Monday, 6 April 2020

ABP Maza, Z 24 tas, aaj tak, tv9 आणि इतर सर्व news channels, news papers सुधरा रे

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी
अप्रिय सर्व मराठी, हिंदी न्यूज चॅनल, वर्तमानपत्रे आणि पत्रकार मित्रांनो,

आपणास जरी दिसत नसले तरी आपले दिवस कठीण आहेत याची मला जाणीव आहे. हि पोस्ट व्हाट्सअप, फेसबुक व अन्य समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचेल आणि त्यानंतर आपण मी जे विचार मांडले आहेत त्याचा सद्विवेक बुद्धीने विचार कराल असा विश्वास आहे.

मुस्लिम समाज कोरोना जिहाद पसरविण्यासाठी
कशा प्रकारे कार्यरत आहे. हिंदू समाजाविषयी आणि या देशाविषयी मुस्लिम समाजाच्या मनात कशी खदखद आहे याविषयीचे अनेक व्हिडीओ व्हाट्सअप आणि इतर समाज माध्यमांवर व्हायरल झाले. एबीपी माझाने यातील काही व्हिडिओची सत्यता तपासली. ते व्हिडिओ कशा रितीने जुने आहेत. आणि कोरोनाचा प्रसार करण्याच्या संबंधित व्यक्तींचा हेतू नव्हता असे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर अशा व्हिडिओची सत्यता तपासल्याशिवाय असे व्हिडिओ व्हायरल करू नयेत अशी सूचनादेखील करायला ते विसरले नाहीत. त्याविषयीचा व्हिडीओ व्हाट्सअप वर आला म्हणून मला ते कळले. कारण मी आपला चॅनल केव्हाच बहिष्कृत केला आहे.

त्यातला प्लेट चाटतानाचा व्हिडिओ तर मुस्लिम समाजाचा नसून बोहरी समाजाचा आहे असे सांगण्याची दक्षता सुद्धा एबीपी माझाने घेतली. ते कृत्य कोणाचे आणि त्या कृत्यामागील हेतू काय असे काही जरी असले तरी  ते कृत्य हिणकस आहे हे नक्कीच. परंतु ते हिंदू समाजाचे नाही ना मग ते पवित्र कसे हे सांगण्यासाठी एबीपी माझाची टिम काम करणारच. हेच कृत्य हिंदू समाजातील एखादा वर्ग करताना आढळला असता तर त्यावर यांनी हवे तसे तोंड सुख घेतले असते.

चार व्हिडीओ खोटे आहेत हे आपण सिद्ध करण्याची तसदी घेतलीत. परंतु जे व्हिडीओ खरे आहेत त्याविरोधात मुस्लिम समाजावर खापर फोडण्याचे धारिष्ट्य दाखवू शकाल का? निर्धर्मीवादाच्या नावाखाली या देशात कोणी कसेही नाचले तरी चालेल. पण हिंदूंनी केवळ बघ्याची भूमिका घ्यावी. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत रहावे अशी आपली भूमिका आहे का? मुळात कोणत्याही गोष्टीला जातीयवादी अथवा धार्मिक वळण देण्याची एकूण पत्रकारितेची भूमिका असते. परंतु केवळ दलितांवर मुस्लिमांवर अन्याय झाला हि आपल्यातल्या पत्रकाराला धार चढते. JNU मधला कारभार आणा कि चव्हाट्यावर. निधर्मी देशात अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, जामिया मुस्लिम युनिव्हर्सिटी कशी अस्तित्वात येते?

सावरकर नायक कि खलनायक अशी चर्चा आपण आयोजित करू शकता यावरूनच आपल्या मनातील हिंदुत्ववादाच्या विरोधातील खदखद लक्षात येते. आणि समाज या विरोधात आक्रोश करतो तेव्हा आपण माफीनामा सादर करता. परंतु आपली जनमानसात काय प्रतिमा आहे, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलात का कधी? तुमचे TRP मीटर आम्हाला लाईव्ह दाखवा कि? मुळात एबीपी माझाच नव्हे कोणत्याही मराठी न्यूज चॅनल वरील बातम्या पहाणे अत्यंत उद्विग्नता आणणारे असते.

मुद्रित बातमीपत्रे असोत वा द्रुकश्राव्य बातमीपत्रे असोत, पत्रकारिता हि भांडवलदारांच्या दावणीला बांधली गेली आहे. पगार मिळतो म्हणून आपण काम करता बातम्या देता. थोडक्यात पत्रकारिता हि विकली गेलेली आहे. हिंदुत्वाच्या विरोधात बातमी तयार करणे. कोणत्याही गोष्टीची नकारात्मक बाजू समाजासमोर आणून समाजात नैराश्य पसरविणे, समाजाला दिलासा देण्याऐवजी समाजात भयप्रद वातावरण निर्माण करणे, समाजात अनागोंदी माजेल अशी स्थिती निर्माण करणे त्या माध्यमातून आपला टिआरपीचा आलेख चढता ठेवणे हाच आपला मुख्य हेतू.

परवा स्वयंघोषित समाजसेविका तृप्ती देसाई दारू विकत घेताना पकडल्या गेल्या. तो व्हिडिओ खरा कि खोटा यावर आपण चकार शब्द बोलला नाहीत. मुळात कोणती बातमी दाबायची, कोणती बातमी चव्हाट्यावर आणायची, कोणती बातमी कशी रंगवायची यातच आजची पोटार्थी पत्रकारिता रममाण झाली आहे. परंतु अशाने आपली दुकाने बंद पडतील अथवा लोक तरी आपली दुकाने फोडून टाकतील हे लक्षात घ्या. कारण आपली बहुतेक कृत्ये हि देशविरोधी, समाजविरोधी असतात हे जनतेच्या लक्षात आले आहे. आपण हव्या तशा बातम्या देऊन किंगमेकर ठरू, हवे त्याला सत्तेत बसवू, हवे त्याला खाली खेचू अशा भ्रमात आपण आहात. परंतु २०१९ मोदींना प्रचंड बहुमताने सत्तेत आणून जनतेने आपल्याला जोरदार चपराक मारली आहे.

परंतु आपली कातडी गेंड्याची आहे. अर्थात तो सोलून काढण्याचे काम समाज नक्की करेल.    

2 comments:

  1. सरळ स्पष्ट विचार

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या नियमित अभिप्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

      Delete