Sunday 5 April 2020

राहुल बाबा, तुसी ग्रेट हो...

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी

मला तरी इडीयट्स मधला, "जहाँपन्हा, तुसी ग्रेट हो, तोफा कबूल करो " असे म्हणत रणछोडला टेऱ्या दाखवणारे राजू रस्तोगी आणि फरहान कुरेशी आठवताहेत. राहुल गांधीने एक ट्विट काय केली तिचा आधार घेत "राहुल तुसी ग्रेट हो" म्हणत टेऱ्या बडविणाऱ्या मंडळींचे मला हसू येते. एखादं विधान करणं आणि
प्रत्यक्ष निर्णय घेण्यात जमीन अस्मानचे अंतर असते हे या टेऱ्या बडविणाऱ्या मंडळींच्या लक्षात कसे येत नाही. देश बंद करणे हे लाईट बंद करण्या इतके सोपे आहे का? रेल्वेच्या इतिहासात रेल्वे बंद होण्याची हि पहिली वेळ आहे यावरून हा निर्णय घेणे किती कठीण असावे याचा अंदाज यावा.

बरं, एकीकडे म्हणायचे देशातील जनतेला लॉक डाऊनचा त्रास होतो आहे. त्यामुळे लॉक डाऊन ऐवजी दुसरा काही पर्याय शोधायला हवा होता. मीडिया आणि समर्थक हे विधान उचलून धरत राहुल बाबाच्या चाणाक्ष बुध्दीमत्तेचं कौतुक करतात ना करतात तोवर राहुल बाबा म्हणतात लॉक डाऊन ठीक आहे. परंतु त्याची अंमलबजावणी चुकीच्या रीतीने होते आहे. बरं लॉक डाऊनची अंमलबजावणी चुकीची होते आहे असं म्हणताना योग्य रीतीने लॉक डाऊनची अंमलबजावणी कशी होईल हे ना राहुलबाबा सांगतात, ना मीडिया सांगते, आणि ना राहुलचे समर्थक सांगतात.

सोशल डिस्टंसिंग हा कोरोना आटोक्यात आणण्याचा सर्वात सोपा उपाय असताना, आणि "सोशल डिस्टंसिंग पाळा" असे मोदी, मीडिया, समाज प्रबोधन करणारे अनेक कवी, गायक, डॉक्टर सांगत असताना अनेकजण घराबाहेर पडताहेत. मुस्लिम समाजाने तर सरकारी आदेश पाळायचेच नाही असेच ठरविलेले दिसते. आज जगभरात कोरोना थैमान घालत असताना भारतात मात्र तो फार हालचाल करू शकलेला नाही. जगभरात नऊ लाखाहून अधिक कोरोनाबाधित असताना त्यात केवळ २५०० भारतीय आहेत. हि अगदी समाधानाची बाब आहे. परंतु विरोधकांनी योग्य समर्थन केले, जनतेने अधिक चांगल्या रितीने सहकार्य केले तर कोरोना पळवून लावणे सहज शक्य आहे.

खाटेतर आपापल्या राजकीय पक्षाचे समर्थन करण्याची हि वेळ नाही. काल मी कोरोना बाधितांच्या यादीत युपी खाली खाली घसरत असताना महाराष्ट्र मात्र आघाडी सोडायला तयार नाही असे का? अशा आशयाची पोस्ट केली होती. तिला अनेकांनी राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला. खरेतर युपीची लोकसंख्या महाराष्ट्राच्या दुपट्ट. तिथे मुस्लिमांची संख्या जास्त. गरिबी मोठ्या प्रमाणात असे असताना आज नुसार युपी आठव्या क्रमांकावर आहे. अशा वेळी आपण महाराष्ट्रातील जनतेने आत्मपरीक्षण करण्याची गरज असताना आपण राजकारण राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतो आहोत हे अत्यंत दुर्दैवी आहे.

संता बंता पेक्षा राहुलबाबांच्या अफाट बुद्धिमत्तेचे किस्से अधिक असतील. राहुलबाबांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची वेळ येते आहे आणि तरीही कोणाचा राहुल गांधींच्या बौद्धिक क्षमतेवर विश्वास असेल तर त्यांना परमेश्वर सुद्धा वाचवू शकणार नाही हे नक्की.

2 comments:

  1. very well said. This idiot is MP of Wynad with muslim majority. He and his party have always done dirty politics of keeping the muslims happy. Their strength is in their unity in voting. If Hindus unite in the same way, he will stop his stpid acts.

    ReplyDelete
    Replies
    1. Not only he, there are number of such people who want to washout India and his culture. but now Indian democracy become smart and so they pull such people down.

      Delete