Monday 13 April 2020

जयंतराव,जसे तुम्ही तसेच तुमचे कार्यकर्ते

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी


कोरोना राज्यात थैमान घालतो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची मंडळी फोटोसेशन साठी खूप काही करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जनतेत फिरून अधिकाधिक मदत करत आहे. नको त्या बातम्यांना प्रसिद्धी देणाऱ्या मीडियाला
संघाचे कार्य आणि जनसेवा कधीही दिसत नाही. सुमार बातम्या द्यायच्या. सुमार लोकांना प्रसिद्धी द्यायची. एवढेच. माझ्या अनेक पोस्टवर राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे अशा अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नको तशी मुक्ताफळे उधळली आहेत. यांच्यात हे अवसान येतं कुठून याचा विचार करताना,  त्यांच्या वाचाळतेच मूळ त्यांच्या नेत्यांमध्येच आहे असं दिसतं.

कोरोना विरुद्धची लढाई भाजप पूर्ण गांभिर्याने लढत आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते लोकांमध्ये मिसळून काम करत आहेत. मात्र, या सर्व लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा शिवसेना यांचे कार्यकर्ते कुठे आहेत? असा साधा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी जयंतराव पाटील यांना विचारला होता. यावर जयंतराव पाटलांनी जे उत्तम दिले ते त्यांच्या हिन मानसिकतेचे प्रतीक आहे. जयंतरावांनी कार्यकर्ते काय करतात हे समजण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ट्विटर अकाउंट पाहण्याचे सुचविले. मी मुद्दाम त्या अकाउंटला जाऊन आलो. मला दिसले ते एवढेच त्यात मदत कमी आणि फोटो शेषन जास्त होते.

त्याहीपेक्षा वाईट वाटले ते त्यांच्या , "दादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागल तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला." या विधानाचे. चंद्रकांत पाटलांना कोरोनाची भीती घालताना ते जात्यात असले तरी स्वतः सुपात आहोत याचा विसर त्यांना का पडतो. तसे तर तत्ताधरी पक्षातील अनेकांना कोरोनाने उचलावे अशी जनतेची इच्छा आहे. तसे विचार कोना राजकीय नेत्याने अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे दिसत नाही.

परंतु जयंत पाटील यांच्यासारखा मंत्री, तुम्हाला कोरोना होईल असे म्हणतो. जिंतेद्र आव्हाड एका तरुणाला बेदम मारहाण करतो, लॉक डाऊन  प्रधान सचिव चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देतात, साहेबांना मरकज आणि तब्लिगी मध्ये समावेश असलेल्या लोकांना चव्हाट्यावर आणि नये असे वाटते. काय सुरु आहे हे. यात जनतेची काळजी कुठे आहे? आम्ही उत्तराला उत्तर नाही प्रत्युत्तर देणार हीच सगळ्यांची भूमिका. नेत्यांचीही आणि कार्यकर्त्यांचीही. कसे होणार महाराष्ट्राचे? 

2 comments:

  1. खरोखर आज महाराष्टात भाजपा आणि तिच्या सलग्न संस्था सर्वत्र सेवा कार्यात आघाडीवर आहे.सत्ताधारी आणि त्यांचे कार्यकर्ते तर मोदी सरकारच्या नावाने खडे फोडत आहेत. सोशल मिडिया वरील काॅंमेंट वाचून आणि परिस्थिती पाहून आता जनतेला ही चांगले कळायला लागले की कोणाची म्हैस किती पाण्यात आहे.असो जनताच शेवटी समीक्षा करणार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. दिनेश जी, आपण इकडे येऊन अभिप्राय नोंदवता हे कौतुकास्पद आहे. विरोधक केवळ सत्तेचे राजकारण करत आहेत. जनता त्यांना जागा दाखवेल एवढे निश्चित.

      Delete