Monday 27 April 2020

सोनिया माहात्म्य

cartoon by vijay shendge

परवा एका मित्राने मला तीन लिंक इनबॉक्स मध्ये टाकल्या. आणि म्हणाला, "सर तुम्ही यावर लेख लिहा." खरं म्हणजे अशा प्रकारे माझ्या इनबॉक्स मध्ये मला माहिती पुरवणारे अनेकजण आहेत. मी त्या संदर्भात लिहावे अशी त्यांची अपेक्षाही रास्त आहे. परंतु
माझे इतर अवांतर वाचन, लेखन सुरु असते. त्यामुळे इच्छा असूनही मी त्या प्रत्येक गोष्टीवर लिहू शकत नाही. परंतु परवा ज्या लिंक मला पाठवण्यात आल्या होत्या, त्या तिन्ही पोस्ट संजय आवटे या गृहस्थाच्या होत्या. त्यातल्या दोन पोस्टमध्ये त्यांनी अर्णबच्या विरोधात लिहिले होते. एका पोस्टमध्ये संघाचे प्रमुख डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या विरोधात लिहिले होते. मग मी संजय आवटे यांच्या वॉलवर गेली आणि तिथे मला एका पोस्टमध्ये एका पोस्ट मध्ये त्यांनी सोनिया पुराण मांडले दिसले त्या संदर्भात लिहिणे अधिक गरजेचे वाटले.

संजय आवटे हे स्वतः मोठे पत्रकार आहेत. अनेक वर्तमानपत्राचे संपादक राहिले आहेत. त्यांचा संपर्क दांडगा आहे. कोणीतरी सोनियाची तळी उचलून धरली म्हणून काँग्रेस समर्थकांनी त्या पोस्टवर मोठी गर्दी केली. विरोधी कॉमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणात नोंदविल्या गेल्या. अर्थात विरोधी कॉमेंट करणाऱ्या मंडळींची गणना मुर्खात करायला संजय आवटे विसरले नाहीत. कमीत कमीत संजय आवटे सारख्या वलय असणाऱ्या पत्रकाराने तरी टीकाकारांना मूर्ख ठरवणे अपेक्षित नव्हते. नागनाथ कोतापल्ले यांच्यासारख्या विचारी (?) आणि नामवंत लेखकाने देखील त्या पोस्टची पाठराखण केली होती. संजय, प्रसन्न, रजत यांच्यासारखी मंडळी आणि साठ वर्षात ज्या काँग्रेसला या देशातली गरिबी मोडीत काढता आली नाही त्या काँग्रेसची पाठराखण करणारी गरीब जनता मी पाहतो तेव्हा वाईट वाटते.

आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या गरिबांनी काँग्रेसची पाठराखण करणे मी समजू शकतो. परंतु संजय आवटे सारखा सुशिक्षित माणूस सोनिया गांधी यांचा त्याग जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आणि अनेक सुशिक्षित मंडळी त्या पोस्टचं समर्थन करतात तेव्हा शिक्षणाने माणूस शहाणा होतो या गोष्टींवरचा माझा विश्वास दुबळा होतो. परंतु असे असताना २०१४ ला मोदी बहुमताने सत्तेत येतात. २०१९ ला ते वाढत्या बहुमताने सत्तेत येतात. आणि २०२४ ला याहून अधिक मताधिक्याने सत्तेत येईल असा विश्वास वाटू लागतो तेव्हा शिक्षणाने माणूस नक्कीच शहाणा होतो हा विश्वास दृढ होतो.

आणि हि शिकून शहाणी झालेली मंडळी कोणत्याही परिस्थितीत भाजपची साथ सोडणार नाहीत. परंतु संजय आवटे, प्रसन्न जोशी, रवीश कुमार, निखिल वागळे यांच्या सारख्या कितीही शिक्षण दिलं तरी त्यांना शहाणपण येणार नाही. कारण वेड पांघरून पेडगावला जाण्यात आणि नको त्या लोकांवर गुलाल उधळण्यात त्यांचे स्वार्थ दडलेले असतात.

संजय आवटे यांनी यांनी कितीही रंगकाम केले तरी, सोनिया गांधी यांचे शिक्षण किती? त्यांचे कर्तृत्व काय? हे जनतेपासून लपून राहिलेले नाही. इंजिनिअरिंग करण्यासाठी राजीव गांधी लंडनमधील केम्ब्रीज येथे गेले. पाच सहा वर्ष तिथे राहिले. परंतु त्यांना इंजिनिअरिंगची डिग्री नाही मिळवता आली. परंतु इटालियन डिक्री मिळवण्यात मात्र ते यशस्वी झाले. सोनिया गांधी यांनीही असेच शिक्षण अर्धवट सोडलेले. माधवराव सोंधीया आणि सोनिया गांधी यांचे संबंध काय होते याविषयी मी इथे लिहिले योग्य होणार नाही. मला सांगायचे ते एवढेच कोणी कोणाविषयी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु जनता अशा लेखनाला भुलणार नाही हे वास्तव आहे. 
त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक, कॉमेंट मिळाल्या. ती पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर झाली. परंतु असे भाट असणे हि या देशाची परंपरा आहे. एकतर तुम्ही भाटगिरी करा, किंवा न्यूट्रल रहा, अथवा आमचा जयजयकार करा अशी या देशातील पुढाऱ्यांची मागणी असते. या तीनही प्रकारचे वर्ग आमच्या देशात आहेत. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अत्यंत योग्य आणि देशहिताच्या दृष्टीने विचार मांडणारा वर्ग एक, दोन टक्के सुद्धा नाही. आणि अशा खऱ्या अर्थाने देशहितासाठी लेखणी झिजविणाऱ्या, देशासाठी देह झिजविणाऱ्या विचारवंतांना मोडीत काढणारा, त्यांच्यावर चिखलफेक करणारा वर्गही या देशात कमी नाही.

संजय आवटे, रवीश कुमार, प्रसन्न जोशी, विश्वंभर चौधरी, अशी आमच्या देशात अगणित मंडळी आहेत. ते नेहमीच वाईट विचारांची भलावण करतील. कारण त्यांना त्यांचे पोट चालवायचे असते. ते ज्या व्यक्तीचे कौतुक करतील त्या व्यक्तीच्या पाठीशी जनता उभी राहील अशा भ्रमात ते असतील. परंतु जनतेला मात्र कोणाच्या पाठीशी उभे रहावे याची खूप चांगली समज आली आहे. हे प्रत्येकानेच लक्षात ठेवावे.    

2 comments:

  1. असो छान लिहिलंय बर का.
    पण या जनावरांना अक्कल नाही ओ.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद मित्रा.

      Delete