Thursday 16 April 2020

गळा तर तुमचे सरकार दाबते आहे उधोजी

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी


एबीपी माझाच्या राहुल कुलकर्णीला अटक झाली? जितेंद्र आव्हाडांनी अनंत करमुसेला जी मारहाण केली त्याविरोधात जो जनक्षोभ उमटला तसे पडसाद राहुल कुलकर्णीला अटक झाल्यावर घडले नाही. प्रसन्न जोशीला अटक झाली असती आणि
तो तुरुंगात खितपत पडला असता तर लोकांनी पेढेसुद्धा वाटले असते. कारण पत्रकारिता हा धंदा झाला आहे. आणि बातम्या देण्याचं नव्हे तर रंगविण्याचं काम हि पत्रकार मंडळी करताहेत. परंतु असे काही असले तरी अशा रितीने एखाद्या पत्रकाराने एखाद्या घटनेचे वास्तव उघडे करून दाखवले आणि ते सरकारच्या अंगाशी आले म्हणून एखाद्या पत्रकाराला अटक करणे चुकीचेच ना?

मोदी हिटलर आहेत, ते पत्रकारितेचा गळा दाबत आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे अशा रितीने मोदींच्या विरोधात अनेक पत्रकारांनी अनेक वावड्या उठवल्या होत्या. आज व्हाट्सअप वापरणाऱ्यांना ते केवळ 'ओन्ली ऍडमिन' करायला सांगितले जाते. सामाजिक अनागोंदी माजू नये म्हणून ते गरजेचे आहे. परंतु  हिच मंडळी काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील भागातील नेटवर्क बंदीवर आक्षेप घेत होती. आज एका पत्रकाराला अटक होते, अनंत करमुसेला मारहाण होते आणि तरीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते आहे असे कोणाला वाटत नाही. लॉक डाऊनच्या काळात एका घोट्याळ्यातील आरोपी वाधवान सरकारी पत्र घेऊन २५ लोकांसह महाबळेश्वरला जातो हि या सरकारची कार्यक्षमता? 

आपले अपयश कबुल करायला सुद्धा फार मोठेपणा लागतो. भ्रष्टवादीला, काँग्रेसला सोबत घेऊन सरकार बनवणे आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बळकावणे फार सोपे होते. कारण सत्तेसाठी हपापलेल्या मंडळींना तत्व वैगेरे काही नसते. सत्ता मिळवणेच त्यांचे ध्येय. १९४७ पासून आजतागायत आघाडीला प्रत्येकवेळी पाच पाच वर्षे असे दोनदा सत्तेबाहेर रहावे लागले. आणि २०१९ ला पुन्हा विरोधात बसावे लागेल हे दिसताच त्यांनी तुम्हाला गळाला लावले. कारण सतत दहा वर्षे सत्तेशिवाय जगणे त्यांना शक्य नव्हते. पाच वर्षे सत्तेबाहेर रहावे लागले तरी पुन्हा दहा पंधरा वर्षासाठी जनता आपल्याला सत्तेत बसवत असते अशा भ्रमात आघाडीची मंडळी होती. 

सत्ता तर मिळवली. परंतु राज्यकारभार करणे फार सोपे नाही हे आपल्या लक्षात आले असेल. आणि कोरोनावर नियंत्रण मिळवणे हे तर अत्यंत कठीण याचीही जाणीव झाली असेल. तरी नशीब महाराष्ट्र हे मागास राज्य नाही. इथली जनता सुशिक्षित आहे. औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय सेवांची आणि सेवकांची कमतरता नाही. असे असताना जर आपण कोरोनावर आटोक्यात आणू शकत नसाल तर इटलीच्या राष्ट्राध्यक्षांनी जसा कोरोना विरोधातील पराभव स्विकारला तसे तुम्हीही तुमची हार मान्य करा.  

4 comments:

  1. योग्य विचार, बाळासहेबांचे बोल विसरलेत काही दिवसांनी त्यांची तत्व ही विसरतील व राष्ट्रवादीकॉंग्रेस शिवसेना आघाडी असे पक्षाचे नाव असेल.

    ReplyDelete
    Replies
    1. तत्वांनाही मूठमाती दिली आहे साहेब. लवकरच शिवसेनाच केवळ सांगाडा उरलेला दिसेल. जे जनतेच्या हिताचं नाही.

      Delete
  2. खरंच आहे, शिवशेनेला या लोकांसोबत तडजोड करताना खूप अस्वस्थ होत असणार पण आता बोलणार नि सांगणार कोणाला.

    ReplyDelete
    Replies
    1. हो. खरे आहे. परंतु आता परतीचे दोर सुद्धा कापले गेले आहेत.

      Delete