद्धव ठाकरेंच्या भाषणात आत्मविश्वास कमी आणि फुशारकी अधिक असते. सर्वाधिक हसू मला काल, 'मी केंद्राकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी. BCG लस वापरण्याची परवानगी मागितली आहे.' असे म्हणू त्यावर जे जे तारे तोडले ते ऐकून मला फार वाईट वाटले.

कारण समजा बीसीजी लस वापरणे योग्य नसेल तर केंद्र परवानगी देणार नाही. आणि मग उद्या उद्धव ठाकरे केंद्राच्या नावाने शंख करायला मोकळे होणार. काहीही होवो. महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडला तर मला आनंद वाटेल. परंतु बीसीजी संदर्भात उद्धव ठाकरे जे काही बोलत होते ते ऐकून मला आमच्या नेतृत्वाची किंवा करावीशी वाटले. काय म्हणाले उद्धव ठाकरे, "मला आत्मविश्वास आहे हि लस यावर चालणार आहे. माझे मन तसे मला सांगते आहे. आणि समजा ती लस कोरोनावर चालली तर न जाणो जगाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राच्या हातून घडेल. जे जगात कोणाला जमलं नाही ते हा महाराष्ट्र करून दाखवेल."

जगभर एवढे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना बीसीजी लस माहित नसल्याच्या अविर्भावात उद्धव ठाकरे बोलत होते. इतर कोणालाही या लसीबद्दल काहीच माहित नाही. तो फॉर्म्युला केवळ उद्धव ठाकरेंच्याकडे आहे. बीसीजी लसीचा हा खडा कोरोनावर मारायचा. मेला तर मेला कोरोना नाही तर नाही.

काळ बांद्रयाला जी गर्दी जमली त्यावर सत्ताधाऱ्यांनी एकमुखाने कोणीतरी खोडसाळपणा पणा करतं आहे. राजकारण करत आहे असं सांगून टाकलं. पण असा सांगण्यापूर्वी आता सगळेच व्हाटसअप ग्रुप ओन्ली ऍडमिन ससे असताना, महाराष्ट्र संचारबंदी असताना, नाक्यानाक्यावर पोलीस तैनात असताना असे कसे घडू शकते. एका रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी होत असताना इतर वेळी रस्त्यावर दिसणाऱ्यांना चोपून त्याचे व्हाईडीओ अपलोड करणारे पोलीस काय करत होते?

किती लोक असतील. हजार,  दोन हजार उधोजी एका बसमध्ये पन्नास प्रवासी म्हटले तरी केवळ चाळीस बस ताणात करून आपण तशी व्यवस्था करू शकला असतात. परंतु आपल्याला तसे करायचे नव्हते तर राजकारण करायचे होते. चाराण्याची बुद्धी असणारा आदूबाळ सुद्धा केंद्राने योग्य वेळी ट्रेनची व्यवस्था करायला हवी होती असे म्हणतो. काय याचा अर्थ. शंकेची सुई आपल्याकडेच सरकते आहे. बरं ती गर्दी पांगवल्यानंतर पुन्हा आपण म्हणता, "तुम्हाला कोठेही जायची गरज नाही. तुमची काळजी घ्यायला महाराष्ट्र समर्थ आहे. तुम्हाला जे जे हवं ते ते पुरवलं जाईल." यातून तुम्ही उत्तर भारतीयांची सहानभूती मिळवायचाच प्रयत्न केलात ना.

तुम्ही जेव्हा बीसीजी लसचा उपाय सुचवला तेव्हा तर मला गाजराच्या पुंगीची आठवण झाली. वाजली तर वाजली नाही तर मोडून काढली.

साहेब, आता हे पुरे करा. महाराष्ट्राला ८० टक्के जनता गेले तीन आठवडे घरात बसून आहे. २० टक्के जनतेला कसे काबूत ठेवायचे ते तुम्ही बघा. अन्यथा अवघड आहे तुमचेही आणि महाराष्ट्राचेही. 

4 comments:

  1. खुर्चीच्या हव्यासापोटी सत्ता बळकावून जनतेला वेठीस धरले आहे. जनतेनेच आता रस्त्यावर उतरून नाकारलं पाहिजे असं सरकार.
    कालचा बांद्रा स्टेशनवर घडलेला प्रकार तर उघड उघड केंद्र सरकारला बदनाम करण्याचा व सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालणारा आहे.
    थोडस जाणत पोरग ही सांगेल कि सरकारला कसे कळत नाही . शिवाय पोलिसांचे हात कोणी बांधलेत हे हि जनता ओळखते. जे पोलीस चौकाचौकात नागरिकांच्या थोड्याश्या आगळिकीला चोपून काढते तेथे हजारॊलॉक यांना कसे दिसले नाहीत. सर्व शंकास्पद आहे व पितळ उघड पडलं आहे राज्य सरकारच. अक्षम्य आहे हि वागणूक सरकारची.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर. आपण नियमित अभिप्राय नोंदविता आहात याचा आनंद वाटतो.

      Delete
  2. हा पण राहुल गांधी चा मोठा भाऊ वाटतो बीसीजी लस स्टेटमेंट वरून तर😂😂🤣

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

      Delete