मी व्हाट्सअप वरील अवघ्या पाच ग्रुपमध्ये सहभागी आहे. कोरोनाचं वादळ येण्यापूर्वी या पाच ग्रुपवरील एकूण मेसेजेस २०० ते ३०० असायचे. परंतु कोरोनाचं वादळ आल्यापासून या पाच ग्रुपवर रोज २००० ते २५०० हजार मेसेज येत आहेत. बरं यातल्या बहुतेक इमेजेस आणि व्हिडीओ प्रत्येक ग्रुपवर असतातच. इतकेच काय एकंच व्हिडिओ एकाच ग्रुपवर तीन-तीन, चार-चार वेळही असतो. शिवाय तेच व्हिडीओ पुढे
तीन चार दिवस लोड होतात. आपण जो व्हिडिओ आपल्या ग्रुपवर फॉरवर्ड पोस्ट करतो तो आपल्या ग्रुपवर आधी कोणीतरी लोड केला आहे कि नाही हे पाहण्याची तसदी सुद्धा आपण घेत नाही. अशा रितीने नेमकं कोणतं सत्कर्म करतो आहोत आम्ही?
बरं हे व्हिडीओ म्हणजे 'दुनियाका आठवा अजूबा' वगैरे असं काही नसतं. तेच ते व्हिडिओ. इकडून तिकडून डाउनलोड केले. कोणताही सामाजिक संदेश न देणारे. फुटकळ विनोद असणारे. कोरोना विषयी तर इतकं काही असतं या व्हिडीओ मध्ये मी एखाद्याला ते ऐकून ऐकून कोरोना होईल. कोणीही उठतो मोबाईल हातात घेतो. व्हिडीओ बनवतो. अपलोड करतो. आणि आम्ही कामधंदा नसल्याप्रमाणे ते फॉरवर्ड करत बसतो. यात चांगली पुस्तके, चांगली नाटके, कथाकथनाच्या काही ऑडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आल्या. परंतु मला खात्री आहे असलं वैचारिक, दर्जेदार करमणूक असणारी पुस्तके कोणी वाचली नसतील. ती ताटके कोणी पाहिली नसतील. ऑडिओ कोणी ऐकल्या नसतील. पण फॉरवर्ड करताना सगळेच पुढे.
वर्तमानपत्र बंद झाल्यामुळे कोरोनाविषयीच्या बातम्या घरात यायचा एक मार्ग बंद झाला. टिव्हीवरच्या बातम्या हव्या तेव्हा बंद करता येतात त्यामुळे तिथून कोरोनाविषयीची भीती पसरण्याचा धोका कमी अधिक करण्याचा रिमोट आपल्या हातात आहे. परंतु व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांची अवस्था तर 'करमणूक नको पण व्हाट्सअप आवरा' अशी झाली आहे. मी गेली पाच सहा दिवस अत्यंत पोटतिडकीने यासंदर्भातील पोस्ट लिहितो आहे. पण मी चुकीच्या लोकांचं ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे असं वाटू लागलं आहे मला. कारण ज्यांना हे सगळे समजते तेच माझ्या पोस्टवर व्यक्त होत आहेत. ते स्वतःची काळजी घेत असतील अशी सुद्धा खात्री आहे. समाधानाची बाब एकच हि मंडळी मोठ्या प्रमाणात माझ्या पोस्ट फॉरवर्ड करत आहेत त्यामुळे ती अगदी तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहचत असेल याची मला खात्री आहे.
परंतु खरंच तुम्ही तुमची काळजी घ्या, गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, घर सोडून बाहेर पडू नका. घरात बसून रहाणे हाच कोरोना पासून सुटका करून घेण्याचा मार्ग आहे, अफवा पसरवू नका, भीती बाळगू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. या गोष्टी दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज आहे?
मी फार सकारात्मक आहे. आम्ही यातून लवकरच बाहेर पडू असा मला विश्वास आहे. परंतु दिलेल्या सूचनांचं पालन मात्र आम्हाला करावंच लागेल.

No comments:
Post a Comment